ENG VS NZ LIVE: 23 वर्षाच्या रचीन रविंद्रने इंग्लंडच्या गोलंदाजाना फोडून काढत रचला इतिहास, पहिला विश्वचषक खेळतांना पहिल्याच सामन्यात ठोकले शानदार शतक..!
ICC ODI विश्वचषक (ICC World Cup 2023) चा पहिला सामना इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जात आहे. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून इंग्लंडला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. इंग्लंडने 50 षटकांत 9 गडी गमावून 282 धावा केल्या. अशाप्रकारे न्यूझीलंडला विजयासाठी 283 धावांचे आव्हान देण्यात आले होते.
न्यूझीलंडसाठी डेव्हॉन कॉनवे आणि विल यंग ही सलामीची जोडी मैदानात उतरली, पण दुसऱ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर न्यूझीलंडला पहिला धक्का बसला. सॅम करणने विल यंगला बाद करून किवी संघाला पहिला धक्का दिला. यासह न्यूझीलंडची धावसंख्या 1 विकेटवर 10 धावा झाली.
युवा रचिन रवींद्रने रचला इतिहास , पहिल्याच सामन्यात ठोकले शतक..
विल यंग बाद झाल्यानंतर २३ वर्षीय रचिन रवींद्र मैदानात आला. रचिनचा विश्वचषकातील हा पहिलाच सामना आहे. रचिनने डेव्हॉन कॉनवेला चांगली साथ दिली. संधी मिळताच मोठे फटके मारले. या दोघांनी पॉवर प्लेचा चांगला फायदा घेतला, पण सेट झाल्यानंतर रचिन अधिक आक्रमक झाला. या दोघांनी मिळून इंग्लंडच्या प्रत्येक गोलंदाजांची धुलाई केली.
रचिनने इंग्लंडच्या गोलंदाजाचा वाईट पद्धतीने समाचार घेतला. अशाप्रकारे रचिनने विश्वचषकातील कारकिर्दीतील पहिल्याच सामन्यात षटकार ठोकून पहिले शतक झळकावले. डावखुऱ्या फलंदाजाने षटकार ठोकत आपले शतक पूर्ण केले.
डेवोन कॉनवे-रचिन रवींद्र ने इंग्लंडच्या गोलंदाजांचा घेतला भरपूर समाचार..
न्यूझीलंडच्या या युवा जोडीने इंग्लंडच्या सर्वच गोलंदाजाना पाणी पाजले आहे. इंग्लंडचे अनुभवी गोलंदाज या युवा जोडीपुढे फिके पडताना दिसले. महत्वाचे म्हणजे इंग्लंडचा कर्णधार जॉस बटलरने यावेळी 7 गोलंदाजांचा वापर केला मात्र एकही गोलंदाज या जोडीची भागीदारी तोडू शकला नाही. या जोडीच्या कामगिरीमुळे न्यूझीलंड हा सामना अगदी सहज जिंकण्याच्या वाटेवर आहे.
न्यूझीलंडला जिंकण्यासाठी हव्या फक्त 15 धावा
युवा खेळाडूने ज्याप्रकारे इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई केलीय ते पाहून न्यूझीलंडचे खेळाडू स्फोटक फोर्ममध्ये आहेत, हे दिसून येतेय. 263 धावाचे लक्ष केवळ 38 षटकात पार करण्याच्या जवळ न्यूझीलंड येऊन पोहचला आहे. येणाऱ्या सामन्यामध्ये ही जोडी न्यूझीलंड साठी नक्कीच महत्वाची ठरणार आहे. हा सामना आता जवळजवळ न्यूझीलंडने जिंकला आहे .त्यांना 90 चेंडूमध्ये केवळ 15धावांची आवश्यकता आहे. जे सहज शक्य आहे.
हेही वाचा:
शुभमन गिल सारा पुन्हा पडले एकमेकांच्या प्रेमात?.. ब्रेकअप नंतर दोघेही पुन्हा एकत्र, फोटो व्हायरल..