Viral Video: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची फलंदाज एलिस पेरीने मारला एवढा जबरदस्त षटकार की, गाडीचा काच फुटला; व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल.

0

Ellyse Perry Six:  रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची फलंदाज एलिस पेरी सोमवारी यूपी वॉरियर्सविरुद्ध (RCBW vs UPW) खेळल्या गेलेल्या सामन्यात जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत होती. तिने या सामन्यात जबरदस्त षटकार आणि चौकार मारून गोलंदाजांच्या नाकात दम केलं. स्मृती मानधना पॅव्हेलियनमध्ये परतल्यानंतर एलिस पेरीच्या झंझावाती फलंदाजीमुळे यूपी वॉरियर्सची गोलंदाजी विस्कळीत झाल्याचे दिसून आले.

या धडाकेबाज खेळीदरम्यान एलिस पेरीने असा षटकार मारला की, मैदानाच्या बाहेर ठेवलेल्या स्पोन्सर  कारच्या काचा फुटल्या. या  षटकाराचा व्हिडीओ आता सोशल मिडीयावर तुफान व्हायरल होत आहे.

Ellyse Perry

एलिस पेरीच्या षटकाराने  कारच्या काचा फोडल्या,व्हिडीओ व्हायरल.

 

महिला प्रीमियर लीगच्या दुसऱ्या आवृत्तीचा 11 वा सामना सोमवारी खेळला गेला. बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी क्रिकेट स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि यूपी वॉरियर्स यांच्यात सामना झाला. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या स्मृती मानधना संघाची कामगिरी उत्कृष्ट ठरली. दरम्यान, मधल्या फळीतील फलंदाज एलिस पेरीने दमदार खेळी खेळत प्रेक्षकांचे मनोरंजन केले.

 

तिने  37 चेंडूंत चार चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने 58 धावांची तुफानी खेळी खेळली.  याचदरम्यान तिने एक असा षटकार मारला की, मैदानात उभ्या असलेल्या टाटा पंच कारच्या काचा फुटल्या. हा व्हिडीओ अगदी काही वेळातच सोशल मिडीयावर तुफान व्हायरल झाला आहे.

 

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या डावातील 19व्या षटकात दीप्ती शर्मा गोलंदाजीसाठी आली होती. या षटकाच्या पाचव्या चेंडूवर तिने एलिस पेरीचा सामना केला. गोलंदाजाने टाकलेल्या चेंडूवर एलिस पेरीने मिड-विकेटच्या दिशेने सरकत मोठा षटकार मारला आणि चेंडू स्टँडवर उभ्या असलेल्या कारच्या काचेवर जाऊन आदळला. यानंतर काच फुटली आणि चेंडू आत गेला.

पहा व्हायरल व्हिडीओ,

हा षटकार पाहून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे शिबिर उत्साहात नाचताना दिसले. कॅप्टन स्मृती मानधनाही आनंदाने उड्या मारताना दिसली.  आरसीबीने हा सामना 23 धावांनी जिंकला.गुणतालिकेमध्ये आरसीबी 5 पैकी 3सामने जिंकून तिसऱ्या स्थानावर आहे. तर दिल्ली आणि मुंबई इंडियन्स अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर आहेत.


==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

हेही वाचा:

Leave A Reply

Your email address will not be published.