Double Century In ODI: टीम इंडियाचे ‘हे’ 5 खेळाडू ठोकू शकतात एकदिवशीय क्रिकेटमध्ये द्विशतक, एक जण तर आहे जबरदस्त फॉर्ममध्ये..!

Double Century In ODI: टीम इंडियाचे 'हे' 5 खेळाडू ठोकू शकतात एकदिवशीय क्रिकेटमध्ये द्विशतक, एक जण तर आहे जबरदस्त फॉर्ममध्ये..!

Double Century In ODI:   काही दिवसापूर्वी टीम इंडियाचा सलामीवीर शुभमन गिल याने एकदिवशिय सामन्यात दुहेरी शतक ठोकले होते. गिलच्या आधी इशान किशन, रोहित शर्मा, वीरेंद्र सेहवाग आणि सचिन तेंडुलकर यांनीही एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतके झळकावली आहेत. भारतासाठी (टीम इंडिया) आतापर्यंत फक्त या 5 खेळाडूंनी हा पराक्रम केला आहे. पण संघात अजूनही काही खेळाडूंचा समावेश आहे ज्यांच्याकडे वनडेत द्विशतक झळकावण्याची क्षमता आहे. चला तर मग एक नजर टाकूया त्या 5 खेळाडूंवर जे भविष्यात एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावू शकतात.

हे खेळाडू ठोकू शकतात एकदिवशीय क्रिकेटमध्ये दुहेरी शतक (players who can smash double century in ODI)

१) विराट कोहली (Virat Kohli)

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि अनुभवी फलंदाज विराट कोहलीला एकदिवसीय क्रिकेटचा बादशाह म्हटले जाते. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने शेकडो धावा केल्या असून अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. मात्र आतापर्यंत विराटला वनडेत द्विशतक झळकावता आलेले नाही. मात्र, तो ज्या पद्धतीने फलंदाजी करतो, त्यामुळे तो द्विशतक सहज झळकावू शकतो. हा पराक्रम करण्याची त्याच्याकडे पूर्ण क्षमता आहे.

IND vs ENG: विराट कोहली पुढील सर्वच कसोटी सामन्यात नाही खेळणार ,'या' कारणामुळे संपूर्ण मालिकेतून घेतले नाव मागे..

याशिवाय विराट कोहलीच्या एकदिवसीय कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर, त्याने आतापर्यंत 271 वनडे सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने 57.7 च्या जबरदस्त सरासरीने फलंदाजी करताना 12809 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये त्याच्या बॅटमधून 64 अर्धशतके आणि 46 शतके झळकली आहेत.

IND vs AUS :”ये दुखः काहे खतम नही होता बे..” एका वर्षात ऑस्ट्रोलीयाने 3 वेळा भारताचे आयसीसी ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न मोडले, U19 विश्वचषकातही टीम इंडियाचा पराभव..

२) पृथ्वी शॉ (Pruthvi Shaw)

तिन्ही फॉरमॅटमध्ये टीम इंडियाचे प्रतिनिधित्व करणारा युवा स्फोटक सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉ त्याच्या झंझावाती फलंदाजीसाठी ओळखला जातो. तो वेगाने धावा करण्यात पटाईत आहे. अशा परिस्थितीत शॉची ही शैली त्याला वनडे क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावण्यात मदत करू शकते.

शॉने नुकतेच रणजी ट्रॉफीमध्ये आसामविरुद्ध त्रिशतक झळकावले होते. त्याने 379 धावांची अविश्वसनीय खेळी खेळली. त्यानंतर न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या T20I मालिकेत त्याची निवड झाली. मात्र, पृथ्वी शॉला त्या मालिकेत खेळण्याची एकही संधी मिळाली नाही.

Viral Video: सलग दुसऱ्यांदा SA20 लीगची ट्रॉफी जिंकल्यानंतर सनरायझर्सची मालकीण ‘काव्या मारन’ झाली भलतीच खुश, थेट एडन मार्करमला मारली कडाडून मिठी; व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल..

3) सूर्यकुमार यादव (Surya Kumar Yadav)

भारतीय क्रिकेट संघाचा मधल्या फळीतील फलंदाज सूर्यकुमार यादव हा त्याच्या झंझावाती फलंदाजीसाठीही ओळखला जातो. सूर्याने T20I क्रिकेटमध्ये आपली छाप सोडली आहे. 2022 मध्ये तो इतका जबरदस्त फॉर्ममध्ये होता की, ICC ने त्याला “T20 क्रिकेटर ऑफ द इयर” पुरस्काराने सन्मानित केले.

सूर्यकुमार यादवच्या नावावर एकट्या T20 मध्ये 3 शतके आहेत. त्याने खेळलेल्या 48 टी-20 सामन्यांमध्ये 46.5 च्या सरासरीने 1675 धावा केल्या. त्याची आक्रमक शैली त्याला एकदिवसीय सामन्यांमध्येही खूप प्रभावी ठरू शकते. सूर्याला अजून एकदिवसीय क्रिकेटमध्ये आपले पाय रोवता आलेले नाहीत ही वेगळी बाब आहे. पण ज्या दिवशी तो भाग्यवान ठरेल त्या दिवशी तो एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतकही ठोकू शकतो.

Double Century In ODI: टीम इंडियाचे 'हे' 5 खेळाडू ठोकू शकतात एकदिवशीय क्रिकेटमध्ये द्विशतक, एक जण तर आहे जबरदस्त फॉर्ममध्ये..!

4) केएल राहुल (KL Rahul)

भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी सलामीवीर फलंदाज केएल राहुल त्याच्या दीर्घ खेळीसाठी ओळखला जातो. लोकेश एकदा खेळपट्टीवर स्थिरावला की त्याला बाहेर काढणे जवळजवळ अशक्य होते. राहुलकडे वनडेत द्विशतक झळकावण्याची क्षमताही आहे. एकदिवसीय सामन्यांमध्ये जबरदस्त इनिंग खेळून त्याने अनेक वेळा आपली प्रतिभा दाखवली आहे. अशा परिस्थितीत ज्या दिवशी वारे राहुलच्या बाजूने असतील, त्याच दिवशी तो वनडेत द्विशतक झळकावताना दिसेल.

याशिवाय, केएलच्या एकदिवसीय आकडेवारीबद्दल बोलायचे झाल्यास, त्याने आतापर्यंत खेळलेल्या 51 एकदिवसीय सामन्यांमध्ये 44.5 च्या सरासरीने फलंदाजी करत 1870 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये त्याच्या बॅटमधून 12 अर्धशतके आणि 5 शतके झळकली आहेत.

५) संजू सॅमसन (Sanju Samson)

 

View this post on Instagram

 

A post shared by Sanju V Samson (@imsanjusamson)

भविष्यात टीम इंडियासाठी द्विशतक झळकावणाऱ्या खेळाडूंच्या यादीत भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसनचे नावही सामील आहे. मात्र, आतापर्यंत संजूला स्वत:ला सिद्ध करण्याच्या इतक्या संधी मिळालेल्या नाहीत. पण त्याने आयपीएलमध्ये आपली क्षमता सर्वांना दाखवून दिली आहे.

संजूने आयपीएलमध्ये खेळलेल्या 138 सामन्यांमध्ये 135.7 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करताना 3526 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये त्याने 17 अर्धशतके आणि 3 शतके झळकावली आहेत. वेगवान फलंदाजीमुळे संजू वनडेमध्ये द्विशतक झळकावू शकतो.


==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

Viral Video: सलग दुसऱ्यांदा SA20 लीगची ट्रॉफी जिंकल्यानंतर सनरायझर्सची मालकीण ‘काव्या मारन’ झाली भलतीच खुश, थेट एडन मार्करमला मारली कडाडून मिठी; व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *