- Advertisement -

संतोकबेन: गुन्हेगारी जगतातील खरी गॉडमदर होती ही महिला गॅंगस्टर, पतीचा बदला घेण्यासाठी स्वतः उतरली होती अंडरवर्ल्ड गेंगमध्ये..

0 0

संतोकबेन: गुन्हेगारी जगतातील खरी गॉडमदर होती ही महिला गॅंगस्टर, पतीचा बदला घेण्यासाठी स्वतः उतरली होती अंडरवर्ल्ड गेंगमध्ये..


त्यावेळी गॉडफादर पुस्तक आणि चित्रपटाची जगभरात चर्चा होती भारतातही हा चित्रपट आवडणाऱ्या लोकांचा मोठा गट होतो तेव्ह त्याच वेळी दुसरीकडे गॉडमदर हा चित्रपट भारतात आला. वर्ष होते 1999चे. चित्रपटात शबाना आझमी यांनी गॉडमदरची भूमिका साकारली होती. या चित्रपटाला त्या वर्षी वेगवेगळ्या श्रेणींमध्ये 6 राष्ट्रीय पुरस्कार मिळाले.

हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित असल्याचा दावा केला जात आहे. त्या पात्राचे नाव होते संतोकबेन. संतोकबेन साराभाई जडेजा. ज्यांना लोक भीतीपोटी गॉडमदर म्हणत. आजच्या या लेखात आपण त्याच गॉडमदरची संपूर्ण कहाणी जाणून घेणार आहोत..

संतोकबेनची गॉडमदर बनण्याची कथा पूर्णपणे फिल्मी आहे. संतोकबेन 1980 च्या दशकात पतीसोबत गुजरातमधील पोरबंदरला राहण्यास आली होती. पती सरमन जडेजा कामाच्या शोधात असताना त्यांनी महाराणा मिल या नावाने कापड गिरणीत काम करायला सुरुवात केली. पण,तिथे त्याला एका नव्या ‘सिस्टीम’चा उलगडा झाला.

कापड गिरणीत मजुरांना जेवणाचे पैसे द्यावे लागत नसत पण तेथे प्रत्यक्षात जेवणासाठी मजुरांकडून पैसे घेतले जात होते.   डेबू बघेर नावाचा गुंडा हे काम  करायची आणि त्याची तिथे दहशत असल्यामुळे कोणीही त्याला आडवायचे नाही..  डेबूने सरमनकडेही जेव्हा पैसे मागितले पण सरमनने नकार दिला. डेबूने सरमनवर हात ठेवला आणि सरमननेही उत्तर दिले. भांडण झाले आणि डेबू मारला गेला. यानंतर सरमनने डेबूचे काम हाती घेतले.

येथूनच सरळ मार्गाने कापड गिरणीत काम करणाऱ्या सरमनने अवैध दारूच्या धंद्यातही हात आजमावयाला सुरवात केली. व्यवसाय आणि राजकीय वर्तुळात तो लवकरच वरपर्यंत पोहचला होता. पण याच दरम्यान डिसेंबर 1986 मध्ये प्रतिस्पर्धी टोळीतील कालिया केशवने त्याच्या साथीदारांसह सरमनवर गोळ्या झाडल्या ज्यात त्याचा मृत्यू झाला.

सरमनच्या मृत्यूची माहिती लंडनमध्ये राहणारा त्याचा धाकटा भाऊ भुरा याला समजली. भुरा लंडनहून पोरबंदरला पोहोचला.त्याने गॅंगमध्ये आपला जम बसवण्याचा प्रयत्न केला मात्र संतोकबेनने त्याला येथेच रोखले. आणि स्वतः संतोकबेन गॅंगला लीड करु लागली.

घरातील स्टोव्हची काळजी घेणाऱ्या संतोकबेनने पतीच्या हत्येचा बदला घेण्यासाठी कालिया केशव आणि त्याच्या टोळीतील 14 जणांवर बक्षीस ठेवले. याच आणखी एक कारण म्हणजे ही टोळी जिवंत राहिली तर मुलांना सोडणार नाही अशी भीतीही तिला वाटत होती. त्यामुळे या सर्वांच्या हत्येसाठी 1 लाखाचे बक्षीस ठेवण्यात आले होते. त्याचा परिणाम असा झाला की कालिया आणि त्याचे 14 जण मारले गेले.

या हत्येने संतोकबेन यांची पोरबंदरभर दहशत पसरली होती. तिथूनच तिचे नाव पडले ‘गॉडमदर.’

संतोकबेनने एकीकडे पतीच्या हत्येचा बदला घेतला आणि दुसरीकडे त्याचा व्यवसाय  सुद्धा सांभाळत पुढे नेण्यास सुरवात केली.यादरम्यान तिने गरिबांनाही मदत करायला सुरुवात केली आणि काही वेळातच ‘मसिहा’ अशी प्रतिमा निर्माण केली. आता प्रथम भीती नंतर मशीहा असी तिची प्रतिमा झाली होती.

संतोकबेन
यादरम्यान अनेक वेळा खून खराब होतच राहिला नंतर नंतर तर परिस्थिती अशी होती की तिच्या घरातून वाहणाऱ्या नाल्यात रंग वाहू लागला तरी रक्त वाहत आहे असे लोकांना वाटायचे. या सर्वाचा परिणाम असा झाला की पोरबंदर तालुकाध्यक्षपदी संतोकबेन यांची बिनविरोध निवड झाली.

येथे संतोकबेन यांना राजकारणाचे व्यसन लागले. 1990 च्या विधानसभा निवडणुकीत त्या जनता दलाच्या तिकिटावर उतरल्या आणि 35,000 मतांनी विजयी झाल्या. यापूर्वी या जागेवर एकही महिला आमदार नव्हती. मात्र,1995 साली त्यांनी काँग्रेस उमेदवाराला अर्ज मागे घेण्यास भाग पाडत स्वतः तिथे बिनविरोध निवडून आली.

संतोकबेन यांनी राजकारणाची किनार पकडली होती पण त्याही गुन्हेगारीच्या धाग्यात गुंडाळल्या गेल्या होत्या. तोपर्यंत तिच्यावर तब्बल 512गुन्हे दाखल झाले होते.

“गॉडमदर” हा चित्रपट प्रदर्शित झाल्यामुळे संतोकबेनने आपली प्रतीमा मलीन होत असल्याचा आरोप केला होतात्यांनी या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली आणि त्यामुळे त्यांच्या ‘मेहर’ समाजाला न्याय मिळणार नाही, असे सांगितले. चित्रपटाचे दिग्दर्शक विनय शुक्ला यांनी हा चित्रपट संतोकबेनवर आधारित नसल्याचा युक्तिवाद केला.

नंतर काही दिवसातच हे प्रकरण जरी मिटले असले तरीही आजही तो चित्रपट संतोकबेनच्याच जीवनावर आधारित असल्याच बोललं जातंय.

1996 मध्ये गुजरातमध्ये सत्तापरिवर्तन झाले. भाजपचे सरकार आले आणि संतोकबेन 16 महिने तुरुंगात गेल्या. तुरुंगातून सुटल्यानंतर ती राजकोटला गेली आणि तेथेही राजकारणात सक्रीय राहिली होती.. नंतर काही दिवसातच पोलिसांनी पुन्हा तिला अटक केले होते.


 

Leave A Reply

Your email address will not be published.