पाकिस्तान हा तसा मुस्लिम राष्ट्र आहे. क्रिकेट विश्वातला पाकिस्तान हा भारताचा कट्टर प्रतिस्पर्धी आहे. या दोन्ही संघात प्रत्येक वेळेस चुरशीचे सामने पाहायला मिळतात. पाकिस्तान संघातील बहुतांश खेळाडू हे मुस्लिम आहेत. हिंदू खेळाडूंची संख्या या संघात अत्यंत कमी असते.
पाकिस्तान क्रिकेट संघाकडून प्रतिनिधित्व करणारा पहिला हिंदू क्रिकेटपटू म्हणून ‘अनिल दलपत’ यांना ओळखले जाते. पाकिस्तान क्रिकेट संघाकडून आतापर्यंत केवळ दोनच हिंदू खेळाडूंनी प्रतिनिधित्व केले आहे. पाकिस्तान क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अनिल दलपत यांच्या क्रिकेट कारकीर्द विषयी एक नजर टाकूया.
पाकिस्तान क्रिकेट संघात खेळणारा पहिला हिंदू खेळाडू खेळाडू अनिल दलपत यांच्या क्रिकेट कारकीर्द
अनिल दलपत यांनी पाकिस्तान संघाकडून क्रिकेटमध्ये पदार्पण केले असले तरी त्यांच्या क्रिकेट कारकीर्दीमध्ये त्यांना छाप सोडता आली नाही. 20 सप्टेंबर 1963 साली जन्मलेल्या अनिल दलपत यांना लहानपणापासून क्रिकेटचे वेड होते. स्थानिक क्रिकेटमध्ये त्यांनी धावांचा रतीब घातला होता. त्यांच्या या दमदार कामगिरीमुळे त्यांना पाकिस्तानकडून आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली.
2 मार्च 1984 साली त्यांनी पहिल्यांदा इंग्लंड विरुद्ध खेळताना कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. कसोटी क्रिकेट बरोबरच त्यांनी वन डे क्रिकेटमध्ये लवकरच पदार्पण केले. मात्र एकदिवसीय क्रिकेट बरोबरच कसोटी क्रिकेटमध्ये देखील त्यांची कामगिरी ही साधारण राहिली.
अनिल दलपत यांनी केवळ 9 कसोटी आणि 15 एकदिवसीय सामन्यात पाकिस्तान संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. कसोटी क्रिकेटमध्ये 15.18 च्या सरासरीने अवघ्या 167 धावा त्यांना काढता आल्या. यात केवळ एकमेव अर्धशतकाचा समावेश आहे. कसोटी क्रिकेटमध्ये केवळ त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत केवळ 20 चौकार ठोकलेत.
अनिल दलपत हे एक दिवसीय क्रिकेटमध्ये देखील फेल गेले. 15 एकदिवसीय सामन्यामध्ये 12.43 च्या सरासरीने अवघ्या 87 धावा करू शकले. एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेटमध्ये त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर अवघ्या 254 धावा करू शकले. त्यांच्या या सुमार कामगिरीमुळे त्यांना संघाबाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. क्रिकेट खेळणे सोडून दिल्यानंतर अनिल दलपत हे कॅनडामध्ये जाऊन कायमस्वरूपी स्थायिक झाले.
अनिल दलपत यांच्यानंतर दॅनिश कनेरीया याने मात्र पाकिस्तान संघाकडून दीर्घकाळ आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेट खेळला. पाकिस्तान क्रिकेट संघात खेळणारा तो दुसरा हिंदू खेळाडू होता. त्याच्यावर देखील मॅच फिक्सिंगचे आरोप लावण्यात आले होते. त्याने एक उत्तम जागतिक दर्जाचा फिरकीपटू म्हणून नाव कमवले.
क्रिकेटमधून निवृत्त घेतल्यानंतर त्याने पाकिस्तानचे खेळाडू त्याला हीन वागणूक देत असल्याचा आरोप केला होता. सकलेन मुश्ताक नंतर तो पाकिस्तानचा सर्वाधिक यशस्वी गोलंदाज आहे.
हेही वाचा:
विश्वचषकात पहिल्याच चेंडूवर बाद झाले आहेत हे 6 फलंदाज; एक आहे भारताचा माजी प्रशिक्षक..
अफगाणिस्तानी तरुणी विद्यार्थ्यांना वाटते विश्वचषकाचे मोफत तिकिटे? कोण आहे ही तरुणी
पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यापूर्वी शुभमन गिल विषयी मिळाली मोठी अपडेट; वाचा काय आहे बातमी..