टी-20 क्रिकेटच्या इतिहासात सर्वात जलद 3 हजार धावा करणारे हे आहेत खेळाडू, यादीमध्ये एकच भारतीय खेळाडू सामील..

टी-20 क्रिकेटच्या इतिहासात सर्वात जलद 3 हजार धावा करणारे हे आहेत खेळाडू, यादीमध्ये एकच भारतीय खेळाडू सामील..

ताज्या बातम्या आणि अपडेट्स Whattsapp वर मिळवण्यासाठी जॉईन करा: Whatsapp Group

=======

लखनऊ सुपर जायंट्सने आयपीएल 2024 मधील 15 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळूर संघाला 28 धावांनी पराभूत केले. लखनऊचा या हंगामातला हा दुसरा विजय आहे. या सामन्यांमध्ये मयंक यादव याने लक्षवेधक कामगिरी केली असली तरी लखनऊच्या निकोलस पुरन या फलंदाजांने आपल्या आक्रमक खेळीने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. पण त्याआधी सलामीवीर फलंदाज क्विंटन डिकॉक याने देखील एक नवा विक्रम केला आहे.

टी-20 क्रिकेटच्या इतिहासात सर्वात जलद 3 हजार धावा करणारे हे आहेत खेळाडू, यादीमध्ये एकच भारतीय खेळाडू सामील..

क्विंटन डी कॉक आयपीएलच्या इतिहासात 3 हजार धावा पूर्ण करणारा खेळाडू बनला आहे. आरसीबी विरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने 81 धावांची तडाखेबाज खेळी केली. त्याचे शतक 19 धावांनी हुकले. 99 सामन्यात 3 हजार धावा पूर्ण करण्याचा विक्रम त्याने केला आहे. अशी कामगिरी करणारा तो सहावा फलंदाज ठरला आहे.

आयपीएलच्या इतिहासात सर्वात कमी डावात 3 हजार धावा पूर्ण करणारा खेळाडू क्रिस गेल हा होय. गेलने अवघ्या 75 डावात 3 हजार धावा पूर्ण केल्या आहेत. अशी कामगिरी करणारा तो पहिला फलंदाज ठरला. गेलने सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. आयपीएल मध्ये त्याने अनेक विक्रम रचले आहेत. त्याचे काही असे अविश्वसनीय विक्रम आहेत जे मोडणे कोणत्याही खेळाडूला जवळपास अशक्य आहे.

टी-20 क्रिकेटच्या इतिहासात सर्वात जलद 3 हजार धावा करणारे हे आहेत खेळाडू, यादीमध्ये एकच भारतीय खेळाडू सामील..

लखनऊ संघाचा कर्णधार के एल राहुल याने आयपीएलच्या इतिहासात 80 डावात 3000 धावा पूर्ण करण्याचा विक्रम केला होता. आयपीएल मध्ये त्याची कामगिरी जबरदस्त राहिली आहे. दुखापतीतून सावरल्यानंतर नुकतेच त्याने आयपीएलमध्ये कमबॅक केले आहे. अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीयखेळाडू ठरला आहे.

इंग्लंडचा यष्टीरक्षक फलंदाज जोश बटलर याने आयपीएल मध्ये 85 डावात तीन हजार धावा पूर्ण केल्या आहेत. अशी कामगिरी करणारा तो तिसरा खेळाडू ठरला. मागील हंगामात तो जबरदस्त फॉर्मत होता. मात्र यंदाच्या हंगामात त्याला तशी कामगिरी करता आली नाही. तो राजस्थान रॉयल संघाचे प्रतिनिधित्व करतोय.

ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज फलंदाज डेविड वॉर्नर याने आयपीएल मध्ये अनेक विक्रम रचले आहेत. त्याने 3000 धावा पूर्ण करण्यासाठी 94 डाव खेळले आहेत. यंदा तो दिल्ली कॅपिटल्स संघाचे प्रतिनिधित्व करतोय. आयपीएलमध्ये हैदराबाद संघाचे प्रतिनिधित्व करताना डेव्हिड वॉर्नरची कामगिरी जबरदस्त राहिली. मात्र दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळताना त्याने समाधानकारक कामगिरी केली नाही.

टी-20 क्रिकेटच्या इतिहासात सर्वात जलद 3 हजार धावा करणारे हे आहेत खेळाडू, यादीमध्ये एकच भारतीय खेळाडू सामील..

आरसीबीचा कर्णधार फाफ डुप्लेसिस याने अवघ्या 94 डावा तीन हजार धावा पूर्ण करण्याचा विक्रम केला होता. आयपीएल मध्ये त्याला फारशी समाधानकारक कामगिरी करता आली नाही. आरसीबीच्या संघाने आतापर्यंत एकदाही आयपीएल चषक जिंकला नाही संघ व्यवस्थापनेला त्याच्याकडून बऱ्याच अपेक्षा आहेत. नेतृत्व आणि फलंदाजीत तो फेल ठरवून नये हीच क्रिकेट प्रेमींची अपेक्षा आहे.

आयपीएलच्या इतिहासात अनेक विक्रम भारतीय खेळाडूंनी केले आहेत. मात्र या विक्रमाच्या यादीत एकही भारतीय खेळाडू नाही.


====

आमचे ईतर लेख आणि ट्रेंडीग बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

 

IPL 2024: मुंबई इंडियन्सने अचानक केला संघात बदल, या दिग्गज खेळाडूला बाहेर काढून या इंग्लंड च्या खेळाडूला दिली संधी.

आयपीएलमधील पहिले षटक निर्धाव टाकणारा वेगवान गोलंदाज ‘कामरान खान’ आहे तरी कुठे? सध्या करतोय अशी कामे…!


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *