भारतीय खेळाडू जगात सर्वात अव्वल दर्जाचे खेळाडू मानले जातात कारण भारतीय खेळाडू सोबत मुकाबला करणे खूप कठीण आहे शिवाय अवघड आहे. त्यामुळे भारतीय खेळाडू जगाच्या उंच पातळीवर आपल्या विजयाचा डंका वाजवत आहेत.
गेल्या काही दिवसापासून पॅरिस मध्ये पॅरालिम्पिक सामने चालू आहेत या पॅरालिम्पिकमध्ये भारताने अनेक मेडल जिंकली आहेत. आतापर्यंत भारताने 20 पदके जिंकली आहेत. त्यामुळे या पॅरालिम्पिकमध्ये भारताच्या खेळाडूंनी यशस्वी आणि दमदार कामगिरी केली आहे.
या पॅरालिम्पिकमध्ये तेलंगणा राज्यातील दीप्ती जीवन चे ही मोलाचे योगदान आहे. दीप्ती जीवन ने महिला रेस 400 मीटर मध्ये कांस्य पदक मिळवले आहे. अवघे 20 वर्ष वय असलेल्या दीप्तीने 55.82 सेकंदात 400 मीटर शर्यत पूर्ण केली आणि कांस्य पदकाला गवसणी घातली. दीप्ती चे गोल्ड मेडल अवघ्या 0.66 सेकंदाने हुकले.
हे ही वाचा:- दुधवाल्याच्या पोरीने पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये जिंकली देशासाठी जिंकली 2 पदक, देशाचे नाव जागतिक पातळीवर…
दीप्ती जीवन:-
दीप्ती जीवनजी ही तेलंगणातील वारंगल जिल्ह्यातील रहिवासी आहे. दीप्ती ही मानसिक दृष्ट्या अपंग होती त्यामुळे पॅरालिम्पिक मध्ये त्या खेळाडूंसाठी रखिव जागा असते.दीप्ती साठी हा ऐतिहासिक टप्पा गाठणे खूप कठीण होते. आपली योग्यता सिद्ध करण्यासाठी तिला केवळ आपल्या मानसिक आजाराशीच नव्हे, तर समाजाशीही लढावे लागले.
दीप्ती च्या आई ने सांगितल्यानुसार दीप्ती चा जन्म सूर्य ग्रहणावेळी झाल्यामुळे ती मानसिक दृष्ट्या अपंग होती शिवाय तिचे डोके खूपच लहान होते. याशिवाय त्याचे ओठ आणि नाक देखील सामान्य मुलांपेक्षा थोडे वेगळे होते. त्यामुळे सर्व नातेवाईक दीप्ती ला वेडी किंवा माकड या शब्दांचा वापर करत असे. तसेच काही लोकांनी तर दीप्ती च्या आईवडिलांना तिला अनाथ आश्रमात टाकण्याचा सल्ला सुद्धा दिला होता. घरची परिस्थिती बेताची असून सुद्धा तिच्या आई वडिलांनी दीप्ती चा चांगला सांभाळ केला.
दीप्तीला लहानपणापासून ॲथलेटिक्सची आवड होती. वयाच्या 15 व्या वर्षी, स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाचे प्रशिक्षक एन रमेश यांनी तिची दखल घेतली आणि भारतीय खेळाडूची प्रतिभा लगेच ओळखली. यानंतर त्यांनी त्यांच्या देखरेखीखाली प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. खूप मेहनतीनंतर, दीप्तीने 2022 च्या आशियाई पॅरा गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकून तिचे पहिले मोठे यश मिळवले. या काळात त्याने आशियाई विक्रमही मोडला. यानंतर, ती 2024 मध्ये जपानमध्ये झालेल्या जागतिक पॅरा ॲथलेटिक्समध्ये चॅम्पियन बनली, जिथे तिने विश्वविक्रमही केला. आता त्याने पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकून इतिहास रचला आहे.
हे ही वाचा:- भारतीय क्रिकेट संघाला जगातील नंबर 1 क्रिकेट टीम बनवण्यात या 5 कोच चे मोलाचे योगदान, जाणून घ्या सविस्तर.