भारतीय क्रिकेटमध्ये गेल्या काही महिन्यांपासून अनेक महत्वपूर्ण बदल पाहायला मिळाले आहेत. जे काही निर्णय घेतले जात आहेत ते भविष्याचा विचार करून घेतले जात आहेत. टी -२० विश्वचषक २०२४ स्पर्धा पाहता, भारतीय संघात युवा खेळाडूंना प्राधान्य दिले जात आहे. आता अशी चर्चा सुरू झाली आहे की, भारतीय वनडे संघाच्या कर्णधारपदी देखील बदली होऊ शकते.
निवडकर्त्यांनी टी -२० संघाचे कर्णधारपद हार्दिक पंड्याकडे सोपवले आहे. तर वनडे आणि कसोटी संघाचे कर्णधारपद रोहित शर्माच्या हाती आहे. आगामी वनडे विश्वचषक २०२३ स्पर्धेत भारतीय संघाचे नेतृत्व रोहित शर्मा करणार हे जवळ जवळ निश्चित आहे. मात्र ही स्पर्धा झाल्यानंतर तो कर्णधारपद सोडू शकतो. अनेकांना असे वाटत असेल की, रोहित शर्माने कर्णधारपद सोडल्यानंतर केएल राहुलला कर्णधारपद दिले जाईल. मात्र तुमचा अंदाज चुकीचा ठरू शकतो,कारण हार्दिक पंड्याला वनडे संघाचे कर्णधारपद दिले जाऊ शकते.
क्रिकेटनेक्स्टच्या वृत्तात बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटले आहे की,”जर रोहित शर्माने वनडे संघाचे कर्णधारपद सोडले तर दुसरा पर्याय उपलब्ध आहे. सध्या होणाऱ्या वनडे विश्वचषक २०२३ स्पर्धेसाठी नेतृत्व करण्यासाठी रोहित शर्मा योग्य पर्याय आहे. मात्र पुढचा विचार देखील करावा लागणार आहे. जर रोहित शर्माने वनडे विश्वचषक झाल्यानंतर कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला तर आम्हाला पर्याय शोधावा लागेल.”
तसेच अधिकाऱ्याने पुढे म्हटले की, “हार्दिक कर्णधार म्हणून चांगली कामगिरी करतोय. तो युवा आहे आणि पुढे आणखी चांगली कामगिरी करू शकतो. सध्या रोहितच्या जागी दुसरा चांगला पर्याय नाही. त्याला पाठिंब्याची गरज आहे आणि त्याला सतत खेळण्याचे स्वातंत्र्यही मिळाले पाहिजे.”
हे ही वाचा..
चेतेश्वर पुजाराचा भीम पराक्रम! प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये असा कारनामा करणारा ठरलाय केवळ दुसरा फलंदाज…
Ranji Trophy – सरफराज खानची खेळी व्यर्थ! दिल्लीचा मुंबईवर तब्बल ४२ वर्षांनंतर विजय…