भारताचा राष्ट्रीय खेळ हा जरी क्रिकेट नसला तरी देशातील लाखो लोक क्रिकेट खेळाचे चाहते आहेत. देशातील बहुतांशी लोक क्रिकेट खेळाला पसंती देत आहेत. आपल्या देशात इतर खेळांपेक्षा क्रिकेट खेळाचे चाहते मोठ्या प्रमाणात आहेत.
भारतीय क्रिकेट टीम ही जगात सर्वात श्रेष्ठ टीम म्हणून मानली जाते. कारण भारतीय संघामध्ये असे दिग्गज खेळाडू आहेत जे समोरील संघाला धूळ चारण्यात तरबेज आहेत. तर मित्रानो आज आम्ही तुम्हाला या लेखात भारताच्या फास्ट गोलंदाजाबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.
1)उरमान मलिक:-
भारतीय संघाचा हा सर्वात फास्टर बॉलर आहे. आयपीएल च्या इतिहासात उमरान ने तिसरी सर्वात फास्ट गोलंदाजी केलेला रेकॉर्ड आहे. उरमान मलिक च्या गोलंदाजीचा वेग हा 157 किलो मिटर एवढा आहे. उरमान मलिक हा जम्मू काश्मीर येथील रहिवाशी आहे तसेच येणाऱ्या काही दिवसात उरमान मलिक हा भारतीय संघात खेळेल शिवाय भारताचा फास्टर गोलंदाज होईल.
2) जवागल श्रीनाथ:-
फास्टर गोलंदाज च्या यादीत जवागल श्रीनाथ हा खेळाडू दुय्यम स्थानी आहे. जवागल श्रीनाथ ने बऱ्याच दिवसांपासून तेज गोलंदाजी करण्याचा रेकॉर्ड बनवून ठेवला होता परंतु 2022 साली उमरान मालिक ने तो रेकॉर्ड मोडला. जवागल श्रीनाथ च्या गोलंदाजी चा वेग हा 154.5किलो मिटर प्रती तास एवढा आहे.
3) इरफान पठाण:-
भारतीय क्रिकेट संघाचा स्टार गोलंदाज म्हणून इरफान पठाण ला ओळखले जाते. इरफान पठाण ने पाकिस्तानी संघाला गोलंदाजी करून धूळ चारण्याचे काम केले होते. इरफान पठाण च्या गोलंदाजी चे स्पीड हे 153.7 किलो मिटर एवढे असून तिसऱ्या स्थानी फास्टर गोलंदाज च्या यादीत इरफान पठाण चा नंबर लागतो.
4)मोहम्मद शमी :-
भारतीय क्रिकेट संघाचा स्टार आणि घातक गोलंदाज म्हणून मोहम्मद शमी ला ओळखले जाते. मोहम्मद शमी ने आक्रमक गोलंदाजी करत अनेक वेळा एका सामन्यात 6 पेक्षा जास्त विकेट घेण्याचा विक्रम केला आहे. मोहम्मद शमी च्या गोलंदाजी चे स्पीड हे 153किलो मिटर प्रती तास एवढे आहे.
5)जसप्रीत बुमराह:-
सध्या भारतीय संघात जसप्रीत बुमराह खूप महत्वाचा खेळाडू आहे. जसप्रीत बुमराह ने आतापर्यंत आपल्या गोलंदाजी च्या कौशल्यावर भारताला अनेक वेळा विजय मिळवून दिला आहे. जसप्रीत बुमराह च्या गोलंदाजी चे स्पीड हे 153.2 किमी प्रती तास एवढे आहे.
==
आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.
हे ही वाचा:- नादच खुळा! शार्दुल ठाकुरचा विकेट्सचा सिक्स 6 बॉल 6 बाद करून विरुद्ध संघाचा बाजार उठवला, वाचा सविस्तर.