आयपीएल मध्ये 500 पेक्षा अधिक धावा सर्वाधिक वेळा कोणत्या फलंदाजाने काढल्यात तुम्हाला माहिती आहे का? पहा यादी..

0

‘इंडियन प्रीमियर लीग’ अर्थात आयपीएल ही सर्वच क्रिकेट प्रेमींची आवडती लीग आहे. क्रीडा प्रेमींचे भरपूर मनोरंजन करणाऱ्या या लीगमध्ये खेळाडूंनी नवनवीन विक्रम केले आहेत. आज आपण या लीग मध्ये 500 पेक्षा अधिक धावा कोणत्या खेळाडूंनी सर्वाधिक वेळा केल्या आहेत याची माहिती जाणून घेणार आहोत.

डाव्या हाताने फलंदाजी करणारा डेविड वॉर्नर याने आयपीएल मध्ये सात वेळा 500 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. आयपीएल मध्ये अशी कामगिरी करणारा एकमेव खेळाडू आहे. आयपीएल मध्ये सातत्याने धावा काढणाऱ्या विदेशी खेळाडूंमध्ये वॉर्नरचा समावेश होतो. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त घेतलेल्या हा कांगारू फलंदाज यंदा दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळतोय.

रन मशीन विराट कोहली याने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीमध्ये आयपीएल मध्ये सहा वेळा 500 पेक्षा अधिक धावा काढण्याचा विक्रम केला आहे. आयपीएल मध्ये 500 पेक्षा अधिक धावा सर्वाधिक वेळा काढण्याऱ्या फलंदाजांच्या यादीमध्ये विराट दुसऱ्या स्थानावर आहे. विराट आरसीबीचा प्रमुख फलंदाज आहे नुकतेच त्याने टी-20 क्रिकेट मध्ये 12000 धावा पूर्ण केल्या आहेत.

किंग कोहलीच्या नावे आणखीन एका महाविक्रमाची नोंद; सुरेश रैनाला टाकले पाठीमागे..!

लखनऊ सुपरजायन्ट्स संघाचा कर्णधार के एल राहुल याने आयपीएल मध्ये पाच वेळा 500 पेक्षा अधिक धावा करण्याचा विक्रम केला होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेट सोबत आयपीएल मध्ये देखील तो खोऱ्याने धावा काढतोय. यंदा केवळ तो फलंदाज म्हणून आयपीएलमध्ये खेळतोय. जबरदस्त फॉर्मत असलेला के एल राहुल नुकताच दुखापतीतून सावरला आहे.

पंजाब किंग्स संघाच्या कर्णधार शिखर धवन याने आयपीएल मध्ये पाच वेळा 500 पेक्षा अधिक धावा करण्याचा विक्रम केला आहे. आयपीएल मध्ये त्याच्या बॅटमधून सतत धावा निघत असतात. यंदाही त्याचा फॉर्म कायम राहिला तर तो पंजाबच्या संघाला आयपीएलचा पहिल्यांदा चषक जिंकून देऊ शकतो.

स्टायलिश फलंदाज सुरेश रेना याने त्याच्या क्रिकेट कारकीर्दीमध्ये आयपीएलमध्ये 500 पेक्षा अधिक धावा करण्याचा विक्रम पाच वेळा केला आहे. त्याने क्रिकेटमधून आता निवृत्त घेतले असून सध्या तो समालोचकाच्या भूमिकेत दिसून येतोय. आयपीएल मध्ये त्याने सर्वाधिक सामने चेन्नई सुपर किंग्स संघाकडून खेळले आहेत.

वेस्टइंडीज चा आक्रमक फलंदाज क्रिस गेल याने आयपीएल मध्ये अनेक विक्रम रचले गेले आहेत. आपल्या आक्रमक फलंदाजीने मातब्बर खेळाडूंची गोलंदाजी फोडून काढणाऱ्या या खेळाडूने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. गेल ने त्याच्या आयपीएल कारकिर्दीमध्ये तीन वेळा 500 हून अधिक धावा केल्या आहेत. कोलकत्ता नाईट रायडर्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळूर आणि किंग्स इलेव्हन पंजाब या संघाकडून त्याने आयपीएल मध्ये प्रतिनिधित्व केले होते.

आयपीएल मध्ये 500 पेक्षा अधिक धावा सर्वाधिक वेळा कोणत्या फलंदाजाने काढल्यात तुम्हाला माहिती आहे का? पहा यादी..

दक्षिण आफ्रिकेचा माझी यष्टीरक्षक फलंदाज क्विंटन डिकॉक याची देखील आयपीएलमध्ये बॅट चालली. त्याने आयपीएल मध्ये तीन वेळा 500 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. सध्या तो लखनऊ सुपर जायंट्स संघाकडून खेळतोय. यापूर्वी तो मुंबई इंडियन्स संघाकडून प्रतिनिधित्व करत होता. भारतात झालेल्या 2023 विश्वचषक स्पर्धेनंतर त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली होती त्यानंतर तो केवळ जगभरातल्या व्यवसायिक टी20 स्पर्धांमध्ये खेळतोय.

कोलकत्ता नाईट रायडर्स संघाचा मुख्य प्रशिक्षक असलेल्या गौतम गंभीर ने आयपीएल मध्ये तीन वेळा 500 पेक्षा अधिक धावा करण्याचा विक्रम केला होता. सध्या तो केकेआर संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून काम पाहतोय. त्याच्याच कारकिर्दीमध्ये केकेआर च्या संघाने सलग दोनदा आयपीएलचा चषक जिंकला होता. त्यानंतर एकदाही या संघाला आयपीएलच्या ट्रॉफीवर आपले नाव कोरता आले नाही.


====

आमचे ईतर लेख आणि ट्रेंडीग बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

 

IPL 2024: मुंबई इंडियन्सने अचानक केला संघात बदल, या दिग्गज खेळाडूला बाहेर काढून या इंग्लंड च्या खेळाडूला दिली संधी.

IPL 2024: यॉर्कर स्पेशालिस्ट ‘जसप्रीत बुमराह’ आयपीएलसाठी पूर्णपणे फिट; यंदाच्या आयपीएल मध्ये या तीन विक्रमावर असेल नजर…

Leave A Reply

Your email address will not be published.