ENG vs AUS: ‘मी माझ्या लोकांची निराशा केली..’ विश्वचषकातून बाहेर पडल्यानंतर जॉस बटलरने केले मोठे वक्तव्य…

0
2

ENG vs AUS: अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया (ENG vs AUS) यांच्यात वर्ल्ड कपचा 38 वा सामना खेळला गेला. इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाचा संघ 286 धावांवर सर्वबाद झाला.या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ 253 धावांवर आटोपला आणि ऑस्ट्रेलियाने 33 धावांनी सामना जिंकला. या सामन्यातील पराभवानंतर इंग्लंडचा कर्णधार जॉस बटलरचे मन दु:खी झाले. पराभवानंतर जॉस बटलरने मोठे वक्तव्य केले आहे.

"सब मेरी गलती है...", वर्ल्ड कप से बाहर होने पर टूटा जोस बटलर का दिल, बताया इंग्लैंड से कहां हुई चूक

ENG vs AUS:पराभवानंतर जोस बटलरने तोडले मौन, या खेळाडूंवर फोडले पराभवाचे खापर..

या सामन्यात पहिल्यांदाच इंग्लंडचा संघ धावसंख्येचा पाठलाग करेल असे वाटत होते, पण नंतर तीच जुनी अडचण समोर आली.अॅडम झाम्पाच्या 10 षटकांनी इंग्लंडला खूप त्रास दिला आणि त्याच्या गोलंदाजीने सामन्याची दिशाच बदलून टाकली. इंग्लंडच्या मधल्या फळीने थोडी जबाबदारी दाखवली असती तर कदाचित सामन्याचा निकाल त्यांच्या बाजूने लागला असता. इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरचे मन दु:खी झाले.तो सामना संपल्यानंतर म्हणाला,

 

“हा सामना गमावल्यामुळे आमचे विश्वचषकातील आव्हाल संपुष्टात आले आहे त्यामुळे खूप दुख होत आहे. आम्ही स्वतःला न्याय दिला नाही. 2023 मध्ये विजयाची उंची गाठणे खूप कठीण आहे आणि त्यासाठी किती मेहनत घ्यावी लागेल हे सर्वांनाच माहीत आहे. आम्ही लोकांची निराशा केली आहे.

 

झाम्पा आणि स्टार्क यांच्यातील भागीदारी त्रासदायक ठरली. धावसंख्येचा पाठलाग करणे सोपे जाईल असे वाटत होते. मी खेळलेल्या शॉटमध्ये काहीही चूक नव्हती, पण मी तो योग्य प्रकारे खेळू शकलो नाही.”

 

“मी स्वतःला आणि माझ्या टीमला निराश केले”-जॉस बटलर

जॉस बटलर हा इंग्लंडच्या सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे. बटलर जेव्हा खेळतो तेव्हा तो मोठी खेळी खेळतो हे सर्वांना माहीत आहे, पण या विश्वचषकात त्याची बॅट पूर्णपणे शांत राहिली. त्यामुळे इंग्लंडच्या दुर्दशेची जबाबदारी त्याने स्वत: घेतली आहे, असं बोलत असताना तो म्हणाला,

“आम्ही चेंडूवर चांगली कामगिरी केली, परंतु आम्ही आणखी चांगले करू शकलो असतो, आम्ही त्यांना निराशाजनक छोट्या भागीदारी तयार करण्यास परवानगी दिली. आजूबाजूला दव असल्याने आम्ही आमचा हात धरला आणि ३० धावा कमी पडल्या. शेवट चांगला झाला नाही.

ENG vs AUS: 'मी माझ्या लोकांची निराशा केली..' विश्वचषकातून बाहेर पडल्यानंतर जॉस बटलरने केले मोठे वक्तव्य...

मी जमेल तसे खेळले नाही, अशा महत्त्वाच्या परिस्थितीत मी स्वतःला आणि माझ्या संघाला निराश केले असे मला वाटते. माघारी परतण्याचा एकमेव मार्ग म्हणजे नेटमध्ये कठोर परिश्रम करणे आणि पुढील सामन्यात चांगले पुनरागमन करणे.”

उर्वरीत सामन्यात चांगली कामगिरी करून आम्ही शेवट गोड करण्याचा नक्की प्रयत्न करू,असेही यावेळी बटलर  म्हणाला..


हेही वाचा:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here