विश्वचषक स्पर्धेत सर्वात वेगवान शतक ठोकण्याच्या यादीमध्ये आता भारतीय खेळाडूने एन्ट्री केली आहे. अफगाणिस्तान विरुद्ध झालेल्या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा ने 63 चेंडूत शतक ठोकत या यादीत सहाव्या स्थानावर पोचला आहे. याआधी श्रीलंकेविरुद्ध झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा स्फोटक फलंदाज ऍडन मारक्रम (Aiden Markram) याने लंकेच्या गोलंदाजांना सळो की पळो करून टाकले. त्याने अवघ्या 49 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. आणि विश्वचषक स्पर्धेत सर्वात वेगवान शतक ठोकण्याच्या यादीत तो पहिल्या स्थानावर विराजमान झाला. त्याच्या या विस्फोटक शतकी खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने श्रीलंकेवर दणदणीत विजय मिळवला.
विश्वचषक स्पर्धेत या खेळाडूंनी ठोकलीत सर्वांत वेगवान शतके
केविन ओब्रायन: 2011 साली झालेल्या विश्वचषकात आयर्लंडचा खेळाडू केविन ओब्रायन याने अवघ्या 50 चेंडूत वेगवान अर्धशतक झळकावले. त्याच्या या शतकी खेळीच्या जोरावर आयर्लंडने इंग्लंडला पराभवाची धूळ चारली. नव्या दमाच्या या खेळाडूने इंग्लंडच्या अनुभवी गोलंदाजाची अक्षरशा पिस काढली.
ग्लेन मॅक्सवेल: ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेल याने 2015 साली झालेल्या विश्वचषकात अवघ्या 51 चेंडूत शतक ठोकले. श्रीलंका विरुद्ध झालेल्या या साखळी सामन्यात मॅक्सवेलची चौफेर फटकेबाजी पाहायला मिळाली. विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने विजय मिळवत विश्वचषकावर पाचव्यांदा नाव कोरले.
एबी डिव्हिलियर्स: मिस्टर 360 म्हणून ओळखला जाणारा दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ‘एबी डिव्हिलियर्स’ याने वेस्ट इंडिज विरुद्ध 2015 साली 52 चेंडूत शतकी खेळी साकारली होती. दर्जेदार फलंदाज, उत्तम गोलंदाज आणि चपळ क्षेत्ररक्षक खेळाडूंचा भरणा असलेल्या या संघाला विश्वचषक जिंकता आला नाही. देश-विदेशात झालेल्या सामन्यांमध्ये दर्जेदार कामगिरी करणाऱ्या या संघाने विश्वचषकात मात्र सपशेल शरणागती स्वीकारल्या चे आतापर्यंतचे चित्र आहे.
इयान मॉर्गन : इंग्लंडचा माजी कर्णधार इयान मॉर्गन याने अवघ्या 57 चेंडूत शतकी खेळी केली. 2019 साली मायदेशात झालेल्या विश्वचषक स्पर्धेत, अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यांमध्ये त्याने हे दमदार शतक ठोकले. त्याच्याच नेतृत्वाखाली इंग्लंडने न्यूझीलंडचा पराभव करत विश्वचषकावर पहिल्यांदा नाव कोरले होते. अंतिम सामन्यात अष्टपैलू बेन स्टोक्स याने अविश्वासनीय खेळी केली होती. अंतिम सामना टाय झाला होता; मात्र पहिल्या डावत सर्वाधिक चौकार ठोकल्याने इंग्लंडला विजय घोषित केले होते.
मॅथ्यू हेडन : 2007 साली दक्षिण आफ्रिके विरुद्ध खेळताना ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर मॅथ्यू हेडन याने 66 चेंडूत दमदार शतक ठोकले. हा विश्वचषक ऑस्ट्रेलियाने आपल्या नावी केला होता.
जिम डेविसन: कॅनडाचा युवा खेळाडू जिम डेविसन याने 2003 साली दक्षिण आफ्रिकेत झालेल्या विश्वचषकात वेस्टइंडीज विरुद्ध खेळताना 67 चेंडूमध्ये लक्षवेधक शतकी खेळी केली होती. मात्र त्याची ही शतकी खेळी वाया गेली. वेस्टइंडीज ने कॅनडा विरुद्ध सफाईदारपणे विजय मिळवला होता. 2015 साली इंग्लंडविरुद्ध कुमार संघकाराने 70 चेंडूत तर 2011 साली पॉल स्टर्लिंग नेदरलँड विरुद्ध शतकी खेळी केली होती.
हेही वाचा:
पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यापूर्वी शुभमन गिल विषयी मिळाली मोठी अपडेट; वाचा काय आहे बातमी..