आर आश्विन हा भारतीय क्रिकेट संघातील एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखले जाते. टेस्ट क्रिकेट मध्ये आर आश्विन ने असे रेकॉर्ड बनवले आहे जे जगातील कोणत्याच खेळाडूला बनवणे शक्य होणार नाही. तसेच हे रेकॉर्ड बनवणारा आश्विन हा जगातील एकमेव खेळाडू बनला आहे.
भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघामध्ये 5 वी टेस्ट सीरिज खेळली गेली होती. या पाचव्या टेस्ट सिरीज मध्ये आर आश्विन ने एक रेकॉर्ड आपल्या नावी बनवला आहे. भारतीय क्रिकेट संघाचा स्टार ऑफ स्पिनर गोलंदाज म्हणून आर आश्विन ला ओळखल जात. आर आश्विन च्या करियर मधील हा 100 वा टेस्ट सिरीज चा सामना होता. तसेच भारतीय संघाकडून 100 वा टेस्ट सिरीज सामना खेळणार आर आश्विन हा 14 वा खेळाडू ठरला आहे. हा टेस्ट सिरीज सामना हिमाचल प्रदेश धर्मशाला येथे झाला होता. सांगायचे झाले तर हा आजवर आर आश्विन ने टेस्ट सिरीज मध्ये अनेक रेकॉर्ड आपल्या नावी केली आहेत अशी रेकॉर्ड बनवलेत की सहजासहजी कोणता खेळाडू ही रेकॉर्ड मोडू शकत नाही.
आर अश्विनचा मोठा पराक्रम:-
भारतीय क्रिकेट संघातील दिग्गज खेळाडू म्हंटले की त्यामध्ये आर आश्विन चा समावेश होतो भारतीय क्रिकेट संघाचा आर आश्विन हा स्टार गोलंदाज सुद्धा आहे. क्रिकेट च्या इतिहासात आर आश्विन ने अनेक पराक्रम केले आहेत त्यामधील एक म्हणजे आर आश्विन ने कसोटी क्रिकेटमध्ये 500 हून अधिक विकेट्स घेतल्या आहेत त्याचबरोबर पाच शतके झळकावणारा तो जगातील एकमेव खेळाडू आहे. या शिवाय कसोटी क्रिकेटच्या इतिहासात अशी कामगिरी कोणत्याही खेळाडूने केलेली नाही. आर अश्विनने कसोटी क्रिकेटमधील 500 विकेट्स घेतल्या आहेत.
आर अश्विनची आंतरराष्ट्रीय करियर:-
आर अश्विन ने भारतीय क्रिकेट संघासाठी आतापर्यंत 100 कसोटी सामने खेळले आहेत. या कालावधीत त्याने एकूण 507 विकेट घेतल्या आहेत आणि 3309 धावा केल्या आहेत. त्याने कसोटीत 14 अर्धशतके आणि 5 शतके झळकावली आहेत. त्याचबरोबर त्याने भारताकडून 116 एकदिवसीय सामने खेळताना 156 विकेट्स घेतल्या आहेत. त्याच बरोबर टी-20मध्ये 65 मॅचमध्ये 72 विकेट घेतल्या आहेत.
==
आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.
हे ही वाचा:- WPL: 31 वर्षीय खेळाडूने WPL मध्ये इतिहास रचला, हा रेकॉर्ड बनवणारी पहिली महिला फलंदाज.
हे ही वाचा:- ‘फिफ्टी आणि सेंच्युरी म्हणजे टाइमपास करणे’, हार्दिक पांड्याने दिली या दिग्गज खेळाडूंना खुन्नस.