जागतिक क्रिकेटवर विराटचा बोलबाला..! 50 वे शतक ठोकताच किंग कोहलीची सर्वत्र हवा, पत्नी अनुष्काच खास सेलिब्रेशन, सोशल मिडीयावर तुफान व्हायरल..

विराट कोहली: वर्ल्ड कप 2023 (odi world Cup 2023) चा पहिला सेमीफायनल सामना भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यात मुंबईत खेळला जात आहे. या सामन्यात कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. विराट कोहलीने शानदार फलंदाजी करत हा सामना संस्मरणीय बनवला.

त्याने न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये 50 वे शतक झळकावून इतिहास रचला. सर्वाधिक शतके ठोकण्याच्या बाबतीत त्याने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला मागे टाकले. यानंतर सोशल मीडियावर चाहत्यांनी विराट कोहलीच्या शतकी खेळीचे कौतुक केले.

विराट कोहली

विराट कोहलीने वनडेत 50 वे शतक झळकावले

विराट कोहली या सामन्यात सुरवातीपासूनच चांगल्या फॉर्ममध्ये दिसत होता. या काळात त्याच्या बॅटमधून एकामागून एक स्फोटक शॉटस पाहायला मिळाल्या. न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात त्याने शतक झळकावले होते. त्याने 106 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. यादरम्यान त्याच्या बॅटमधून 8 चौकार आणि 1 षटकार दिसला.

विराटने 50 व्या शतकानंतर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला मागे टाकले.  एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणारा तो पहिला फलंदाज ठरला. मुंबईत सचिन तेंडुलकरच्या उपस्थितीत त्याने हा विक्रम मोडला. या ऐतिहासिक खेळीनंतर सोशल मीडियावर विराटचे खूप कौतुक होत आहे. चाहते सोशल मीडियावर त्याचे कौतुक करताना थकत नाहीत.

जागतिक क्रिकेटवर विराटचा बोलबाला..! 50 वे शतक ठोकताच किंग कोहलीची सर्वत्र हवा, पत्नी अनुष्काच  खास सेलिब्रेशन, सोशल मिडीयावर तुफान व्हायरल..

विराट ने 50 वे शतक ठोकल्यानंतर  सोशल मीडियावर चाहत्यांनी भरभरून कौतुक केले पहा ट्वीट

 

 


  • हेही वाचा: