IPL Records: तुम्हाला माहिती आहे का आयपीएल मध्ये सर्वाधिक ‘ सामनावीर’ (मॅन ऑफ द मॅच) चा पुरस्कार कोणत्या कर्णधाराने जिंकलाय? पहा यादी..

0
4
IPL Records: तुम्हाला माहिती आहे का आयपीएल मध्ये सर्वाधिक ' सामनावीर' (मॅन ऑफ द मॅच) चा पुरस्कार कोणत्या कर्णधाराने जिंकलाय? पहा यादी..

ताज्या बातम्या आणि अपडेट्स Whattsapp वर मिळवण्यासाठी जॉईन करा: Whatsapp Group

=======

IPL Records:  क्रिकेटमध्ये कोणताही सामना जिंकून देण्यात कर्णधाराची भूमिका महत्त्वाची असते. कारण कर्णधार संघाला दिशा दाखवत असतो. महत्त्वाच्या प्रसंगी तो जबरदस्त खेळी करून विजयाचा मार्ग दाखवतो. आयपीएल मध्ये असे काही खेळाडू आहेत जे कर्णधार म्हणून खेळताना अनेकदा सामनावीरचा पुरस्कार जिंकले आहेत. कर्णधार म्हणून खेळताना सामनावीरचा सर्वाधिक पुरस्कार जिंकणाऱ्या खेळाडूंची माहिती आपण घेऊयात.

कर्णधार म्हणून खेळतांना या कर्णधारांनी जिंकलाय सर्वांत जास्त वेळा सामनावीर पुरस्कार..

 

1.महेंद्रसिंग धोनी

महेंद्रसिंग धोनी आयपीएल मध्ये चेन्नई सुपर किंग्स चे नेतृत्व करतोय. त्याने आयपीएल मध्ये आतापर्यंत सर्वाधिक 16 वेळा सामनावीरचा किताब जिंकला आहे. सर्वाधिक वेळा सामनावीरचा किताब जिंकणारा तो पहिला कर्णधार आहे. धोनीने चेन्नई सुपर किंग संघासोबतच पुढे सुपर जाइंट्स संघाचे देखील संघाच्या नेतृत्वाची धुरा सांभाळले होती. यंदा हे त्याचे शेवटचे आयपीएल वर्ष मानले जात आहे.

एम एस धोनीच्या निवृत्तीनंतर रोहित बनणार सीएसकेचा नवा सेनापती? माजी खेळाडूंनी दिले मोठे संकेत.

2. गौतम गंभीर

माजी कर्णधार गौतम गंभीर याने कर्णधार म्हणून खेळताना तेरा सामन्यात सामनावीर पुरस्कार जिंकला आहे. गौतमने त्याच्या कारकिर्दीमध्ये कोलकत्ता नाईट रायडर्स आणि दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाच्या नेतृत्वाची धुरा सांभाळली होती. त्याच्याच नेतृत्वाखाली केकेआर ने दोनदा आयपीएलचा चषक जिंकला होता. यंदा तो केकेआर चा प्रमुख मार्गदर्शक म्हणून काम करणार आहे.

3.रोहित शर्मा

मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्मा याने आयपीएल मध्ये कर्णधार म्हणून खेळताना 13 वेळा मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार जिंकला आहे. सध्या मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या आहे. रोहित शर्मा यंदा मुंबई इंडियन्सच्या संघात खेळाडू म्हणून खेळणार आहे. त्याच्याकडून नेतृत्वपदाची धुरा काढून घेण्यात आली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rohit Sharma (@rohitsharma45)

4.विराट कोहली

रॉयल चॅलेंजर्स बंगळूर संघाचा माजी कर्णधार विराट कोहली याने 11 वेळा सामनावीरचा पुरस्कार जिंकला आहे. कोहली नऊ वर्ष आरसीबीच्या संघाचे नेतृत्व सांभाळले होते. सध्या दक्षिण आफ्रिकेचा माजी फलंदाज डुप्लेसीस हा कर्णधार आहे. त्याच्याच नेतृत्वाखाली आरसीबीचा संघ आयपीएलमध्ये उतरणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Virat Kohli (@virat.kohli)

5.के एल राहुल

के एल राहुल याने कर्णधार म्हणून खेळताना आठ सामन्यात सामन्यावरचा पुरस्कार जिंकला आहे. राहुलने यापूर्वी किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचे नेतृत्व केले होते. सध्या तो लखनऊच्या संघाच्या नेतृत्वाची धुरा सांभाळत आहे.

धडाकेबाज सलामीचा फलंदाज डेव्हिड वॉर्नर याने कर्णधार म्हणून खेळताना आठ वेळा सामनावीरचा पुरस्कार जिंकला आहे. यापूर्वी त्याने दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद संघाच्या नेतृत्वाची धुरा सांभाळली होती. सध्या तो दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळतोय.

IPL Records: तुम्हाला माहिती आहे का आयपीएल मध्ये सर्वाधिक ' सामनावीर' (मॅन ऑफ द मॅच) चा पुरस्कार कोणत्या कर्णधाराने जिंकलाय? पहा यादी..

6.वीरेंद्र सेहवाग

भारताचा स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग याने आयपीएल मध्ये कर्णधार म्हणून खेळताना आठ वेळा सामनावीरचा किताब जिंकला आहे. सुरुवातीला त्याने दिल्ली डेअरडेव्हिल्स आणि त्यानंतर किंग्स इलेव्हन पंजाब संघाचे प्रतिनिधित्व केले होते. सेहवागने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारले आहे.


==

आमचे ईतर लेख आणि ट्रेंडीग बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here