आयपीएलमधील पहिले षटक निर्धाव टाकणारा वेगवान गोलंदाज ‘कामरान खान’ आहे तरी कुठे? सध्या करतोय अशी कामे…!

आयपीएलमधील पहिले षटक निर्धाव टाकणारा वेगवान गोलंदाज 'कामरान खान' आहे तरी कुठे? सध्या करतोय अशी कामे...!

ताज्या बातम्या आणि अपडेट्स Whattsapp वर मिळवण्यासाठी जॉईन करा: Whatsapp Group

=======

कामरान खान: भारतात सध्या इंडियन प्रीमियर लीगचा 17 वा हंगाम सुरू आहे. आत्तापर्यंत 23 सामने झाले असून यंदाच्या हंगामामध्ये शशांक सिंह, मयंक यादव व आशुतोष शर्मा सारखे स्टार खेळाडूंनी धमाल केली आहे. आयपीएल असा प्लॅटफॉर्म आहे ज्यातून भारतीय क्रिकेट संघाला अनेक स्टार खेळाडू मिळाले आहेत ज्यांनी पुढे आपली कारकीर्दी वाढवली तर काही खेळाडू असे आहेत ज्यांनी सुरुवातीच्या टप्प्यांमध्ये प्रचंड वाहवा मिळवली नंतर ते गडप झाले. त्यापैकी चा एक खेळाडू म्हणजे ‘कामरान खान‘ जो क्रिकेट पासून पूर्ण दूर गेला आहे.

कामरान खान बर्थडे: लकड़ी काटने वाले का बेटा, शेन वार्न जिसके फैन थे, अचानक  कहां गायब हो गया? | Patrika News

2009 ची ही गोष्ट होती. एक वेगवान गोलंदाज आला होता, ज्याचे नाव कामरान खान होते. हा तोच गोलंदाज होता ज्याला ऑस्ट्रेलियाचा दिवंगत महान दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्न यांनी ‘टॉरनेडो’ म्हणजेच वादळ असे नाव दिले होते. राजस्थान रॉयल्सचा तत्कालीन कर्णधार शेन वॉर्न यांना कामरान खान यांची गोलंदाजी फारच आवडायची. अप्रतिम वेग, अचूक टप्पा आणि यॉर्कर टाकण्याची क्षमता पाहून शेन वॉर्न या युवा गोलंदाजावर खूपच इम्प्रेसिव्ह झाले होते.

आयपीएलमधील पहिले निर्धाव षटक टाकण्याचा विक्रम कामरान खानच्या नावे आहे.

कामरान खान याच्या नावे आयपीएल मधील पहिले निर्धाव टाकण्याचा विक्रम आहे. त्याने राजस्थान रॉयल संघाकडून खेळताना केकेआर विरुद्धच्या सामन्यात ही कामगिरी केली होती. त्याचे वैशिष्ट्य म्हणजे तो सतत 140 च्या स्पीडने गोलंदाजी करत होता. 2009 मध्ये या गोलंदाजाने प्रचंड वाहवा मिळवली. त्याची गोलंदाजी पाहून प्रत्येक जण त्याची तुलना श्रीलंकेचा दिग्गज वेगवान गोलंदाज लसित मलिंगा याच्याशी केली. कारण तो मलिंगा सारखाच खतरनाक यॉर्कर चेंडू फेकण्यात माहीर होता. विशेष म्हणजे त्याची गोलंदाजीची शैली ही मलिंगसारखी होती.

भारताचा मलिंगा मानला जाणारा कामरान खान 2012 मध्ये आयपीएल मधील शेवटचा सामना खेळल्यानंतर अचानक क्रिकेट मधून दूर झाला. पुन्हा या लीग मध्ये तो कधीच क्रिकेट खेळताना दिसून आला नाही. कामरान हा यूपी मधील महू गावचा रहिवासी आहे. प्रसारमाध्यमांच्या माहितीनुसार, कामरान सध्या आपल्या कुटुंबाचे पालन पोषण करण्यासाठी मुंबईमध्ये व्यावसायिक क्रिकेट खेळत आहे तर काही प्रसार माध्यमांच्या माहितीनुसार तो एअर इंडिया कडून क्रिकेट खेळतो आहे. यासाठी तो रात्रंदिवस मेहनत घेतोय.

आयपीएलमधील पहिले षटक निर्धाव टाकणारा वेगवान गोलंदाज 'कामरान खान' आहे तरी कुठे? सध्या करतोय अशी कामे...!

कामरन खान हा ऑस्ट्रेलियाचे दिवंगत खेळाडू शेन वॉर्न यांचा आवडता खेळाडू होता. एक वेळ अशी आली होती की, त्याच्या गोलंदाजीवर संशय घेण्यात आला होता. त्यानंतर त्याच्या गोलंदाजीचा स्पीड देखील कमी झाला. 2010 मध्ये या गोलंदाजावर चकिंगचा आरोप देखील लावण्यात आला. त्यामुळे त्याला काही सामन्यांमध्ये बाहेर बसावे लागले.

गोलंदाजीचे शैली तपासण्यासाठी त्याला ऑस्ट्रेलियाला देखील जावे लागले. तेथे त्याला हिरवा कंदील मिळाला. 2011 मध्ये हा खेळाडू पुणे फ्रेंचायजी संघासोबत जोडला गेला. या सीजन नंतर तो कधीच या IPL लीगमध्ये दिसून आला नाही.

कामरान खाने 2009 ते 10 दरम्यान राजस्थान रॉयल संघाचे प्रतिनिधित्व केले होते. त्यानंतर 2011 मध्ये तो पुणे वॉरियर्स संघाकडून क्रिकेट खेळला. यात त्याने नऊ सामन्यात नऊ विकेट घेतले. t20 क्रिकेटमध्ये त्याच्या नावे 11 सामन्यात 12 विकेट घेतल्याची नोंद आहे.


====

आमचे ईतर लेख आणि ट्रेंडीग बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

 

IPL 2024: मुंबई इंडियन्सने अचानक केला संघात बदल, या दिग्गज खेळाडूला बाहेर काढून या इंग्लंड च्या खेळाडूला दिली संधी.

IPL 2024: यॉर्कर स्पेशालिस्ट ‘जसप्रीत बुमराह’ आयपीएलसाठी पूर्णपणे फिट; यंदाच्या आयपीएल मध्ये या तीन विक्रमावर असेल नजर…