“ही तर गुजरात इंडियन्स…” रोहित शर्माला कर्णधारपदावरून काढल्यानंतर भडकले मुंबई इंडियन्सचे चाहते, सोशल मिडीयावर #ShameOnMI, #UnfollowMI ट्रेंड..

"ही तर गुजरात इंडियन्स..." रोहित शर्माला कर्णधारपदावरून काढल्यानंतर भडकले मुंबई इंडियन्सचे चाहते, सोशल मिडीयावर #ShameOnMI, #UnfollowMI ट्रेंड..

 मुंबई इंडियन्स: सध्या आयपीएल 2024 च्या तयारीमध्ये सर्वच संघ जुटलेले आहेत. आयपीएलच्या इतिहासातील सर्वांत यशस्वी टीम मुंबई इंडियन्सने सुद्धा पुढील हंगामासाठी संघाची रणनीती आणि बांधली सुरु केली आहे. मिनी लिलावाच्या आधी संघाने हार्दिक पांड्याला गुजरात टायटन्सकडून ट्रेड करत आपल्या संघात सामील करून घेतले होते.

IPL 2024: मुंबई इंडियन्सने या 4 कारणामुळे रोहित शर्माकडून काढून घेतले कर्णधारपद, हार्दिकवरील डाव हा ठरलेली प्लानिंग..

आता मुंबई इंडियन्सने काल (15 डिसेंबर) रोजी हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार म्हणून घोषित केले. म्हणजे आयपीएल 2024 मध्ये रोहित शर्मा कर्णधार म्हणून खेळणार नाही, हे  निच्छित झाले आहे. याच कारणामुळे मुंबई इंडियन्सचे चाहते हार्दिक पांड्या आणि मुंबई इंडियन्सवर भडकले असून दोघानाही जोरदार ट्रोल केल जात आहे.

रोहित शर्माला कर्णधारपदावरून काढल्यानंतर मुंबई इंडियन्सचे चाहते  भडकले, हार्दिक पंड्या होतोय ट्रोल. पहा ट्वीटस

 

 

 

 

अश्याच काही काही स्टोरी पोस्ट करून चाहते मुंबई इंडियन्स आणि हार्दिक पंड्यावरील राग व्यक्त करत आहेत. एकंदरीत रोहित शर्माला कर्णधार पदावरून काढण्याचा निर्णय घेऊन मुंबई इंडियन्सने चाहत्यांची मने दुखावली आहेत असं सर्वच स्तरातून बोलले जात आहे. मात्र दुसरीकडे मुंबई इंडियन्सने संघाच्या उज्वल भविष्यासाठी रोहितच्या मार्गदर्शनाखाली हार्दिककडे संघाचा वारसा सोपवल्याच म्हटलं आहे.

मुंबई इंडियन्सने गमावले फोलोवर्स.

हार्दिक पंड्याची मुंबई इंडियन्सचा कर्णधार म्हणून घोषणा करताच चाहत्यांनी मुंबई इंडियन्सच्या सोशल मिडिया अकाऊंट अनफोलो करण्यास सुरवात केली आहे. याचाच परिणाम म्हणून सोशल मिडीयावर  #ShameOnMI, #UnfollowMI हे Hashtag ट्रेंड होत आहे. मुंबईच्या इंस्टाग्राम अकाऊंटचे आतापर्यंत 400k फॉलोवर्स कमी झाले आहेत तर दुसरीकडे ट्वीटर अकाऊंटचे सुद्धा 150k+फॉलोवर्स  एका दिवसात कमी झाले आहेत.


हेही वाचा:

कारकीर्द कितीही वादाची असली तरीही, ‘सनथ जयसूर्या’ खेळाडू जबराटचं होता…

IPL AUCTION 2024: आई शेतमजूर तर बाप बांधकाम मजूर.. आयपीएलच्या मिनी लिलावात बिहारच्या ‘या’ तरुणाची चर्चा; धोनीला मानतो आदर्श..

IPL RECORD: आयपीएलमध्ये ‘या’ 4 फलंदाजांनी शेवटच्या षटकात काढल्यात सर्वाधिक धावा, यादीमध्ये एकमेव विदेशी खेळाडू..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *