‘नाहीतर आयपीएल देशांतर्गत क्रिकेट खाऊन टाकेल…’ आयपीएलबद्दल गौतम गंभीरचे मोठे वक्तव्य, वाचून दिग्गजांच्या उंचावल्या भुवया..!

0
3
 'नाहीतर आयपीएल देशांतर्गत क्रिकेट खाऊन टाकेल...' आयपीएलबद्दल गौतम गंभीरचे मोठे वक्तव्य, वाचून दिग्गजांच्या उंचावल्या भुवया..!

ताज्या बातम्या आणि अपडेट्स Whattsapp वर मिळवण्यासाठी जॉईन करा: Whatsapp Group

=======

gautam gambhir campier ipl with international cricket:  इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) भारतीय संघासाठी खेळण्यासाठी शॉर्टकट ठरू नये, अशी आशा भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने व्यक्त केली आहे. आयपीएल आल्यानंतर असे अनेक खेळाडू आहेत ज्यांनी या लीगमध्ये चांगली कामगिरी करून भारतीय संघात स्थान निर्माण केले आहे.

अशा परिस्थितीत सर्वच खेळाडू आयपीएलला प्राधान्य देतात आणि देशांतर्गत क्रिकेटकडे दुर्लक्ष करतात. कोणत्याही किंमतीत टीम इंडिया मध्ये प्रवेश करण्यासाठी आयपीएल हा एकमेव निकष नसावा, असेही गंभीरचे मत आहे.

Gautam Gambhir: Biography of India's Underrated Legend – ZAP Cricket

gautam gambhir campier ipl with international cricket: नाहीतर आयपीएल देशांतर्गत क्रिकेट खाऊन टाकेल,गौतम गंभीरला सतावतेय ही चिंता.

आयपीएल आल्यानंतर देशांतर्गत खेळाडूंना फायदा झाला असून त्यांना आपले कौशल्य दाखवण्याची संधी मिळाल्याचेही गौतमने मान्य केले आहे. याशिवाय येथे आंतरराष्ट्रीय क्रिकेटपेक्षा जास्त स्पर्धा आहे. आजकाल तरुण खेळाडूंना फक्त टी-२० क्रिकेट खेळायचे आहे आणि त्यांना लांबच्या फॉरमॅटमध्ये रस नाही.

जागतिक क्रिकेटमध्ये अशी प्रकरणे आधीच पाहायला मिळत आहेत, जिथे खेळाडू लहान वयातच प्रमुख फॉरमॅटमधून निवृत्ती घेत आहेत. अशा परिस्थितीत भारताचा माजी दिग्गज ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनच्या यूट्यूब चॅनलवर बोलताना गंभीरने मोठे वक्तव्य केले आहे.

 

गौतम गंभीर म्हणाला,

“सर्वात मोठी चिंता ही आहे की, भारतासाठी कसोटी क्रिकेट खेळू इच्छिणारे किती तरुण खेळाडू आहेत. मला आशा आहे की, आयपीएल हा भारतासाठी खेळण्याचा शॉर्टकट बनणार नाही. आयपीएलच्या आगमनाचा फायदा भारताच्या देशांतर्गत खेळाडूंना झाला आहे. आता जेव्हा मी 2-3 संघांव्यतिरिक्त आंतरराष्ट्रीय स्तरावरील टी-20 संघ पाहतो, तेव्हा भारताकडून खेळण्याचा विचार केल्यास पुरेशी स्पर्धा नसते.

 'नाहीतर आयपीएल देशांतर्गत क्रिकेट खाऊन टाकेल...' आयपीएलबद्दल गौतम गंभीरचे मोठे वक्तव्य, वाचून दिग्गजांच्या उंचावल्या भुवया..!

गंभीर पुढे म्हणाला की,

“असे अनेक संघ आहेत जे भारताच्या गुणवत्तेशी बरोबरी करू शकत नाहीत. म्हणूनच मला वाटते की आज आयपीएल आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटपेक्षा अधिक स्पर्धात्मक बनले आहे. झालं असं की देशांतर्गत खेळाडूंचा दर्जा बदलला आहे, ते फक्त आयपीएल खेळण्यावर लक्ष केंद्रित करतात. ते खेळाडू टी-20 क्रिकेटसाठी ज्या प्रकारे काम करतात, त्यावरून असे दिसते की त्यांना फक्त आयपीएल खेळण्यावर लक्ष केंद्रित करायचे आहे.”

लक्ष देऊन पाहता गंभीरच्या मुद्द्यामध्ये तथ्य असल्याचे दिसून येत आहे. मागिल बऱ्याच वर्षापासून कसोटी क्रिकेट किंवा देशांतर्गत स्पर्धेतून कोणताही युवा खेळाडू टीम इंडिया पर्यंत पोहचला नाहीये. उलट आयपीएलच्या एका हंगामात चांगली कामगिरी केली की लगेच खेळाडूसाठी टीम इंदियाचे दरवाजे मोकळे होतात. म्हणूनच गंभीरला ही बाब चिंताजनक वाटते.


==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

महेंद्रसिंग धोनीच्या आई वडिलांसोबत कसे आहेत साक्षीचे संबंध? धोनीच्या नातेवाईकांबद्दल पत्नी साक्षी धोनी ने केला मोठा खुलासा…

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here