ENG vs NZ live: विश्वचषकाच्या 48 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच घडला असा विक्रम, पहिल्याच सामन्यात इंग्लंड संघाने नावावर केला अनोखा विक्रम..

ENG vs NZ

ENG vs NZ live: विश्वचषकाच्या 48 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच घडला असा विक्रम, इंग्लंड संघाने नावावर केला अनोखा विक्रम..


आजपासून क्रिकेट विश्वचषक २०२३ (World cup 2023) सुरू झाला आहे. पहिल्या सामन्यात इंग्लंड आणि न्यूझीलंडचे संघ आमनेसामने आहेत. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर उभय संघांमधील सामना खेळला जात आहे. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या इंग्लंडने 50 षटकांत 9 गडी गमावून 282 धावा केल्या.

त्याचबरोबर जोस बटलरच्या नेतृत्वाखालील इंग्लंडने या पहिल्या सामन्यात एक आश्चर्यकारक विक्रम केला आहे. खरं तर, विश्वचषकाच्या ४८ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच हा विक्रम घडलाय . ज्यामुळे तो चर्चेचा विषय बनला आहे.

विश्वचषक स्पर्धेच्या ४८ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच असे घडले, इंग्लंड संघाची कमाल.

आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत याआधी असे कधीही घडले नव्हते, जेव्हा एका संघातील सर्व 11 खेळाडूंनी दुहेरी धावसंखेचा आकडा गाठला होता. न्यूझीलंडविरुद्ध इंग्लंडच्या फलंदाजांबद्दल बोलायचे झाले तर सलामीवीर जॉनी बेअरस्टोने 35 चेंडूत 33 धावा केल्या. तर डेव्हिड मलानने 24 चेंडूत 14 धावांचे योगदान दिले. याशिवाय जो रूट, हॅरी ब्रूक, मोईन अली, जोस बटलर आणि लियाम लिव्हिंगस्टोन यांनी अनुक्रमे 77, 25, 11, 43 आणि 20 धावा केल्या.

ENG vs NZ live: विश्वचषकाच्या 48 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच घडला असा विक्रम, इंग्लंड संघाने नावावर केला अनोखा विक्रम..

इंग्लंडच्या फलंदाजांनी केला एक अप्रतिम विक्रम…

अनुभवी अष्टपैलू खेळाडू सॅम करणने 19 चेंडूत 14 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याचवेळी ख्रिस वोक्सने 12 चेंडूत 11 धावांचे योगदान दिले. आदिल रशीद 13 चेंडूत 15 धावा करून नाबाद परतला. तर मार्क वुडने 14 चेंडूत नाबाद 13 धावा केल्या अशा प्रकारे इंग्लंडच्या सर्व 11 खेळाडूंनी दुहेरी आकडा पार केला.  वर्ल्डकपच्या इतिहासामध्ये आजपर्यंत  एकाही संघाच्या सर्व खेळाडूंनी दुहेरी धावसंख्या केली नव्हती. त्यामुळे हा अनोखा विक्रम आता इंग्लंडच्या नावावर झाला आहे.

ENG vs NZ

ENG VS NZ सामन्याची स्थिती

या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, इंग्लंडने न्यूझीलंडसमोर विजयासाठी 283 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. न्यूझीलंडला हा सामना जिंकायचा असेल तर निर्धारित 50 षटकात हे आव्हान पूर्ण करावे लागेल. न्यूझीलंडची फलंदाजी तशी चांगली असली तरीदेखील इंग्लंडची गोलंदाजी सुद्धा कमी नाहीये. म्हणून हे चेस रोमांचक होणार एवढ नक्की. आता हा सामना कोण जिंकतो हे काही वेळातच कळेल.


हेही वाचा:

ODI वर्ल्डकप 2023 नंतर टीम इंडियातील ‘हे’ 3 स्टार खेळाडू होऊ शकतात निवृत्त, स्वतः दिग्गज खेळाडूने दिले संकेत..

शुभमन गिल सारा पुन्हा पडले एकमेकांच्या प्रेमात?.. ब्रेकअप नंतर दोघेही पुन्हा एकत्र, फोटो व्हायरल..

टेलेंट असूनही या 4 खेळाडूंना कधीही संघात जागा मिळाली नाही, एकाने तर केले होते जबरदस्त प्रदर्शन तरीही केवळ 2 वर्षचं टिकली क्रिकेट कारकीर्द..

ODI वर्ल्डकप 2023 नंतर टीम इंडियातील ‘हे’ 3 स्टार खेळाडू होऊ शकतात निवृत्त, स्वतः दिग्गज खेळाडूने दिले संकेत