सतत नो बॉल टाकत असलेल्या अर्शदीप सिंगला गौतम गंभीरने दिला ‘गुरुमंत्र’

सध्या भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये ३ टी -२० सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील अंतिम आणि निर्णायक टी -२० सामना १ फेब्रुवारी रोजी पार पडणार आहे. या मालिकेत भारताचा एक गोलंदाज भरपूर चर्चेत राहिला आहे. तो गोलंदाज म्हणजे युवा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग. गेल्या काही सामन्यांमध्ये अर्शदीप सिंगला योग्य लाईन लेंथने गोलंदाजी करण्यात अडचणीचा सामना करावा लागतोय. दरम्यान भारतीय संघाचा माजी खेळाडू गौतम गंभीर याने अर्शदीप सिंगला मोलाचा सल्ला दिला आहे.
अर्शदीप सिंगने न्यूझीलंड विरुध्द झालेल्या पहिल्या टी -२० सामन्याच्या शेवटी नो बॉल टाकला. तो भारतीय संघाला खूप महागात पडला. त्याने ४ षटकांच्या स्पेलमध्ये तब्बल ५१ धावा खर्च केल्या. यादरम्यान त्याला केवळ एक गडी बाद करता आला होता.

अर्शदीप सिंगला मोलाचा सल्ला देत, गौतम गंभीरने म्हटले की,”अर्शदीप सिंगने आपल्या बेसिकवर अधिक भर दिला पाहिजे. त्यामुळे त्याला आपल्या लाईन आणि लेंथवर मेहनत घ्यावी लागेल.”तसेच तो पुढे म्हणाला की, “मुख्य बाब म्हणजे, तुम्ही नो बॉल टाकू शकत नाही. नो बॉल टाकल्यामुळे संघ अडचणीत येत असतो. गेल्या सामन्यात देखील असेच चित्र पाहायला मिळाले होते. विश्वचषक स्पर्धेत परिस्थिती वेगळी असेल. ऑस्ट्रेलियात चेंडूला बाऊन्स मिळतो. मात्र भारतात सपाट खेळपट्टी असेल. त्यामुळे त्याला गोलंदाजीत विविधता आणावी लागेल.”
हे ही वाचा..
‘भारतीय संघात काही संधी मिळेना..’ आता अजिंक्य रहाणे खेळणार ‘या’ देशासाठी..
‘करो या मरो’ सामन्यात भारतीय संघात होऊ शकतात हे ३ महत्वाचे बदल! अशी असू शकते प्लेइंग ११