Dinesh kartik Dipika Love Story: पहिल्या पत्नीने धोका दिल्यामुळे आत्महत्या करण्याच्या विचारात होता दिनेश कार्तिक, दीपिकाने आयुष्यात येऊन फुलवली कारकीर्द…

Dinesh kartik Dipika Love Story: पहिल्या पत्नीने धोका दिल्यामुळे आत्महत्या करण्याच्या विचारात होता दिनेश कार्तिक, दीपिकाने आयुष्यात येऊन फुलवली कारकीर्द...

Dinesh kartik Dipika Love Story:  भारतीय विकेटकीपर फलंदाज दिनेश कार्तिक हा क्रिकेट कारकिर्दीपेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहिला आहे. 2007 मध्ये क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या दिनेश कार्तिकचे वैयक्तिक आयुष्यही चढ-उतारांनी भरलेले आहे. त्याची पहिली पत्नी निकिता आणि जवळचा मित्र मुरली विजय यांनी कार्तिकची फसवणूक केली होती. दिनेश कार्तिकशी घटस्फोट घेतल्यानंतर निकिताने मुरली विजयसोबत लग्न केले.

मुरली विजय हा भारतीय कसोटी संघाचा सर्वोत्तम सलामीवीर मानला जात होता. दिनेश कार्तिक आणि मुरली विजय अनेक वर्षे तामिळनाडू संघाकडून देशांतर्गत क्रिकेट खेळले. या संपूर्ण घटनेनंतर दिनेश कार्तिक पूर्णपणे तुटला होता. त्याच्या क्रिकेट कारकिर्दीतही त्याचे भारतीय संघातील स्थान पक्के झाले नव्हते. दुसरीकडे घरगुती जीवनही अव्यवस्थित झाले होते. त्याचे काहीच ठीक चालत नव्हते आणि तो मानसिकरित्या आजारीही होता.

मुरली विजयचे होते दिनेश कार्तिकच्या पत्नीसोबत अफेअर, अश्या पद्धतीने दिनेशच्या मैत्रीचा फायदा उचलत मुरली विजयने जिंकले होते निकिताचे मन..

Dinesh kartik Dipika Love Story :स्क्वॉशपटू दीपिका पल्लीकलने  दिनेश कार्तिकचे आयुष्य पुन्हा फुलवले.

अशा परिस्थितीत स्क्वॉशपटू दीपिका पल्लीकल दिनेश कार्तिकच्या आयुष्यात आली. 2013 मध्ये दोघांची भेट झाली आणि त्यांच्यात जवळीक वाढू लागली. दोघांनी २०१५ मध्ये लग्न केले. दीपिका ख्रिश्चन होती आणि दिनेश हिंदू होता. अशा परिस्थितीत रितीरिवाज आणि परंपरा या दोन्ही पद्धतीने विवाह पार पडला. 18 ऑगस्ट रोजी ख्रिश्चन रितीरिवाजांनुसार पहिले लग्न झाले. त्यानंतर 20 ऑगस्ट रोजी हिंदू रितीरिवाजांनुसार दोघांनी लग्न केले.

Dinesh kartik Dipika Love Story: कार्तिकच्या या खेळीने बदलली संपूर्ण क्रिकेट कारकीर्द..

Dinesh kartik Dipika Love Story: पहिल्या पत्नीने धोका दिल्यामुळे आत्महत्या करण्याच्या विचारात होता दिनेश कार्तिक, दीपिकाने आयुष्यात येऊन फुलवली कारकीर्द...

या लग्नानंतर दिनेश कार्तिकच्या क्रिकेट करिअरवर खूप सकारात्मक परिणाम झाला. त्याने आक्रमक फलंदाजीला सुरुवात केली. 2018 हे वर्ष त्याच्या करिअरसाठी टर्निंग पॉइंट ठरले. 18 मार्च 2018 रोजी निदाहास ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात दिनेश कार्तिकने शेवटच्या चेंडूवर षटकार मारून सामना जिंकणारा खेळी खेळली. त्यानंतर संपूर्ण क्रिकेट विश्वात त्याच्या चर्चा रंगल्या.

या खेळीनंतर सुद्धा कार्तिक आयपीएल आणि लोकल स्पर्धांमध्ये तसेच टीम इंडियामध्ये सुद्धा आपला खेळ दाखवत राहिला.आता दिनेश कार्तिक आपल्या पत्नीसह सुखी आयुष्य जगत आहे.


हेही वाचा:

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दीपक चहरच्या जागी भारतीय संघात खेळणार ‘आकाश दीप’ कोण आहे? वडील आणि भावाचे निधन, आईने मेहनत करून बनवले क्रिकेटर..

कारकीर्द कितीही वादाची असली तरीही, ‘सनथ जयसूर्या’ खेळाडू जबराटचं होता…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *