प्रामुख्याने आपल्या देशाचा राष्ट्रीय खेळ हा हॉकी आहे परंतु आपल्या देशात सर्वाधिक लोकांना क्रिकेट खेळाचे वेड आहे. आपल्या देशात लहान मुलापासून ते वयोवृद्ध लोकांपर्यंत प्रत्येकालाच क्रिकेट चे वेड आहे हे आपल्याला माहीतच आहे.
क्रिकेट मधील खेळाडूं ची जीवनशैली ही अत्यंत वेगळी आहे. सर्वसामान्य लोकांच्या तुलनेत त्यांचे राहणीमान हे उच्च दर्जाचे असते. महागडी घरे, महागड्या गाड्या, चैनीच्या वस्तू यामुळे खेळाडू नेहमी चर्चेत असतात.

तर मित्रांनो आज आम्ही या लेखात तुम्हाला अश्या काही भारतीय फलंदाजांबद्दल सांगणार आहेत जे खूप महागडी बॅट आहे त्या बॅट च्या किमिती ऐकून तुम्हाला विश्वास सुद्धा बसणार नाही.
विराट कोहली:-
भारतीय संघाचा माजी कर्णधार तसेच आक्रमक फलंदाज म्हणून विराट कोहली ला ओळखले जाते. विराट कोहली च्या वापरणाऱ्या बॅटबद्दल सांगायचे झाले तर विराट कोहली ची बॅट खूप महागडी आहे. या बॅट चे वैशिष्ट्य म्हणजे ही बॅट इंग्रजी विलोच्या लाकडापासून बनलेली आहे, ज्यामुळे त्याला फलंदाजी करणे सोपे जाते. या बॅटची किंमत सुमारे ₹ 55,000 आहे.
रोहित शर्मा:-
भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज म्हणून रोहित शर्मा ला ओळखले जाते रोहित शर्माच्या बॅटबद्दल सांगायचे झाले तर रोहित शर्मा च्या बॅट ची किंमत जवळपास ₹ 52,000 रुपये आहे. या बॅटचे वजन 1180 ते 1200 ग्रॅम एवढे आहे. ही बॅट इंग्लिश विलो क्रिकेट लाकडापासून बनलेली आहे, ज्यामुळे हिटमॅनला मोठा फटका बसतो.
महेंद्रसिंग धोनी
महेंद्रसिंग धोनी हा भारतीय संघाचा माजी कर्णधार राहिला आहे. धोनीची बॅट इंग्लिश विलोच्या लाकडा पासून बनवली जाते, या बॅट ची किंमत सुमारे 49,000 रुपये एवढी आहे.
हार्दिक पंड्या:-
हार्दिक पांड्याबद्दल बोलायचे तर त्याच्या बॅटची किंमत 48,500 रुपये आहे. हार्दिक पांड्याच्या बॅटची रचना खूप चांगली आहे, ज्यामुळे त्याला पकडणे खूप सोपे होते.
सूर्यकुमार यादव:-
भारतीय संघाचा हीटर तसेच आक्रमक फलंदाज असणाऱ्या
सूर्यकुमार यादव च्या बॅट बद्दल बोलायचे झाले तर त्याच्या बॅटची किंमत सुमारे ६०,००० रुपये आहे. सूर्यकुमार यादव या बॅटने आक्रमक फलंदाजी करतो.