लखनऊ सुपर जायन्ट्स ने मॅच जिंकताच गौतम गंभीर भडकला बंगलोर च्या चाहत्यांवर, तोंडावर बोट ठेवून दिला ईशारा
२०२३ च्या आयपीएल मध्ये सोमवारी रात्री जो बंगलोर च्या चिन्हस्वामी स्टेडियम मध्ये सामना झाला जो की रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध लखनऊ सुपर जायन्ट्स. या दोन संघामध्ये जी चुरशीची लढाई झाली ती अजून आयपीएल च्या इतिहासात याआधी कधीही झालेली नाही.

अगदी शेवटच्या बॉलमध्ये आणि १ विकेट्स राखून लखनऊ ने झालेला सामना आपल्या हातात घेतला आणि।रॉयल चॅलेंजर्स बंगलोर चा पराभव झाला. जे की या मॅचमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ने प्रथमता बॅटिंग करून लखनऊ साठी २१३ चे टार्गेट दिले होते.
लखनऊ ला एवढे टार्गेट पूर्ण करायला रॉयल बंगलोर ने घाम फोडला होता मात्र लखनऊ ने शेवटी हे टार्गेट पूर्ण करून काल रात्री चा सामना आपल्या हाती घेतला.रात्रीचा सामना बंगलोर च्या चिन्हस्वामी स्टेडियम होता त्यामुळे पूर्ण स्टेडियम फक्त आणि फक्त रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ला सपोर्ट करत होते.
लखनऊ सुपर जायन्ट्सला १ बॉल मध्ये १ रन करायची होती आणि ती रन झाल्यानंतर लखनऊ ने मॅच जिकली मात्र मॅच जिंकताच लखनऊ टीम चे मेंटॉर गौतम गंभीर मैदानावर पोहचले. जे की चिन्हस्वामी स्टेडियम वर बंगलोर संघाच्या चाहत्यांचा गोंधळ उडाला होता त्यावेळी गौतम गंभीर ने तोंडावर बोट ठेवत शांत बसण्याचा ईशारा दिला. जे की गौतम गंभीर चा हा विडिओ आता सोशल मीडियावर वायरल झालेला आहे.
अगदी तुम्ही डोळ्यात तेल घालून जर हा विडिओ पहिला तर गौतम ने शिवीगाळ केलेले सुद्धा दिसत आहे. गौतम गंभीर ने तोंडावर बोट ठेवून सांगितले की जरी स्टेडियम आणि संघ तुमचा असला तरी इथे लखनऊ ने सामना जिंकला आहे.
रॉयल बंगलोर आणि लखनऊ या संघाच्या मॅच बद्धल बोलायचे झाले तर पहिल्यांदा रॉयल बंगलोर ने बॅटिंग करत लखनऊ सुपर जायन्ट्स ला २१३ चे टार्गेट दिले होते. जे की २० ओव्हर मध्ये लखनऊ ला २१३ रन्स करायच्या होत्या.
रॉयल बंगलोर च्या विराट कोहली ने ६१ रन्स काढल्या तर बंगलोर चा कर्णधार फैफ डूप्लेसी नाबाद राहून ७९ रन केल्या आहेत. तर ग्लेन मैक्सवेल ने २९ बॉलमध्ये ५९ रन काढल्या आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ला उत्तर देत लखनऊ सुपर जायन्ट्स ने २० ओव्हरमध्ये टार्गेट पूर्ण केले असून ९ विकेट्स गमावल्या मात्र २१३ रन्स करून आपल्या हातात सामना घेतला.