ENG vs NZ LIVE: न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथमने नाणेफेक जिंकून घेतला प्रथम गोलंदाजी करण्याच्या निर्णय, केन विल्यमसन बाहेर तर बेन स्टोक्स.. असे आहे दोन्ही संघ…
इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड विश्वचषक 2023 : आयसीसी क्रिकेट विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर इंग्लंड आणि न्यूझीलंड (Eng vs Nz) यांच्यात सामना खेळला जात आहे.
ENG vs NZ LIVE: टॉम लॅथमने नाणेफेक जिंकला, गोलंदाजी करण्याचा घेतला निर्णय..
या सामन्यात नाणेफेक जिंकल्यानंतर न्यूझीलंडने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. हे दोन संघ 2019 च्या अंतिम फेरीत आमनेसामने आले होते ज्यात इंग्लंडने न्यूझीलंडचा पराभव करत विश्वचषक ट्रॉफी जिंकली होती. अशा परिस्थितीत या सामन्यात देखील चुरशीची स्पर्धा होईल, अशी आशा चाहत्यांना आहे.
दुखापतीतून अद्याप पूर्णपणे सावरलेला नसल्यामुळे न्यूझीलंडला सलामीच्या सामन्यात कर्णधार केन विल्यमसनची उणीव भासेल. विल्यमसनच्या अनुपस्थितीत टॉम लॅथम ब्लॅक कॅप्सचे नेतृत्व करेल. ही मुख्यतः हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स, जो रूट आणि जोस बटलर यांचा समावेश असलेल्या इंग्लंडच्या आक्रमक फलंदाजी युनिटविरुद्ध न्यूझीलंडच्या स्टार-स्टडड बॅटिंग लाइनअपमधील लढत असेल.
अशी आहे दोन्ही संघाची प्लेईंग 11
इंग्लंड (प्लेइंग इलेव्हन): जॉनी बेअरस्टो, डेविड मलान, जो रूट, हॅरी ब्रूक, जोस बटलर (विकेटकीपर), लियाम लिव्हिंगस्टोन, मोईन अली, सॅम कुरन, ख्रिस वोक्स, आदिल रशीद, मार्क वुड.
No Kane Williamson For NZ
No Ben Stokes For ENG#WorldCup2023 #ENGvNZ #Cricket #Ahmedabad pic.twitter.com/C395dgBu6J— Jega8 (@imBK08) October 5, 2023
न्यूझीलंड (प्लेइंग इलेव्हन): डेव्हॉन कॉनवे, विल यंग, रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, मॅट हेन्री, मिचेल सँटनर, जेम्स नीशम, ट्रेंट बोल्ट.
इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड आमना सामना, कोण कोणावर भारी?
इंग्लंड आणि न्यूझीलंड याआधी 95 एकदिवसीय सामन्यांमध्ये आमनेसामने आले आहेत आणि दोन्ही संघांनी 44-44 सामने जिंकले आहेत. अशा परिस्थितीत आज जो संघ जिंकेल त्याचाच वरचष्मा असेल.