ऐतिहासिकव्यक्तीविशेष

आयुष्यभर कधीही पैसा न कमावणारे ‘लाल बहादूर शास्त्री’ एकमेव पंतप्रधान असावेत..

 

आयुष्यभर कधीही पैसा न कमावणारे ‘लाल बहादूर शास्त्री’ एकमेव पंतप्रधान असावेत..


भारताच्या इतिहासात  लबहाद्दूर शास्त्री यांना आदराचे स्थान आहे.पंतप्रधानपदी असतानाही शास्त्री यांचे पाय जमिनीवर होते. त्यांनी कधीच सरकारी गाडीनं प्रवास केला नाही. त्यांच्या मुलानं एकदा सरकारी गाडी

अत्यंत सामान्य परिस्थितीमध्ये त्यांनी आपले बालपण घालवले. आपल्या आई वर पैश्याचा भार येऊ नये म्हणून ते गंगा नदी पोहून शाळेला जायचे.या प्रतिकूल परिस्थितीवर मात करत त्यांनी शिक्षण घेतले. त्यांची प्रविण्याता ओळखून काशी विद्यापीठाने त्यांना ‘शास्त्री’ ही पदवी दिली. त्यांचे खरे आडनाव ‘श्रीवास्तव’ होते.जात आणि राजकारण या दुष्टचक्रात न पडता समाजसेवेसाठी, व्यवहारात आडनावाचा उपयोगच त्यांनी कधी केला नाही .

पुढे ‘शास्त्री’ ही पदवी त्यांच्या नावाचा एक भाग बनली. वयात आल्यानंतर , परकीयांच्या गुलामीतून देश मुक्त करण्याच्या लढ्यात त्यांना रुची निर्माण झाली.गांधीजींनी देशवासियांना असहकार चळवळीमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले होते , त्यावेळी सोळा वर्षाच्या लाल बहादूरांनी शाळा सोडून चळवळीमध्ये जाण्याचा मोठा निर्णय घेतला .पुढे १९२८ रोजी ललितादेवी यांच्याशी विवाह झाला.

लहानपणापासूनच महात्मा गांधी , लोकमान्य टिळक , लाल लजपतराय या महापुरुषांच्या जीवनकार्याचा प्रभाव त्यांच्यावर होता. १९३० मध्ये, महात्मा गांधी यांनी दांडी यात्रा केली आणि मिठाचा कायदा मोडला.

लाल बहादूर शास्त्री

या प्रतिकात्मक संदेशाने संपूर्ण देशात क्रांती आली. लाल बहादूर शास्त्री पेटून उठले आणि स्वातंत्र्य लढयात त्यांनी स्वत:ला झोकून दिले. त्यांनी अनेक विद्रोही मोहिमांचे नेतृत्व केले आणि एकूण सात वर्षे ब्रिटीश तुरुंगवासात घालवली. स्वातंत्र्याच्या या संग्रामाने ते अधिक परिपक्व झाले.

काँग्रेस पक्ष्यामध्ये त्यांनी विविध पदांवर काम केले तसेच पक्षबांधणी मध्ये महत्वाची भूमिका बजावली. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पंडित नेहरू यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळात रेल्वे मंत्री , वाहतूक आणि दळणवळण मंत्री ,वाणिज्य आणि उद्योग मंत्री , गृहमंत्री आणि नेहरूंच्या आजारपणात बिनखात्याचे मंत्री म्हणूनही काम पाहिले. रेल्वे मंत्री असताना तमिळनाडू मध्ये झालेल्या रेल्वे अपघातामध्ये बरेच जण मरण पावल्यामुळे स्वतःला जबाबदार ठरवत त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला.

 

त्यावेळी देश आणि संसदेने त्यांच्या अभूतपूर्व निर्णयाची प्रशंसा केली. पंडित नेहरू यांचे निधन झाल्यामुळे काँग्रेस पक्षाने त्यावेळी स्वच्छ प्रतिमा, देशभक्ती व लोकांप्रती असलेली निष्ठा पाहून लाल बहादूर शास्त्री यांना ९ जून १९६४ रोजी स्वतंत्र भारताचे दुसरे पंतप्रधान केले. १९६५ मध्ये पाकिस्तानने भारतावर अचानक हल्ला केला, त्याला भारतीय सैनिकांनी चोख प्रत्युत्तर दिले.

याच युद्धकाळात देशावर आलेले लष्करी संकट आणि अन्नधान्य तुटवडा व दुष्काळ या मुळे आलेले उपसमारीचे संकट , अश्या परिस्थितीत देशाचे आधारस्तंभ सैनिक आणि शेतकरी यांचे मनोधैर्य वाढावे व प्रोत्साहन मिळावे यासाठी शास्त्रींनी ” जय जवान जय किसान” हा नारा दिला. आजही हा नारा भारतीयांमध्ये नवचैतन्य निर्माण करतो.

पुढे भारत पाकिस्तान युद्ध थांबावे यासाठी पाकिस्तानने अमेरिकेची मदत मागितली . तसेच अमेरिकेने व रशियाने संगमताने एक चाल केली. शास्त्रीजींना ताशकंद येथे बोलावले आणि ताशकंद करारावर सही करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दबाव आणला.

लाल बहादूर शास्त्री

१० जानेवारी १९६६ या दिवशी भारताचे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री व पाकिस्तानी राष्ट्रपती अयुब खान यांनी ताशकंद करारावर सह्या केल्या. या करारावर सह्या होताच काही तासातच लाल बहादूर शास्त्री यांच्या मृत्यूची बातमी आली. त्यांचा मृत्यू कसा झाला हे अद्यापही गूढ आहे. त्यावेळी त्यांच्या खात्यावर शून्य रुपये असून त्यांच्यावर कर्ज होते. ते कधीही सरकारी गाडीने प्रवास करत नसत. अश्या या थोर व्यक्तीला भारत सरकारने २ ऑक्टोबर १९६६ रोजी मरणोत्तर ‘भारतरत्न’ हा भारतातील सर्वोच्च किताब दिला.

तुमची शरीरयष्टी , उंची , स्वभाव , पोशाख कितीही सामान्य असली तरीही तुमची आंतरिक जबरदस्त इच्छाशक्ती , बुद्धिमत्ता , नम्रता , प्रामाणिकपणे सेवा करण्याची तळमळ तुम्हाला एक दिवस आकाश्याइतक्या उंचीवर नेऊ शकते याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सामन्यातील अतिसामान्य व्यक्ती लाल बहादूर शास्त्री होय. त्यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन…

लेखक :- विकास मोहन जगदाळे
(Government College Of Engineering, Aurangabad)


आणखी ताज्या स्पोर्ट्स बातम्या:

Viral Video: आडवा पडून सूर्यकुमार यादवने मारला एवढा जबरदस्त षटकार की श्रीलंकेचा कोच सुद्धा झाला हैराण, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल…

8 षटकार 6चौकार.. सुर्यकुमार यादव ने श्रीलंकेच्या गोलंदाजांना फोडून काढत ठोकले ताबडतोब शतक, श्रीलंकेसमोर विजयासाठी तब्बल एवढ्या धावांचे विशाल लक्ष…

दारू आणि सिगारेटचे शौकीन आहेत भारतीय क्रिकेट संघातील हे 5 खेळाडू, 2 नंबरच्या खेळाडूचे नाव वाचून तर सरकेल पायाखालची जमीन…

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
TEAM INDIA के प्लेअर्स ने खेली होली, बीसीसीआय ने शेअर किये PHOTO IRAL अभिनेत्री मृणाल ठाकूरच्या सुंदर अदानी लुटली मेहफिल, पहा PHOTO 3 indian player who cant play against shrilanka in odi series VIRAL PHOTO:अभिनेत्री तमन्ना भाटीयाचा रेड ड्रेसमध्ये बोल्ड लुक! महिला क्रिकेटपटू स्मृती मानधनाच्या ट्रेडीशनल लुकवर चाहते फिदा,