नेपाळचा विस्फोटक फलंदाज दीपेंद्र सिंह ऐरी याने शनिवारी कतर विरुद्धच्या सामन्यात एकाच षटकात 6 षटकार ठोकण्याचा पराक्रम केला आहे. त्याच्यापूर्वी भारतीय दिग्गज अष्टपैलू खेळाडू युवराज सिंह आणि वेस्ट इंडिजचा धडाकेबाज फलंदाज कायरन पोलार्ड याने आंतरराष्ट्रीय टी-ट्वेंटी क्रिकेट मध्ये एकाच षटकात 6 षटकार ठोकण्याचा पराक्रम केला होता. यासह दिपेंद्र टी20 क्रिकेटमध्ये 6 षटकार ठोकणारा तिसरा फलंदाज बनला आहे. त्याच्या या धडाकेबाज खेळीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
ओमानच्या एआई अमराट क्रिकेट स्टेडियमवर सुरू असलेल्या एसीसी मेन्स प्रीमियर चषकातील सातव्या सामन्यातील शेवटचे षटक टाकण्यासाठी कामरान खान गोलंदाजीसाठी आला होता. त्याच्याच या षटकामध्ये एरीने सहा षटकार ठोकत 36 धावा काढल्या. 24 वर्षाच्या या खेळाडूंनी 21 चेंडूत सात षटकार आणि तीन चौकाराच्या मदतीने नाबाद 64 धावा जोडपल्या. त्याच्या तडाखेबाज खेळीच्या जोरावर नेपाळने 7 बाद 210 धावा केल्या.
नेपाळच्या या स्टार फलंदाजाने कतर विरुद्धच्या सामन्यात आपल्या बॅटने कमालीचे दर्शन घडवले. पाचव्या क्रमांकावर फलंदाजीस उतरलेल्या या खेळाडूने मैदानाच्या चारीही बाजूने फटकेबाजी करत प्रेक्षकांचे चांगले मनोरंजन केले. एरिने असा पराक्रम यापूर्वीही केलेला आहे. मागील वर्षी सप्टेंबर मध्ये हांगझोऊ एशिया खेळाच्या स्पर्धेत हा कारनामा केला. मात्र हा कारनामा करण्यासाठी त्याला दोन षटके खेळावे लागले. नेपाळने याच आंतरराष्ट्रीय टी-ट्वेंटी सामन्यांमध्ये तीन बाद 314 असा मोठा विक्रम केला होता.
एरीच्या पूर्वी युवराज सिंग याने टी-20 विश्वचषक 2007 मध्ये स्टुअर्टच्या चेंडूवर 6 षटकार खेचण्याचा मारण्याचा पराक्रम केला होता. त्यानंतर वेस्टइंडीजचा कायरन पोलार्ड आणि 2021 मध्ये श्रीलंके विरुद्ध खेळताना अखिला धनंजयच्या गोलंदाजीवर एका षटकात सहा षटकार मारण्याचा भीम पराक्रम केला होता. दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज फलंदाज हर्षल गिब्ज आणि अमेरिकेचा जसकरन मल्होत्रा या दोघांनी एक दिवशी क्रिकेटमध्ये सहा षटकार ठोकण्याचा विक्रम केला होता.
====
आमचे ईतर लेख आणि ट्रेंडीग बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.