Fastest half century in IPL: यशस्वी जयसवालचा विक्रम मोडत सर्वांत जलद अर्धशतक ठोकू शकतात हे 4 खेळाडू, खेळण्याचा अंदाज आहे एकापेक्षा एक स्फोटक..

Fastest half century in IPL: यशस्वी जयसवालचा विक्रम मोडत सर्वांत जलद अर्धशतक ठोकू शकतात हे 4 खेळाडू, खेळण्याचा अंदाज आहे एकापेक्षा एक स्फोटक..

Fastest half century in IPL : इंडियन प्रीमियर लीगचा 17 वा हंगाम (IPL 2024)सुरु होण्यासाठी अवघे काही महिने बाकी आहे. यंदा आयपीएलचे सर्व सामने देशातील  शहरांमध्ये खेळवले जाणार आहेत.  आयपीएलच्या सुरुवातीपासूनच या लीगवर फलंदाजांचे वर्चस्व आहे. न्यूझीलंडचा माजी कर्णधार ब्रेंडन मॅक्युलमने आयपीएलच्या पहिल्या सत्राची सुरुवात स्फोटक फलंदाजीने केली होती. आयपीएलमध्ये असे अनेक दिग्गज खेळाडू आहेत ज्यांनी आपल्या आक्रमक फलंदाजीने सर्वांना वेड लावले आहे.

आयपीएलच्या प्रत्येक मोसमात अनेक विक्रम केले जातात आणि नष्ट होतात. असाच एक विक्रम राजस्थान रॉयल्स (RR) चा युवा सलामीवर यशस्वी जयसवालच्या नावावर आहे. 2023 मध्ये त्याने केकेआर विरुद्ध  केवळ 13 चेंडूत अर्धशतक झळकावले होते. त्आयाचा हा विक्जरम आजूनही कुणाला मोडता आलेला नाही.

 IPL 2024: आरसीबीच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी..! विराट कोहली पुन्हा होऊ शकतो आरसीबीचा कर्णधार, समोर आलीय मोठी माहिती..!

मात्र वाढत्या स्फोटक फलंदाजीमुळे हा विक्रम आयपीएल 2024 मध्ये मोडला तर नवल नको वाटायला. म्हणूनच आम्ही तुम्हाला अशाच 5 शक्तिशाली फलंदाजांबद्दल सांगणार आहोत, जे त्याचा हा विक्रम मोडण्याची ताकत ठेवतात.

आयपीएलमध्ये सर्वांत जलद अर्धशतक ठोकू शकतात हे खेळाडू.

1.निकोलस पुरण

LSG  चा तुफानी फलंदाज निकोलस पूरन त्याच्या स्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जातो. सर्वात जलद अर्धशतक झळकावणाऱ्या या यादीत त्याचे नाव समाविष्ट आहे. आयपीएल 2024 मध्ये सर्वांत जलद अर्धशतक ठोकण्याची कामगिरी करण्याची त्याच्यात क्षमता आहे. आयपीएलच्या 13व्या मोसमात त्याने 17 चेंडूत अर्धशतक झळकावले होते.

Fastest half century in IPL: यशस्वी जयसवालचा विक्रम मोडत सर्वांत जलद अर्धशतक ठोकू शकतात हे 4 खेळाडू, खेळण्याचा अंदाज आहे एकापेक्षा एक स्फोटक..
Fastest hlf century in IPL

मात्र, नंतर यशस्वी जयसवालने 13 चेंडूमध्ये अर्धशतक झळकावून त्याचा विक्रम मोडला. या हंगामांत पुन्हा एकदा निकोलस पुरण आपली जागा पुन्हा घेण्यास उत्सुक असेल.

निकोलस पूरनने आतापर्यंत आयपीएलचे दोन सत्र खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 21 सामन्यांत 32.56 च्या सरासरीने 521 धावा केल्या आहेत. या काळात त्याने आपल्या बॅटने 2 अर्धशतके झळकावली आहेत. त्याच वेळी, यष्टीरक्षक फलंदाजाने आयपीएल 2023 मध्ये 14 सामने खेळताना 35.80 च्या सरासरीने 358 धावा केल्या होत्या.

2.हार्दिक पंड्या

या यादीत मुंबई इंडियन्सचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याचेही नाव आहे. गुजरात मधून मुंबईमध्ये आलेला पांड्या यावेळी मुंबईचा कर्णधार आहे. त्याच्याकडे आयपीएलमध्ये सर्वात जलद अर्धशतक झळकावण्याची क्षमता आहे. त्याने 2019 मध्ये 17 चेंडूत अर्धशतक झळकावले आणि आयपीएलच्या 13व्या हंगामात 20 चेंडूंचा सामना करताना ही कामगिरी केली.  आता पुन्हा एकदा आयपीएल 2024 मध्ये तो सर्वांत जलद अर्धशतक लगावण्यास उत्सुक असेल.

'पांड्याच्या जाण्याने काय फरक पडत नाही..' गुजरात सोडून गेलेल्या हार्दिक पांड्याबाबत संघातील दिग्गज खेळाडूचे मोठे वक्तव्य, म्हणाला....

हार्दिकने  आतापर्यंत आयपीएलचे 9 हंगाम खेळले आहेत. त्याच्या आयपीएल कारकिर्दीत त्याने आतापर्यंत123 सामने खेळले असून 2309 धावा केल्या आहेत.

3.ईशान किशन

सर्वात वेगवान अर्धशतक झळकवू शकणाऱ्या खेळाडूंच्या या यादीत मुंबई इंडियन्सचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज इशान किशनचे नावही सामील आहे. किशन त्याच्या स्फोटक खेळीसाठी प्रसिद्ध आहे. त्याने मुंबई इंडियन्ससाठी अनेकवेळा शानदार खेळी खेळून त्यांना विजयाच्या उंबरठ्यावर नेले आहे.

Fastest half century in IPL: यशस्वी जयसवालचा विक्रम मोडत सर्वांत जलद अर्धशतक ठोकू शकतात हे 4 खेळाडू, खेळण्याचा अंदाज आहे एकापेक्षा एक स्फोटक..

या 22 वर्षीय डावखुऱ्या फलंदाजाने 2018 साली कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध 17 चेंडूत अर्धशतक झळकावले होते. या वर्षीही तो सर्वात जलद अर्धशतक झळकावण्याचा विक्रम आपल्या नावावर करू शकतो.

 4.ऋषभ पंत

दिल्ली कॅपिटल्सचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतकडेही आयपीएलमध्ये सर्वात जलद अर्धशतक झळकावण्याची ताकद आहे. पंतने 2018 आणि 2019 मध्ये अनुक्रमे 18 आणि 23 चेंडूंचा सामना करत अर्धशतके झळकावली होती. पंत आगामी आयपीएलमध्ये केएल राहुलचा सर्वात वेगवान अर्धशतकांचा विक्रम मोडू शकतो.

 

View this post on Instagram

 

A post shared by Delhi Capitals (@delhicapitals)

या 22 वर्षीय डावखुऱ्या फलंदाजाने आतापर्यंत आयपीएलमधील 68 सामन्यांमध्ये 35.23 च्या सरासरीने 2079 धावा केल्या आहेत. या काळात त्याने 12 वेळा अर्धशतके झळकावली आहेत. ऋषभ पंतने आयपीएलच्या 13व्या हंगामात 14 सामने खेळले आणि 31.18 च्या सरासरीने 343 धावा केल्या.

तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटत वरील पैकी कोणता खेळाडू यावर्षी आयपीएलमध्ये सर्वांत जलद अर्धशतक झळकावण्याचा यशस्वी जयस्वालचा विक्रम मोडीत काढेल आणि आपल्या नावावर एक नवा विक्रम नोंदवेल, कमेंट करून नक्की सांगा.


===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

हेही वाचा:

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दीपक चहरच्या जागी भारतीय संघात खेळणार ‘आकाश दीप’ कोण आहे? वडील आणि भावाचे निधन, आईने मेहनत करून बनवले क्रिकेटर..

कारकीर्द कितीही वादाची असली तरीही, ‘सनथ जयसूर्या’ खेळाडू जबराटचं होता…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *