सुरक्षा रक्षकांना चकमा देत विराट कोहलीचा जबरा फॅन घुसला मैदानात; विराटची घेतली गळा भेट

0
3
सुरक्षा रक्षकांना चकमा देत कोहलीचा जबरा फॅन घुसला मैदानात; विराटची घेतली गळा भेट

आयपीएल 2024 मधील पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूर (PBKS vs RCB) यांच्या दरम्यान झालेल्या सामन्यांमध्ये आरसीबी ने चार गडी राखून विजय मिळवला. विराट कोहली आणि दिनेश कार्तिक यांनी केलेल्या शानदार खेळीच्या जोरावर आरसीबी ने आपला पहिला विजय मिळवला. आरसीबीचा कर्णधार याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला प्रथम फलंदाजी करताना पंजाब किंग्स ने 176 धावा काढल्या प्रतिउत्तरात आरसीबीने चार गडी राखून त्यांचा पराभव केला.

IPL 2024: Fan hugs Virat Kohli, touches his feet during PBKS vs RCB clash  at Chinnaswamy stadium | WATCH | Mint

चालू सामन्यात मैदानात घुसला चाहता, विराट कोहलीची घेतली गळाभेट.

या सामन्या दरम्यान एक मजेशीर घटना पाहायला मिळाली.  विराट कोहली चा एक जबरा फॅन मैदानात सुरक्षा रक्षकांना चकमा देत मैदानात आला आणि थेट कोहलीच्या पाया पडला. या दरम्यान त्याने त्याची गळाभेट देखील घेतली. त्यानंतर लगेच सुरक्षारक्षक मैदानात धावत पळत आले आणि त्या फॅनला बाहेर घेऊन गेले. सोशल मीडियावर हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय. आयपीएलच्या दरम्यान खेळाडूंसाठी मोठी सुरक्षा यंत्रणा उभे केले असताना देखील कित्येकदा अनेक फॅन हे नजर चुकवून मैदानात येतात.

 

सामन्याविषयी बोलायचं झाले तर ,आरसीबीची सुरुवात अत्यंत खराब झाली. डुप्लेसी अवघ्या तीन धावांवर माघारी परतला. त्यानंतर कॅमेरेन ग्रीन देखील काही खास चमत्कार करू शकला नाही. रजत पटीदार याने 18 धावांचे योगदान दिले. त्यानंतर संघाच्या विजयाची जबाबदारी विराट कोहलीने स्वतःच्या खांद्यावर घेत 77 धावा काढून बाद झाला. पहिल्या सामन्यात त्याने केवळ 21 धावा केल्या होत्या. अखेर दिनेश कार्तिक आणि महिपालने शेवटच्या षटकात फटकेबाजी करत आरसीबीचा विजय निश्चित केला. दिनेश कार्तिकने तर शेवटच्या दोन षटकांमध्ये पंजाबची गोलंदाजी फोडून काढली. त्याच्याच बॅटमधून विजयी चौकार निघाला.

आयपीएल 2024 मध्ये आरसीबीने दोन सामने खेळले असून त्यात पहिल्या सामन्यात त्यांचा पराभव झाला आहे तर दुसऱ्या सामन्यात त्यांनी विजय मिळवला आहे. त्यांच्या खात्यात आता दोन गुणांची भर पडली आहे. या विजयामुळे आरसीबीचा संघ गुणतलिकेत सहाव्या स्थानावर पोहोचला आहे. राजस्थान रॉयल्सचा संघ गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे.


====

 

आमचे ईतर लेख आणि ट्रेंडीग बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here