ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज फलंदाज व भारताचे माजी प्रशिक्षक ग्रेग चॅपल हे सध्या आर्थिक संकटात सापडले आहेत. ग्रेग चॅपल हे 2005 -07 मध्ये भारताचे प्रशिक्षक म्हणून काम पाहिले आहे. दोन वर्षाची कारकीर्दी त्यांची वादग्रस्त ठरली होती. त्यांच्याच कालावधीत भारतीय संघ विश्वचषक 2007 स्पर्धेच्या साखळी फेरीतूनच बाहेर पडला होता. त्यांची आर्थिक समस्या सोडवण्यासाठी त्यांचे मित्र ऑनलाइन निधी गोळा करण्याचे काम करत आहेत.
ग्रेग चॅपल त्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. एक दिग्गज खेळाडू म्हणून ख्याती निर्माण केलेल्या या खेळाडूला लक्झरीयस जीवन जगता येत नाही. चॅपल यांनी ‘न्यूज कॉर्प’ला सांगितले की, ‘माझी फारशी वाईट परिस्थिती नाही. मला वाईट वाटावे असे नक्कीच वाटत नाही की आम्ही गंभीर संकटात नाही, परंतु आम्ही लक्झरी जीवन जगत नाहीत. मला वाटते की बहुतेक लोक असे विचार करतात की, आम्ही क्रिकेट खेळलो म्हणून आम्ही सर्व चैनीचे जीवन जगत आहोत. आपण गरीब नक्कीच नाही पण आजच्या खेळाडूंसारखे फायदे मिळत नाहीत.”
चॅपल यांचे आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी ‘गो फंड मी’ हे अभियान सुरू करण्यात आले आहे. ऑनलाइन राबवण्यात येणाऱ्या या निधीमधून अडीच लाख अमेरिकन डॉलर गोळा होतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. हा निधी गोळा झाल्यानंतर ग्रेग यांच्या आर्थिक सुधारण्यात भर होण्याची शक्यता आहे. ग्रेग हे केवळ एकटेच आर्थिक संकटात सापडले नाही तर त्यांच्या कालावधीतील अनेक खेळाडू आहेत की जे अत्यंत सामान्य जीवन जगत आहेत. मागील आठवड्यात मेलबनच्या मैदानावरती मेजवानीचे आयोजन करण्यात आले होते. या मेजवानीचा संपूर्ण खर्च चापल यांचे मित्र एडी मॅगवायर यांनी केले होते.
ग्रेग चॅपल यांनी 1970-80 च्या दशकात 87 कसोटी सामन्यांमध्ये 24 शतके झळकावली होती. त्यानी 48 कसोटी सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व केले आहे. 1984 मध्ये त्यांनी कसोटी क्रिकेटला राम राम ठोकला. त्यावेळी चॅपल (7110) हे ऑस्ट्रेलियाकडून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज होते. त्यानंतर त्यानी सर डोनाल्ड ब्रॅडमन (6996) यांचा विक्रम मोडला.
ग्रेग यांनी भारतीय संघाच्या प्रशिक्षक पदाची धुरा सांभाळल्यानंतर सर्वप्रथम त्यांनी सौरभ गांगुली याला संघाबाहेर काढून टाकले. त्यानंतर दोघांमध्ये प्रचंड वाद निर्माण झाला होता. विशेष म्हणजे भारतीय प्रशिक्षक व्हावा म्हणून ग्रेग यांच्या नावाची शिफारस सौरभ गांगुलीने केली होती. प्रशिक्षक झाल्यानंतर तेच सौरभ गांगुलीला नडले. तसेच त्यांचे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांच्यासोबत ही संबंध बिघडले होते. 2007 विश्वचषक स्पर्धेत झालेल्या पराभवानंतर त्यांना त्या पदावरून पायउतार व्हावे लागले.