Team India New Head Coach: भारतीय संघाचा पुढचा मुख्य प्रशिक्षक कोण असेल? हा सध्या करोडो भारतीय चाहत्यांचा प्रश्न आहे. भारतीय संघाचा माजी दिग्गज क्रिकेटपटू गौतम गंभीर टीम इंडियाचा पुढील मुख्य प्रशिक्षक असेल, असा दावा अनेक अहवालात केला जात होता.
न्युयॉर्क मध्ये पोहोचताच विराट कोहलीचा विशेष सन्मान, आयीसीसीने शेअर केलेला व्हिडीओ व्हायरल..
भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक (Team India New Head Coach) होण्यावर गौतम गंभीर काय म्हणाला?
बीसीसीआयने गंभीरच्या सर्व अटी मान्य केल्या असून तो पुढील मुख्य प्रशिक्षक होणार असल्याच्या बातम्या येत होत्या. मात्र अद्याप यावर गंभीरने काहीही सांगितले नाही किंवा बीसीसीआयकडून कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. पण आता पहिल्यांदाच गंभीरने टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकावर वक्तव्य केलं आहे. गंभीर काय म्हणाला या बातमीच्या माध्यमातून जाणून घेऊया.
कोलकाता नाईट रायडर्सचे (KKR) मार्गदर्शक गौतम गंभीर हे भारतीय संघाचे पुढील मुख्य प्रशिक्षक असतील, अशी अनेक दिवसांपासून अटकळ होती. आता यावर गंभीरचे वक्तव्यही आले आहे. जेव्हा एका मुलाने गंभीरला प्रश्न विचारला की, तुम्हाला टीम इंडियाचे पुढील मुख्य प्रशिक्षक व्हायचे आहे का आणि भारतीय संघाला वर्ल्ड कप जिंकण्यासाठी तुम्ही काय कराल?
यावर गंभीर म्हणाला की, जर एखाद्याला भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक बनण्याची संधी मिळाली तर ,यापेक्षा मोठी गोष्ट आणि मोठा सन्मान कोणताच असू शकत नाही. भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक बनणे म्हणजे 140 कोटी भारतीयांचे प्रतिनिधित्व करणे, ही मोठी गोष्ट आहे. यावरून गंभीर भारतीय संघाचा पुढील मुख्य प्रशिक्षक होण्यासाठी सज्ज असल्याचे स्पष्ट झाले आहे.
गंभीर व्यतिरिक्त अनेक दिग्गज क्रिकेटपटूंबद्दल चर्चा होती की, तो भारतीय संघाचा पुढील मुख्य प्रशिक्षक होऊ शकतो, परंतु एकापाठोपाठ एक अनेक दिग्गजांनी ही जबाबदारी घेण्यास नकार दिला. ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटपटू रिकी पाँटिंग असो की जस्टिन लँगर, अगदी श्रीलंकेचा दिग्गज क्रिकेटपटू कुमार संगकारानेही मुख्य प्रशिक्षक होण्यास नकार दिला आहे.
अशा परिस्थितीत बीसीसीआय आणि भारतीय संघासाठी तणाव वाढू लागला. ICC T20 विश्वचषक 2024 सह, भारतीय संघाचे विद्यमान मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा कार्यकाळ संपणार आहे. अशा स्थितीत गंभीर मुख्य प्रशिक्षक बनल्यास १ जुलैपासून तो ही जबाबदारी स्वीकारेल.
हे ही वाचा: