विराट कोहली: इंडियन प्रीमियर लीग 22 मार्चपासून सुरू झाला आहे. या लीगचा हा यंदाचा 17 वा हंगाम आहे. एवढ्या वर्षांमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळूर संघाला आपले नशीब बदलवता आले नाही. आयपीएल किताब जिंकण्याचे स्वप्न त्यांना पूर्ण करता आले नाही. यंदाच्या हंगामात ही बंगलोरच्या संघाने सलग चार सामने गमावले आहे. शनिवारी जयपूरच्या सवाई मानसिंह स्टेडियमवर झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने त्यांचा सहा गडी राखून पराभव केला.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या विराट कोहलीने शतक देखील ठोकले. तसे पाहिले तर विराट यंदाच्या हंगामातला टॉप स्कोरर राहिला आहे. त्याने 5 सामन्यात 316 सर्वाधिक धावा केल्या आहेत. यासह त्याचा स्ट्राईक रेट 146.29 असा आहे. या खेळीत त्याने एक शतक आणि दोन अर्धशतके ठोकली आहेत. त्याच्या दमदार कामगिरीमुळे ऑरेंज कॅप त्याच्या जवळ आहे.
किंग कोहली वगळता आयपीएलच्या यंदाच्या हंगामात आरसीबीच्या कोणत्याही इतर खेळाडूला खास कामगिरी करता आली नाही. आरसीबीने जगातल्या दिग्गज खेळाडूंवर कोट्यावधी रुपये पाण्यासारखा खर्च करून देखील ही त्यांना म्हणावी तशी कामगिरी या खेळाडूंनी करून दाखवली नाही. याच खेळाडूंच्या कामगिरीवर एक नजर टाकूया.
विराट कोहली वगळता या 5 स्टार खेळाडूंना आरसीबीसाठी आयपीएल 2024 मध्ये करता नाही आली विशेष कामगिरी..
1.ग्लेन मॅक्सवेल
ऑस्ट्रेलियाचा दिग्गज अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेल याने पाच डावात 32 धावा केल्या आहेत. विशेष म्हणजे तो दोन वेळा एकदाही खाते न खोलता शून्य धाव संख्येवर माघारी परतला. मॅक्सवेल यंदाच्या आयपीएल वर्षांमध्ये धावा काढण्यासाठी संघर्ष करतोय. गोलंदाजी मध्ये त्याला थोडेफार यश आले. त्याने आयपीएल मध्ये पाच डावात चार बळी घेतले आहे. ग्लेन मॅक्सवेल ने त्याला 11 कोटी रुपयांमध्ये खरेदी करून आपल्या संघात सामील करून घेतले.
2. कॅमरन ग्रीन
आयपीएल 2023 मध्ये कॅमरन ग्रीन हा मुंबई इंडियन्स संघाचा सदस्य होता. त्याला बंगळूरच्या संघाने ट्रेडिंग विंडो च्या माध्यमातून आपल्या संघात दाखल केले. कॅमरनसाठी आरसीबीने 17.50 कोटी रुपये खर्च केले आहे. मात्र हा कंगारू खेळाडू आत्तापर्यंत फेल गेला आहे. त्याने पाच सामन्यात केवळ 68 धावा केल्या आहेत.
3.फाफ डुप्लेसिस
आरसीबीचा कर्णधार फाफ डुप्लेसिस याला दमदार कामगिरी करता आली नाही. त्याने पाच डावात 109 धावा केल्या आहेत. राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात आरसीबीच्या या कर्णधाराने 44 धावा केल्या होत्या. यासाठी त्याने 33 चेंडू खेळून काढले. फाफ डुप्लेसीस याला आयपीएल 2022 च्या ऑप्शन मध्ये बंगळूरूने सात कोटी रुपयांमध्ये खरेदी केले होते.
4.मोहम्मद सिराज
आरसीबीच्या गोलंदाजीचा कणा मांडला जाणारा मोहम्मद सिराज हा यंदाच्या आयपीएलमध्ये फेल गेला. त्याच्या गोलंदाजी मध्ये पूर्वीसारखी धार राहिली नाही. तो अशी कामगिरी करेल असा विचार देखील कोणी केला नव्हता. त्याने पाच सामन्यात चार विकेट घेतले आहेत. यासह त्याचा इकॉनॉमिक रन रेट 10.10 चा होता. आरसीबीने त्याला सात कोटी रुपये देऊन रिटर्न केले होते.
5.मयंक डागर
फिरकी गोलंदाज मयंक डागर याला विशेष परफॉर्मन्स दाखवता आला नाही. त्याला पाच सामन्यात केवळ एकच बळी मिळवता आला. यासह त्याचा इकॉनॉमिक रन रेट 10.14 चा राहिला आहे. कोणत्याही फिरकी गोलंदाजावर मिडल ओवर्स मध्ये रन रोखणे आणि विकेट घेणे ही जबाबदारी असते. मात्र ही जबाबदारी पेलण्यामध्ये मयंक फेल गेला. आरसीबीने त्याला 1.80 कोटी रुपयांमध्ये खरेदी केले होते.
====
आमचे ईतर लेख आणि ट्रेंडीग बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.