एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 150 धावा करण्याचा पराक्रम या 3 खेळाडूंच्या नावी, जाणून घ्या कोण आहेत ते खेळाडू.

वनडे क्रिकेटमध्ये शतक झळकावणं हे प्रत्येक फलंदाजाचं स्वप्न असतं. एकदिवसीय क्रिकेटमध्ये शतक झळकावूनही मोठा डाव खेळणारे अत्यंत कमी फलंदाज आहेत. कारण एकदिवसीय सामन्यात अत्यंत हळुवार खेळावे लागते तसेच टिकून खेळने खूप महत्त्वाचे असते.
तर मित्रांनो आज आम्ही या लेखात तुम्हाला अश्या खेळाडू बद्दल सांगणार आहे ज्यांनी एकदिवसीय क्रिकेट सामन्यात सर्वात जलद 150 धावा करण्याचा पराक्रम केला आहे. जाणून घेऊयात कोण आहेत ते 3 खेळाडू.
एबी डिव्हिलियर्स:-
एबी डिव्हिलियर्स ला दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघातील सर्वात आक्रमक फलंदाज समजले जाते तसेच या यादीत एबी डिव्हिलियर्स चे नाव अव्वल स्थानी आहे. एबी डिव्हिलियर्सने 2015 विश्वचषकात वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात 66 चेंडूत 162 धावांची दमदार खेळी केली होती. एबी डिव्हिलियर्स ने अवघ्या 64 चेंडूत 150 धावा पूर्ण केल्या होत्या. त्याने या सामन्यात एकूण 17 चौकार आणि 8 षटकार मारून 150 धावा पूर्ण केल्या होत्या.
जोस बटलर:-
इंग्लंड क्रिकेट संघातील अत्यंत तुफानी आणि स्फोटक फलंदाज म्हणून बटलर ला ओळखले जाते. जोस बटलर ने नेदरलँड् विरुद्धच्या सामन्यात 65 चेंडूत 150 धावा केल्या होत्या. या सामन्यात 70 चेंडूत 162 धावा करून तो बाद झाला. बटलरने आपल्या डावात आक्रमकपणे खेळी करून 14 षटकार आणि 7 चौकार लावून 162 धावा केल्या.
जोस बटलर:-
या यादीत तिसऱ्या स्थानी जोस बटलर चे नाव आहे, जोस बटलर ने 2019 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात 76 चेंडूत 150 धावा केल्या होत्या. यानंतर पुढच्याच चेंडूवर तो बाद झाला. या डावात जोस बटलर ने 13 चौकार आणि 12 षटकार मारून 150 धावा पूर्ण केल्या होत्या.