ENG VS NZ: 4,0,4,1,2,6.. जो रूट जबरदस्त फॉर्ममध्ये, न्यूझीलंडच्या गोलंदाजांची धुलाई करत ठोकले वर्ल्डकपमधील पहिले अर्धशतक, पहा व्हिडीओ..
ICC विश्वचषक 2023 (ODI WORLDCUP 2023) चा पहिला सामना इंग्लंड आणि न्यूझीलंड (Eng vs Nz) यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अशा स्थितीत विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात इंग्लंड प्रथम फलंदाजीसाठी उतरला. यादरम्यान इंग्लंडचा सलामीवीर जो रूटने विश्वचषकातील पहिले अर्धशतक झळकावले आहे. जो रूटने कठीण काळात संघाची धुरा सांभाळली आणि संघासाठी अर्धशतक झळकावले. रुटने अवघ्या 57 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. आपले अर्धशतक पूर्ण करण्यासाठी रूटने 2 चौकार आणि 1 षटकारही लगावला.
जो रूटच्या अर्धशतकाने सावरला इंग्लंडचा डाव, 30 षटकात पार केला 150 धावांचा आकडा..
प्रथम फलंदाजी करण्यास उतरलेल्या इंग्लंड संघाची सुरवात फारसी चांगली झाली नाही. सलामीवीर डेव्हिड मलान च्या रूपाने संघाला पहिला झटका लागला तो 40 धावावर.. त्यानंतर जॉनी बेअरस्टो, मोईन अली,कर्णधार जॉस बटलर हे सुद्धा संघासाठी फार मोठी अशी खेळी न करता बाद झाले.
संघाची धावसंख्या कासवाच्या गतीने पुढे सरकत असतांना जो रूटने एका बाजूने न्यूझीलंडच्या गोलंदाजावर हल्ला सुरु ठेवला. शेवटचे वृत्त हाती आहे तेव्हा इंग्लंड संघाने 35 षटकात 5 गडी गमावून 200 धावा केल्या होत्या. जो रूट 59* धावा काढून खेळत आहे तर त्याच्या सोबत साथीला लिव्हिंगस्टन नाबाद १२* धावा काढून खेळत आहे.
हेही वाचा:
शुभमन गिल सारा पुन्हा पडले एकमेकांच्या प्रेमात?.. ब्रेकअप नंतर दोघेही पुन्हा एकत्र, फोटो व्हायरल..