श्रीलंकेला हरवून इंग्लंड थेट सेमीफायनलध्ये गेल्यामुळे श्रीलंकेसोबत ऑस्त्रोलीया देखील वर्ल्डकप मधून बाहेर फेकली गेलीय..
टी-२० विश्वचषकाच्या काही अंतिम सामने आता खेळवले जात आहे. सुपर १२ फेरीतील ग्रुप १ चा अंतिम सामना आज श्रीलंका आणि इंग्लंडमध्ये खेळवला गेला. ज्यात इंग्लंडने श्रीलंकेवर दोन चार गडी राखून विजय मिळवत सेमीफायनलमध्ये थाटामाटात हजेरी लावली आहे. इंग्लंडच्या या विजयामुळे मात्र श्रीलंकेसोबतच ऑस्ट्रोलीयाचे सुद्धा सेमीफायनल खेळण्याचे स्वप्न भंगले आहे.
सुरवातीला नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निणर्य घेऊन श्रीलंकेने २० षटकात १४१ धावा करत इंग्लंडसमोर विजयासाठी १४२ धावांचे माफक लक्ष ठेवले होते. इंग्लंडसारख्या तगड्या संघाला हे आव्हान काही मोठे नव्हते, हे तेव्हाच लक्षात आले होते. आणि झालेही तसेच हेल्स आणि बेन स्टोक्सच्या तुफानी फलंदाजीने इंग्लंडने हा सामना सहज जिंकला आणि विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये इंट्री मारली.
View this post on Instagram
इंग्लंडकडून लक्षाचा पाठलाग करतांना हेल्स आणि बेन स्टोक्स या दोघांनी तुफानी फटकेबाजी केली. बेस स्टोक्सने ३६ चेंडूतनाबाद ४२ धावांची खेळी केली तर हेल्सने ३० चेंडूत ४७ धावांची आक्रमक खेळी खेळली. याखेरीज जॉस बटलरने २८ धावांचे योगदान देत संघाच्या विजयात महत्वाचा रोल निभावला.
सुरवातीपासूनच श्रीलंकेच्या गोलंदाजावर तुटून पडलेल्या इंग्लंडच्या सलामीवीरांनी पहिल्या विकेट्ससाठी तब्बल ७५ धावांची भागेदारी केली, ज्यामुळे संघातील इतर फलंदाजावर दडपण न येता खेळण्याची संधी मिळाली आणि त्याची त्याचा पुरेपूर फायदा उचलला. श्रीलंकेच्या गोलंदाजांना शेवटपर्यंत त्यांनी सामन्यात वापसी करण्याची संधी दिली नाही.

श्रीलंकेकडून महेश तीक्षना,कुमारा यांसारख्या स्टार गोलंदाजाना एकही गडी बाद करता आला नाही तर हसरंगा आणि दे सलवायांनी अनुक्रम २/२ गाडी बाद केले. परंतु त्यांची कामगिरी इंग्लंडच्या फलंदाजासमोर फिकी पडली आणि इंग्लंडने हा सामना २ चेंडू आणि चार गडी राखून आपल्या खिशात घातला.
यासोबतच पहिल्या ग्रुपमधील सेमीफायनल खेळणारे २ संघ आता समोर आले आहेत. न्यूझीलंड आणि इंग्लंड हे दोन संघ पहिल्या ग्रुपमधून सेमीफायनल खेळण्यास क़्वलिफ़ाय झाले आहेत. आता उद्या आणि परवा ग्रुप २ चे चित्र स्पष्ट होईल..
हेही वाचा:
या कारणांमुळे पंजाब किंग्सने मयंक अगरवालचा पत्ता केला कट, आता हा खेळाडू झाला पंजाब किंगचा कर्णधार..