Duleep Trophy 2024 Schedule: दिलीप ट्रॉफी 2024 (Duleep Trophy 2024) आजपासून (05 सप्टेंबर, गुरुवार) सुरू होत आहे, ज्यामध्ये टीम इंडियाकडून खेळणारे सर्व स्टार खेळाडू खेळताना दिसतील. भारतीय देशांतर्गत हंगामाची सुरुवात दुलीप ट्रॉफीने होणार आहे. या स्पर्धेत एकूण 4 संघ सहभागी होणार आहेत. यावेळी दुलीप ट्रॉफी वेगळ्या फॉरमॅटमध्ये होणार आहे. चला तर मग जाणून घेऊया या स्पर्धेशी संबंधित काही महत्त्वाची माहिती.
Duleep Trophy 2024 साठी कसे आहेत संघ?
दिलीप ट्रॉफीसाठी यापूर्वी 6 विभागीय संघ निवडले गेले होते, परंतु यावेळी स्पर्धेसाठी एकूण 4 संघ निवडले गेले आहेत, ज्यांना ‘अ’ ते ‘ड’ अशी नावे देण्यात आली आहेत. स्पर्धेचे सामने बेंगळुरू आणि अनंतपूर येथे होणार आहेत. या स्पर्धेत ‘अ’ संघाचे कर्णधारपद शुभमन गिलकडे, ‘ब’ संघाचे कर्णधारपद अभिमन्यू ईश्वरनकडे, ‘सी’ संघाचे कर्णधारपद रुतुराज गायकवाड आणि ‘डी’ संघाचे कर्णधारपद श्रेयस अय्यरकडे देण्यात आले आहे.
तुम्ही दिलीप ट्रॉफीचा थेट सामना कुठे पाहू शकाल? (Duleep Trophy 2024 Live Streaming)
स्पोर्ट्स 18 च्या माध्यमातून दुलीप ट्रॉफीचे सामने टीव्हीवर थेट प्रक्षेपित केले जातील. याशिवाय स्पर्धेचे लाईव्ह स्ट्रीमिंग JioCinema वर केले जाईल. चाहत्यांना JioCinema वर सामन्यांचा मोफत आनंद घेता येणार आहे.
दिलीप ट्रॉफीचे वेळापत्रक( Duleep Trophy 2024 Schedule)
- पहिला सामना- 5-8 सप्टेंबर सकाळी 09:30, भारत अ विरुद्ध भारत ब, चिन्नास्वामी स्टेडियम, बेंगळुरू, कर्नाटक
- दुसरा सामना- 5-8 सप्टेंबर 09:30 am, India C vs India D, ग्रामीण विकास ट्रस्ट स्टेडियम, अनंतपूर, आंध्र प्रदेश
- तिसरा सामना- 12-15 सप्टेंबर 09:30 AM, India A vs India D, ग्रामीण विकास ट्रस्ट स्टेडियम, अनंतपूर, आंध्र प्रदेश
- चौथा सामना- 12-15 सप्टेंबर 09:30 AM, India B vs India C, रूरल डेव्हलपमेंट ट्रस्ट स्टेडियम B, अनंतपूर, आंध्र प्रदेश
- पाचवा सामना- 19-22 सप्टेंबर 09:30 AM, India A vs India C, ग्रामीण विकास ट्रस्ट स्टेडियम, अनंतपूर, आंध्र प्रदेश
- सहावा सामना- 19-22 सप्टेंबर 09:30 AM, India B vs India D, Rural Development Trust Stedium B, अनंतपूर, आंध्र प्रदेश.
दुलीप ट्रॉफीसाठी सर्व 4 संघ (Duleep Trophy 2024 Teams)
भारत अ- शुभमन गिल (कर्णधार), मयंक अग्रवाल, रायन पराग, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), केएल राहुल, टिळक वर्मा, शिवम दुबे, तनुष कोटियन, कुलदीप यादव, आकाश दीप, प्रसीद कृष्णा, खलील अहमद, आवेश खान, विद्वत कवेरप्पा , कुमार कुशाग्र, शास्वत रावत.
भारत ब- अभिमन्यू इसवरन (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, सरफराज खान, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), मुशीर खान, नितीश कुमार रेड्डी (फिटनेसवर अवलंबून), वॉशिंग्टन सुंदर, नवदीप सैनी, यश दयाल, मुकेश कुमार, राहुल चहर, आर. साई किशोर, मोहित अवस्थी, एन जगदीसन.
भारत क- रुतुराज गायकवाड (कर्णधार), साई सुदर्शन, रजत पाटीदार, अभिषेक पोरेल (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, बी इंद्रजीत, हृतिक शौकीन, मानव सुथार, गौरव यादव, विशाक विजयकुमार, अंशुल खांबोज, हिमांशु मार्कन, मयांश चमानंद , संदीप वारियर.
भारत D- श्रेयस अय्यर (कर्णधार), अथर्व तायडे, यश दुबे, देवदत्त पडिक्कल, इशान किशन (यष्टीरक्षक), रिकी भुई, सरांश जैन, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, आदित्य ठाकरे, हर्षित राणा, तुषार देशपांडे, आकाश सेनगुप्ता, केएस भगत , सौरभ कुमार.
हे ही वाचा:
PAK vs BAN: बांगलादेशने रचला इतिहास. पाकिस्तानात जाऊन पाकिस्तानला लोळवले, जिंकली संपूर्ण सिरीज..!