England vs Sri Lanka : इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी श्रीलंकेच्या गोलंदाजीने चमकदार कामगिरी केली. खराब हवामान असतानाही श्रीलंकेच्या गोलंदाजांनी इंग्लिश फलंदाजांना खूप त्रास दिला. असिथा फर्नांडो आणि प्रभात जयसूर्या यांच्या शानदार गोलंदाजीमुळे श्रीलंकेने इंग्लंडला दडपणाखाली ठेवले. मात्र, यजमानांचे फलंदाज जेमी स्मिथ आणि हॅरी ब्रूक यांनी अर्धशतके झळकावून संघाची स्थिती मजबूत केली. यादरम्यान अनुभवी फलंदाज जो रूटने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला.
England vs Sri Lanka : जो रूट WTC 2023-25 मध्ये सर्वांत जास्त धावा काढून नंबर-1 फलंदाज ठरला!
जो रूट, जो सध्या कसोटी क्रिकेटमधील अव्वल फलंदाजांपैकी एक आहे, तो वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-25 (WTC 2023-25) मध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनला आहे. त्याने युवा भारतीय फलंदाज यशस्वी जैस्वालला मागे टाकले. सध्याच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप सायकलमध्ये रूट आता नंबर-1 बॅट्समन बनला आहे. त्याच्या खात्यात 14 सामन्यांच्या 24 डावात 1065 धावा जमा आहेत. रूटने 3 शतके आणि 5 अर्धशतके केली आहेत. इंग्लंडच्या या फलंदाजाची सरासरी ४८.४० आहे.
याआधी 2023-25 च्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये यशस्वी जैस्वालच्या नावावर सर्वाधिक धावा झाल्या होत्या. त्याने 9 कसोटी सामन्यांमध्ये 1028 धावा केल्या आहेत. त्याने 68.53 च्या सरासरीने धावा केल्या आहेत. यशस्वीच्या खात्यात ३ शतके आणि ४ अर्धशतके आहेत. त्याला मागे टाकण्यासाठी रूटला 6 धावांची गरज होती. श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या डावात त्याने 42 धावा केल्या होत्या. त्याने 57 चेंडूंचा सामना केला. या काळात 4 चौकार मारले. जैस्वालला बांगलादेशविरुद्धच्या मालिकेत रूटला मागे टाकण्याची संधी असेल.
England vs Sri Lanka: सामन्याची स्थिती.
पावसामुळे दिवसाची सुरुवात उशिरा झाली, पण खेळ सुरू झाल्यावर श्रीलंकेच्या गोलंदाजांनी चांगली सुरुवात केली. असिथा फर्नांडोने इंग्लंडच्या दोन विकेट लवकर सोडल्या. यानंतर जो रूट आणि डॅन लॉरेन्सने डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला, पण श्रीलंकेच्या गोलंदाजांनी त्यांनाही बाद केले. बेन डकेट 18 धावा करून बाद झाला, कर्णधार ऑली पोप 6 धावा करून बाद झाला आणि डॅन लॉरेन्स 30 धावा करून बाद झाला.
हॅरी ब्रूक आणि जेमी स्मिथची अर्धशतके
इंग्लंडचा डाव अडचणीत आला होता, पण हॅरी ब्रूक आणि जेमी स्मिथ यांनी आपल्या शानदार फलंदाजीने संघाला सांभाळले. ब्रूकने आक्रमक फलंदाजी करत अर्धशतक झळकावले, पण जयसूर्याच्या शानदार गोलंदाजीमुळे तो बाद झाला. जेमी स्मिथने 72 धावांची नाबाद खेळी खेळली आणि इंग्लंडला पहिल्या डावात 6 गडी गमावून 259 धावा करता आल्या. हॅरी ब्रूक 73 चेंडूत 56 धावा करून बाद झाला. ख्रिस वोक्स 65 चेंडूत 25 धावा करून बाद झाला.
हे ही वाचा:
- IND vs IRE Live Streaming: विश्वचषकातील टीम इंडियाचा पहिला सामना आज, पहा कधी? कुठे किती वाजता सुरु होणार पहिला सामना…!
- BIG UPSET: विश्वचषकात अमेरिकेने पाकिस्तान संघाचा केला पराभव, लज्जास्पद कामगिरीमुळे भडकला बाबर आझम, केले मोठे वक्तवय..