सेमिफायनल आधीच शाहीद आफ्रिदीने आयसीसीवर केला हा मोठा आरोप, बीसीसीआयअध्यक्ष करणार कारवाई?
सेमिफायनल आधीच शाहीद आफ्रिदीने आयसीसीवर केला हा मोठा आरोप, बीसीसीआयअध्यक्ष करणार कारवाई?
अलीकडेच पाकिस्तानचा पूर्व क्रिकेटर व कप्तानसुद्धा राहिलेला आहे शाहीद आफ्रिदीने एक नकारात्मक बयान विश्वचषक स्पर्धेदरम्यान दिले आहे. आफ्रिदी म्हणाला की ‘ आसीसी चा झुकाव भारतीय संघाकडे आहे.’ त्याचे असे म्हणणे खूपच हास्यास्पद आणि नकारात्मक आहे. आपल्या या विधानामधून त्याची चिडचिड फक्त तेवढी व्यक्त होते. मित्रांनो आफ्रिदीचे हे विधान नेमके त्यावेळेस आले जेव्हा भारत-बांगलादेश मॅच मध्ये भारताने ५ रणाने बांगलादेश वर विजय प्राप्त केला.
मात्र शाहिद आफ्रिदीच्या मते यामध्ये अंपायर चा हात आहे. अंपायर ने जाणून बुजून ब्रेकनंतर लगेच खेळ सुरू केला. या मॅचवर पावसाचे सावट होते. मैदान ओले होते. अशा वातावरणाचा फायदा भारताच्या बॅटिंगला मिळावा आणि भारताच्या सेमी फायनल मध्ये जाण्याच्या आशा वाढाव्या असा अप्रत्यक्ष आरोपच त्यानी केला आहे.
View this post on Instagram
इतके वर्ष क्रिकेट जगताप घालवलेला एक खेळाडू अशा प्रकारे कसे काय वक्तव्य करू शकतो याचेच नवल वाटते. अनेक भारतीय प्रेक्षक त्याला भयंकर ट्रोल करत आहे. मुळात मेलबर्नच्या मैदानात पाकिस्तानचा ज्याप्रमाणे धुवाधार पराभव भारतीय संघाने केला त्यामुळे चिरडीला येऊन शाहिद आफ्रिदी काहीतरी अनसन बडबड करतो आहे असे अनेकांचे म्हणणे आहे.
त्यावर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष रोजर बिन्नी यांनी प्रतिक्रिया देत म्हटले की आफ्रिदीने केलेले विधान सर्वस्वी चुकीचे असून आयसीसी सर्वच खेळाडू आणी संघांना समान न्याय देते. जरी भारत हा क्रिकेट मधील एक पॉवरफुल देश असला तरी भारताला अधिकाधिक सेमी फायनल च्या नजिक नेण्यासाठी आयसीसी काही करत नाही. आयसीसीचे धोरण सुरुवातीपासूनच सर्वांसाठी समान राहीलेले आहे. त्यामुळे आफ्रिदीचे असे म्हणणे व्यर्थ आहे.

आफ्रिदीच्या मते भारत पाकिस्तान मॅचच्या वेळेस जे अंम्पायर होते तेच अंपायर आयसीसीने भारत-बांगलादेश या सामन्यामध्ये सुद्धा मैदानात उतरवले. आणि आयसीसी च्या सांगण्यावरूनच या अंपायर ने ब्रेक असताना सुद्धा ब्रेकनंतर लगेच खेळ सुरू केला. आणि त्याचा फायदा प्रत्यक्ष भारतीय संघाला झाला. जर बांगलादेशने दोन-तीन ओर मध्येच आपले विकेट गमावल्या नसत्या तर ही मॅच भारताला जिंकता आली नसती; असेही तो पुढे म्हणाला. मात्र त्याच्या सर्व आरोपांचे खंडन बीसीसीआयचे अध्यक्ष रोजर बिन्नी यांनी केले आहे. आयसीसी कोणासोबतही भेदभाव करत नाही असे सांगून एका वाक्यात त्यावर बिन्नीनी प्रतिक्रिया दिली आहे.
आपल्याला माहित आहे की मेलबर्न मध्ये पाकीस्तानचाचा कसा धुवा भारतीय संघाने उडवला. त्यामुळे मनातली चिडचिड, खदखद कुण्यातरी स्वरूपात बाहेर येणारच. त्यामुळे अशाप्रकारची बडबड अनेक लोक करतच राहतात. त्यांच्याकडे फारसे लक्ष देऊ नये. त्यासोबतच पाकिस्तान मध्ये क्रिकेटर इरफान खान पासून क्रिकेटचे वेगळे स्वरुप निर्माण झाले. क्रिकेटर आपल्या देशाची अधिकाधिक बाजू घेईल तर त्याला राजकारणात सुद्धा खूप स्कोप मिळेल. त्यामुळे पण अनेक क्रिकेटर्स अशाप्रकारे विधान करत राहतात आणि प्रसिद्धी मिळवत राहतात.
हेही वाचा:
या कारणांमुळे पंजाब किंग्सने मयंक अगरवालचा पत्ता केला कट, आता हा खेळाडू झाला पंजाब किंगचा कर्णधार..