Viral Video: कुणी MI चे झेंडे जाळले तर कुणी केला अनोखा निषेध, रोहित शर्माला कर्णधारपदावरून काढताच MI अडचणीत गमावले एवढे फॉलोअर्स, आक्रमक चाहत्यांचे व्हिडीओ होतोहेत तुफान व्हायरल..

Viral Video: कुणी MI चे झेंडे जाळले तर कुणी केला अनोखा निषेध, रोहित शर्माला कर्णधारपदावरून काढताच MI अडचणीत गमावले एवढे फॉलोअर्स, आक्रमक चाहत्यांचे व्हिडीओ होतोहेत तुफान व्हायरल..

रोहित शर्मा : आयपीएल 2024 (IPL 2024) साठी कर्णधार म्हणून मुंबई इंडियन्सने काल हार्दिक पंड्याचे नाव जाहीर केले. ज्यानंतर सर्वत्र रोहित शर्माचे चाहते नाराज झाले. त्यांनी हार्दिक पांड्या आणि मुंबई इंडियन्सवर राग काढण्यास सुरवात केली. रोहित शर्माच्या जागी हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सचा कर्णधार बनणे चाहत्यांना पसंत नाही.

आता मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांनी वेगवेगळ्या प्रकारे संघाचा निषेध नोंदवायला सुरुवात केली आहे. IPL 2024 साठी मुंबई संघाने अचानक हार्दिक पांड्याला कर्णधार बनवले. संघाला पाच वेळा आयपीएल विजेतेपद मिळवून देणाऱ्या रोहित शर्माला मुंबईने कर्णधारपदावरून हटवण्याचा निर्णय घेतला. आणि सगळीकडे एकच गदारोळ माजला.

IPL 2024: मुंबई इंडियन्सने या 4 कारणामुळे रोहित शर्माकडून काढून घेतले कर्णधारपद, हार्दिकवरील डाव हा ठरलेली प्लानिंग..

मुंबईने रोहितला कर्णधारपदावरून हटवल्यानंतर चाहते आक्रमक, जाळले मुंबईचे झेंडे ..

मुंबईने रोहितला कर्णधारपदावरून हटवले यावर रोहित शर्माच्या चाहत्यांना अजूनही विश्वास बसत नाहीये. रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवल्यानंतर सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये चाहते एमआयची जर्सी आणि कॅप जाळताना दिसत आहेत.

 Viral Video: कुणी MI चे झेंडे जाळले तर कुणी केला अनोखा निषेध, रोहित शर्माला कर्णधारपदावरून काढताच MI अडचणीत गमावले एवढे फॉलोअर्स, आक्रमक चाहत्यांचे व्हिडीओ होतोहेत तुफान व्हायरल..

चाहते एमआयवर ‘बहिष्कार’ करण्याच्या मूडमध्ये असल्याचे दिसत आहे. एका व्हिडीओमध्ये एका चाहत्याने मुंबई इंडियन्सची जर्सी लटकवून आग लावली. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहले होते, “मुंबई इंडियन्स रोहित शिवाय अपूर्ण”

दुसर्‍या व्हिडिओमध्ये हा चाहता Mi ची टोपी जाळताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, फॅन आधी टोपी जमिनीवर फेकतो आणि नंतर पायाने चिरडतो. यानंतर त्याने मुंबईची टोपी पेटवली. तसेच चाहत्यांनी मुंबई इंडियन्सचा निषेध नोंदवला. प्रतिक्रिया पहा…

रोहित शर्माने मुंबई इंडियन्सला चॅम्पियन बनवले, आता हार्दिकची बारी..

रोहित शर्माने त्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सला एकूण पाच आयपीएल ट्रॉफी जिंकून दिली. मुंबईने त्याच्या नेतृत्वात 2013, 2015, 2017, 2019 आणि 2020 मध्ये आयपीएलचे विजेतेपद पटकावले होते.

Mumbai Indian's New Captain: रोहित शर्माला निरोप... कर्णधार म्हणून मुंबईच्या गादीवर हार्दिक पांड्या विराजमान, आयपीएल 2024 गाजवणार?

IPL 2024 पूर्वी हार्दिक पंड्याने मुंबई इंडियन्समध्ये पुनरागमन केले. याआधी हार्दिक गुजरात टायटन्सचा कर्णधार होता. हार्दिकने 2022 आणि 2023 मध्ये गुजरात टायटन्सची जबाबदारी स्वीकारली आणि संघाला पहिल्यांदा चॅम्पियन बनवले आणि दुसऱ्यांदा उपविजेतेपद मिळवले. आता हार्दिक मुंबई ला कसे लीड करतो हे पाहणे रंजक ठरणार आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *