IPL 2024, दिनेश कार्तिक: दिनेश कार्तिक आणि कमबॅक यांचे काहीतरी कनेक्शन आहे असे वाटते. कारण जेव्हा पण एखादी मोठी स्पर्धा येणार असते तेव्हा कार्तिक अशी कामगिरी करतो की, त्याच्या नावाची जोरदार चर्चा सुरू होते. जून-जुलै महिन्यात वेस्टइंडीज आणि अमेरिका येथे टी20 विश्वचषक स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेपूर्वी कार्तिक आयपीएल 2024 मध्ये ज्या पद्धतीने फलंदाजी करतोय ती पाहता प्रत्येक जण असंच म्हणतो की, तो टी-20 विश्वचषक स्पर्धेत खेळण्यासाठी दावेदार खेळाडू आहे.
मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात 11 एप्रिल रोजी सामना झाला. आरसीबी कडून कार्तिक फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला होता तेव्हा स्लीप मध्ये उभे असलेल्या रोहित शर्मा ने डिकेला बोलताना म्हणाला की, शाबास डिके! अजून विश्वचषक खेळायचा आहे. रोहित चे बोल ऐकून कार्तिक मोठ्याने हसू लागला आणि फलंदाजी करण्यात गुंग झाला. कार्तिकने या सामन्यात 23 चेंडू 53 धावांची तडाखेबाज खेळी केली.
दिनेश कार्तिक टी-२० विश्वचषक 2024 साठी करतोय जोरदार मेहनत?
सोमवारी सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध झालेल्या सामन्यात तो एक पाऊल पुढे गेला आणि मैदानाच्या चारही दिशेने फटकेबाजी करू लागला. त्याचा हा जबरदस्त परफॉर्मन्स ईशान किशन, संजू सॅमसन, जितेष शर्मा यांच्यासाठी धोक्याची घंटा असू शकते. कार्तिकचा फॉर्म कायम राहिला तर त्याला भारतीय विश्वचषक संघात प्रथम संधी मिळू शकते. कार्तिकने घोषित केले आहे की, त्याचा हा आयपीएलचा शेवटचा हंगाम असणार आहे.
यंदाच्या आयपीएल हंगामात कार्तिक ज्या पद्धतीने फलंदाजी करते करत आहे ते पाहून असे वाटते की, तो इतर खेळाडूंना नक्कीच आव्हान देऊ शकतो. त्याचे सध्याचे वय 38 वर्ष आहे. त्याचे वय झाले असले तरी t20 क्रिकेटच्या फॉरमॅटमध्ये तो खेळण्यासाठी खूप पूर्णपणे फिट बसतो. भलेही रोहित शर्मा मैदानावर दिनेश कार्तिकला भारतीय संघात विश्वचषक स्पर्धेत खेळण्याविषयी सांगत असला तरी तो इतर खेळाडूंच्या बाबतीत खूपच पुढे आहे.
आयपीएल 2024 मध्ये कार्तिक घालतोय धुमाकूळ..
कार्तिकने आयपीएल 2024 मधील 7 सामन्यात 205 च्या स्ट्राईक रेटने 226 धावा केल्या आहेत. हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात त्याने 35 चेंडू 83 धावांची तडाखेबाज खेळी करत साऱ्यांची मने जिंकली. यात त्याने पाच चौकार आणि सात उत्तुंग षटकार ठोकले. मैदानाच्या चारीही दिशेने त्याने जोरदार फटकेबाजी केली. या खेळीत त्याच्या बॅटमधून स्विच हिट, रिवर्स स्कुप सारखे शॉर्ट देखील पाहायला मिळाले. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट 237 इतका होता. 38 वर्षाच्या कार्तिकने टी नटराजन याच्या चेंडूवर यंदाच्या हंगामातला सर्वात मोठा 108 मीटर लांबीचा षटकार ठोकला. तसेच त्याने पॅट कमिंसची गोलंदाजी देखील फोडून काढली.
A 1⃣0⃣8⃣m monster! 💥
The bowlers can finally breathe at the Chinnaswamy as the batting carnage comes to an end! 🥶
Recap the match on @StarSportsIndia and @JioCinema 💻📱#TATAIPL | #RCBvSRH pic.twitter.com/lclY9rs2Kf
— IndianPremierLeague (@IPL) April 15, 2024
कार्तिक 19व्या षटकातील नटराजनच्या शेवटच्या चेंडूवर बाद झाल्यानंतर संपूर्ण स्टेडियम मधील प्रेक्षक उभे राहून टाळ्या वाजवून त्याचे अभिनंदन करत होते. त्याने 83 धावांची खेळी करूनही त्याच्या संघाला विजय मिळवून दिला नसला तरी प्रत्येक क्रिकेट प्रेमींचे हृदय मात्र जिंकून टाकले. आरसीबी आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना वीस धावांनी सामना गमावला.
====
आमचे ईतर लेख आणि ट्रेंडीग बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.