विराट कोहलीला भेटण्यासाठी सुरक्षा तोडून मैदानात आलेला चाहता अडचणीत, आता जावे लागणार थेट तुरुंगात, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल..

विराट कोहलीला भेटण्यासाठी सुरक्षा तोडून मैदानात आलेला चाहता अडचणीत, आता जावे लागणार थेट तुरुंगात, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल..

विराट कोहली :  भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीच्या चाहत्यांची जगभरात कमी नाहीये.  हा खेळाडू जगभरात कुठेही गेला तरी चाहते त्याला भेटण्याच्या आशेने स्टेडियम गाठतात. अशा परिस्थितीत भारतातील त्याच्या चाहत्यांची संख्या विचारण्याची गरज नाही. रविवारी अफगाणिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात विराट कोहली 14 महिन्यांनंतर या फॉरमॅटमध्ये परतला. या सामन्यादरम्यान असे काही घडले जे पाहून सगळेच अवाक् झाले.

खरंतर, विराटचा एक मोठा चाहता इंदोर स्टेडियमची सुरक्षा तोडून विराट कोहलीला भेटण्यासाठी मैदानात उतरला. कोहलीला भेटण्याची त्या चाहत्याची इच्छा पूर्ण झाली होती, मात्र आता पोलिसांनी सुरक्षेचा भंग केल्याप्रकरणी त्याला अटक केली आहे.

चाहत्याची  विराट कोहलीला भेटण्याची इच्छा पूर्ण मात्र आता ठेव तुरुंगात रवानगी..

विराट कोहलीला भेटण्यासाठी सुरक्षा तोडून मैदानात आलेला चाहता अडचणीत, आता जावे लागणार थेट तुरुंगात, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल..

मध्य प्रदेशातील इंदोर येथील होळकर स्टेडियमवर रविवारी भारत-अफगाणिस्तान (IND vs AFG) टी-20 सामन्यादरम्यान सुरक्षा व्यवस्था झुगारून क्रिकेटपटू विराट कोहलीच्या जवळ जाऊन त्याला मिठी मारल्यानंतर एका तरुणाला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याला ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी तरुणाला तुकोगंज पोलीस ठाण्यात नेले. त्यानंतर त्याच्यावर सुरक्षा घेरा मोडून मैदानात घुसल्यामुळे सुरक्षेच्या कारणावरून कारवाई करण्यात आली आहे. आता त्याला थेट 2 महिने तुरुंगात राहावे लागणार आहे.

या सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, भारताने या तीन सामन्यांच्या मालिकेत दुसऱ्या T20I मध्ये अफगाणिस्तानचा 6 गडी राखून पराभव करून 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. टीम इंडियाने यापूर्वी मोहालीत अफगाणिस्तान संघाचा पराभव केला होता. नाणेफेक हारल्यानंतर अफगाणिस्तान संघ प्रथम फलंदाजीला आला आणि गुलबदिन नायबच्या (57) अर्धशतकामुळे 172 धावा केल्या. भारताकडून अर्शदीपने सर्वाधिक ३ बळी घेतले, तर अक्षर पटेल आणि रवी बिश्नोईने प्रत्येकी २ बळी घेतले.

173 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताला चांगली सुरुवात झाली नाही, कर्णधार रोहित शर्मा गोल्डन डकवर आऊट झाला आणि त्याला सलग दुसऱ्या डावात खातेही उघडता आले नाही. मात्र यानंतर यशस्वी जैस्वाल (68) आणि शिवम दुबे (63) यांच्या तुफानी फलंदाजीच्या जोरावर भारताने 15.4 षटकांतच सामना संपवला. या सामन्यात 14 महिन्यांनंतर पुनरागमन करणाऱ्या विराट कोहलीनेही 181.25 च्या स्ट्राईक रेटने 16 चेंडूत 29 धावांची झटपट खेळी केली.

पहा व्हायरल व्हिडीओ,

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील टी-२०  मालिकेतील तिसरा टी-२० सामना 17 जानेवारी रोजी बेंगलोरच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सामन्यात विजय मिळवून टीम इंडिया यजमानांना क्लीन स्वीप देण्याच्या तयारीत असेल तर, दुसरीकडे यजमान अफगाणिस्तान शेवटचा सामना जिंकून शेवट गोड करण्याच्या इराद्याने मैदानात पाऊल ठेवतील.


हेही वाचा:

Viral Video: शिवम दुबे ने ठोकले एवढे जबरदस्त षटकार की, कर्णधार रोहित शर्माआणि विराट कोहलीही झाले चकित, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *