IND vs NZ: शुभमन गिल बनला दोन हजारी; जगातल्या मातब्बर फलंदाजांना टाकले पाठीमागे..

IND vs NZ:  विश्वचषक स्पर्धेतील 21व्या सामन्यात भारताने न्यूझीलंड दणदणीत चार गडी राखून पराभव केला. यासह भारताने विश्वचषक स्पर्धेतला न्यूझीलंडविरुद्धचा विजयाचा दुष्काळ संपवला. ज्युनिअर युवराज सिंग या नावाने ओळखला जाणारा भारताचा सलामीचा फलंदाज शुभमन गिल याने 26 धावा काढून नवा विक्रम आपल्या नावे केला. वनडे क्रिकेटमध्ये सर्वात कमी सामन्यात 2000 धावा करणारा पहिला खेळाडू ठरला आहे.

IND vs NZ: शुभमन गिल ठरला सर्वांत कमी एकदिवशीय सामन्यात 2000 धावा पूर्ण करणारा पहिला खेळाडू..

IND vs NZ: शुभमन गिल बनला दोन हजारी; जगातल्या मातब्बर फलंदाजांना टाकले पाठीमागे..

न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात भारताच्या सलामीच्या जोडीने 71 धावांची सलामी दिली. यात शुभमन गिलने 31 चेंडूत पाच चौकाराच्या साह्याने 26 धावा काढल्या. गिलला 2000 पूर्ण करण्यासाठी 14 धावांची गरज होती. काल त्याने 31 चेंडूत 26 धावा केल्या. 2 हजार धावा पूर्ण करण्यासाठी त्याला 38 सामने लागले.

IND vs NZ:या स्टार खेळाडूंनी 2000 धावा पूर्ण करण्यासाठी  खेळलेत एवढे सामने

2000 हजार धावा पूर्ण करण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा हाशिम आमला याने 40 सामन्यात पाकिस्तानचा दिग्गज फलंदाज जहीर अब्बास 45 सामने, भारताचा मास्टर्स चेस विराट कोहली याला 53 पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम, इंग्लंडचा फलंदाज केविन पीटरसन, दक्षिण आफ्रिकेच्या संघात मधल्या फळीत खेळणारा रासी वेंडर हुसेन यांना 2 हजार धावा पूर्ण करण्यासाठी प्रत्येकी 45 सामने लागले. या सर्वच दिग्गज खेळाडूंना काल गिल ने पाठीमागे टाकले.

शुभमन गिलला दोन हजार धावा पूर्ण करण्यासाठी 24 वर्ष 44 दिवस लागले. सचिन तेंडुलकरने 20 वर्ष 354 दिवस लागले. युवराज सिंगने 22 वर्ष 51 दिवस घेतले. विराट कोहलीने 22 वर्ष 215 दिवसात 2 हजार धावा पूर्ण केल्या. सुरेश रैनाने 23 वर्षे 45 दिवस घेतले.

सचिन तेंडुलकर

गिलला डेंग्यूची लागण झाल्याने विश्वचषक स्पर्धेतील पहिल्याच दोन सामन्यात तो खेळू शकला नाही. अफगाणिस्तान विरुद्ध 53 तर पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात त्याने 16 धावा काढल्या होत्या.

सामन्या बाबतीत बोलायचे झाले तर, विश्वचषक स्पर्धेतील टॉपवर असलेल्या या दोन संघामध्ये हाय व्होल्टेज सामना झाला. न्यूझीलंड संघाने दिलेले 273 धावांचे आव्हान भारतीय संघाने सहा गड्यांच्या मोबदल्यात 274 धावा करून हे आव्हान सहज पार केले. यामध्ये चेसमास्टर विराट कोहलीने दबंग स्टाईलने 95 धावा काढत भारतीय संघाला विजय मिळवून दिला. तब्बल 20 वर्षानंतर म्हणजेच दोन दशकानंतर भारतीय संघाने न्यूझीलंडचा विश्वचषक स्पर्धेत पराभव केला आहे.

IND vs NZ: शुभमन गिल बनला दोन हजारी; जगातल्या मातब्बर फलंदाजांना टाकले पाठीमागे..

विश्वचषक स्पर्धेतील हा भारताचा सलग पाचवा विजय आहे. या विजयासह भारत गुण तालिकेत टॉपवर आहे. तसेच या विजयामुळे भारताने सेमी फायनलच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले आहे. भारताचा पुढचा सामना 29 ऑक्टोंबर रोजी गतविजेता असलेला  इंग्लंड विरुद्ध होणार आहे. या सामन्यात देखील भारतीय संघाचे पारडे जड राहणार आहे.


हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *