ENG vs NZ: डेव्हॉन कॉनवे आणि रचिन रवींद्र शतकांच्या जोरावर न्यूझीलंडने केला इंग्लंडचा पराभव, विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यात न्यूझीलंडने दाखवली आपली ताकत..

विश्वचषक 2023 (World Cup 2023) च्या पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने गतविजेत्या इंग्लंडचा  (ENG vs NZ)पराभव केला आहे. या सामन्यात प्रथम खेळताना इंग्लंडने निर्धारित 50 षटकात 282 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात डेव्हॉन कॉनवे आणि रचिन रवींद्रच्या विक्रमी शतकी खेळीच्या जोरावर न्यूझीलंडने किवी संघाला 9 विकेट्सने सहज विजय मिळवून दिला.

या सामन्याची विशेष बाब म्हणजे ,न्यूझीलंड संघाने 36.2 षटकात केवळ एक विकेट गमावून 40 षटकांच्या आत विजय मिळवला. न्यूझीलंडने 10 धावांच्या स्कोअरवर पहिली विकेट गमावली आणि विल यंग खाते न उघडता सॅम करनचा बळी ठरला. यानंतर डेव्हॉन कॉनवेने 121 चेंडूत नाबाद 152 धावा आणि रचिन रवींद्रने 96 चेंडूत नाबाद 123 धावा करत विश्वविजेत्या संघाचा पराभव केला.

ENG VS NZ LIVE: 23 वर्षाच्या रचीन रविंद्रने इंग्लंडच्या गोलंदाजाना फोडून काढत रचला इतिहास, पहिला विश्वचषक खेळतांना पहिल्याच सामन्यात ठोकले शानदार शतक..!

ENG vs NZ :कॉनवे आणि रचिन यांनी विक्रमी शतके ठोकली

या सामन्यात डेव्हॉन कॉनवे आणि रचिन रवींद्र यांनी 273 धावांची नाबाद भागीदारी केली. न्यूझीलंडसाठी विश्वचषकातील ही सर्वात मोठी भागीदारी ठरली. तसेच, दोघांनीही पदार्पणाच्या विश्वचषकात शतके झळकावली. रचिनने 82 चेंडूत तर कॉनवेने 83 चेंडूत शतक झळकावले. एकदिवसीय विश्वचषक पदार्पणाच्या सामन्यात शतक झळकावणारे दोघेही न्यूझीलंडचे अनुक्रमे चौथे आणि पाचवे क्रिकेटपटू ठरले.

ENG vs NZ: डेव्हॉन कॉनवे आणि रचिन रवींद्र शतकांच्या जोरावर न्यूझीलंडने केला इंग्लंडचा पराभव, विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यात न्यूझीलंडने दाखवली आपली ताकत..

ENG vs NZ: रचिन रवींद्रचा दुहेरी चमत्कार

रचिन रवींद्रने पहिल्याच गोलंदाजीत हॅरी ब्रूकची विकेट घेत विश्वचषकात आपली पहिली विकेट घेतली. त्यानंतर फलंदाजीत शतक झळकावून न्यूझीलंडसाठी विश्वचषकात सर्वात जलद शतक ठोकण्याचा विक्रमही आपल्या नावावर केला. तसेच, हे त्याचे पहिले एकदिवसीय शतक होते. अशाप्रकारे न्यूझीलंडने 2019 विश्वचषक फायनलमधील पराभवाचा बदलाही इंग्लंडकडून घेतला. विश्वचषक 2023 चा दुसरा सामना आता शुक्रवारी पाकिस्तान आणि नेदरलँड यांच्यात होणार आहे.

हेही वाचा:

ODI वर्ल्डकप 2023 नंतर टीम इंडियातील ‘हे’ 3 स्टार खेळाडू होऊ शकतात निवृत्त, स्वतः दिग्गज खेळाडूने दिले संकेत..

शुभमन गिल सारा पुन्हा पडले एकमेकांच्या प्रेमात?.. ब्रेकअप नंतर दोघेही पुन्हा एकत्र, फोटो व्हायरल..

टेलेंट असूनही या 4 खेळाडूंना कधीही संघात जागा मिळाली नाही, एकाने तर केले होते जबरदस्त प्रदर्शन तरीही केवळ 2 वर्षचं टिकली क्रिकेट कारकीर्द..

ODI वर्ल्डकप 2023 नंतर टीम इंडियातील ‘हे’ 3 स्टार खेळाडू होऊ शकतात निवृत्त, स्वतः दिग्गज खेळाडूने दिले संकेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *