IPL 2024: गौतम गंभीर बनला आयपीएलच्या इतिहासातला सर्वात महागडा मेंटोर; शाहरुख खान कडून मिळणार तब्बल एवढे कोटी..!

IPL 2024: गौतम गंभीर बनला आयपीएलच्या इतिहासातला सर्वात महागडा मेंटोर; शाहरुख खान कडून मिळणार तब्बल एवढे कोटी..!

IPL 2024: इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL 2024) सतराव्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्स (KKR)संघाचा माजी खेळाडू गौतम गंभीर याने पुनरागमन केले आहे. तो खेळाडू म्हणून नव्हे तर संघाचा मेंटोर म्हणून आता काम पाहतोय. गौतम गंभीर हा केकेआरच्या संघासाठी लकी ठरला असून आयपीएलच्या पहिल्या दोन्ही सामन्यात केकेआरने धमाकेदार विजय मिळवला आहे. केकेआरच्या संघात दाखल करण्यापूर्वी गौतम गंभीरने शाहरुख खान कडून जबरदस्त फी घेतली आहे. केकेआरने त्याला 25 कोटी रुपये देऊन संघाचा मेंटोर बनवला आहे.

IPL 2024: गौतम गंभीर बनला आयपीएलच्या इतिहासातला सर्वात महागडा मेंटोर; शाहरुख खान कडून मिळणार तब्बल एवढे कोटी..!

आयपीएलच्या इतिहासातला तो सर्वात महागडा मेंटोर ठरला. 2011 ते 17 यादरम्यान गौतम गंभीर हा केकेआर संघाचे प्रतिनिधित्व केले होते. खेळाडू आणि कर्णधार म्हणून त्याची कामगिरी जबरदस्त राहिली आहे. याचाच फायदा संघाला व्हावा यासाठी शाहरुख खान ने त्याला आपल्या संघासोबत मेंटोर म्हणून जोडले आहे. गौतम गंभीर हा मुख्य प्रशिक्षक चंद्रकांत पंडित यांच्यासोबत आता संघाला मार्गदर्शन करत आहे.

IPL 2024: गौतम गंभीर ठरला आयपीएलच्या इतिहासातील सर्वांत महागडा मेंटोर 

आयपीएलच्या मागील दोन हंगामात गौतम गंभीर हा लखनऊ सुपर जायंट्स या संघाचा मेंटोर होता. यंदाच्या हंगामात तो त्याचा जुना संघ केकेआरचा मेंटोर बनला आहे. मेंटोर बनण्यासाठी त्याने केकेआर कडून 25 कोटी रुपये घेतले आहे. मागील काही हंगामात केकेआरच्या संघाकडून निराशा जनक कामगिरी राहिली आहे. हा संघ प्ले ऑफ मध्ये देखील पोहोचू शकला नाही. त्यामुळे केकेआरच्या मॅनेजमेंटने संघाच्या कोचिंग स्टाफ मध्ये जबरदस्त बदल केला आहे.

गौतम गंभीर संघामध्ये दाखल होताच आयपीएल 2024 मध्ये कोलकत्ताने धमाकेदार कामगिरी केली आहे. पहिल्या दोन्ही सामन्यात विजय मिळवत गुणतालिकेत हा संघ दुसऱ्या स्थानावर आहे. पहिल्या सामन्यात केकेआरने पंजाबला हरवले तर दुसऱ्या सामन्यात आरसीबीवर एकतर्फी विजय मिळवला.

IPL 2024: गौतम गंभीर बनला आयपीएलच्या इतिहासातला सर्वात महागडा मेंटोर; शाहरुख खान कडून मिळणार तब्बल एवढे कोटी..!

आयपीएलच्या इतिहासामध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघ दोन वेळा चॅम्पियन बनला आहे. त्यावेळी संघाचा कर्णधार हा गौतम गंभीर होता. कोलकताने पहिल्यांदा 2012 मध्ये आयपीएलची ट्रॉफी जिंकली होती. अंतिम सामन्यात त्यांनी चेन्नई सुपर किंग्सचा पराभव केला होता. त्यानंतर केकेआर ने 2014 मध्ये पंजाब किंग संघाचा अंतिम सामन्यात पराभव करत दुसऱ्यांदा चषकावर नाव कोरले. 2014 नंतर या संघाला एकदाही आयपीएल चषक जिंकता आला नाही. गेल्या दहा वर्षात या संघाला एकही ट्रॉफी जिंकता आली नाही. विजयाचा हा दहा वर्षाचा दुष्काळ संपवण्याची जबाबदारी आता शाहरुख खान ने गौतम गंभीरवर सोपवली आहे. (Gautam Gambhir pricemoney for mentoring in kkr)


====

आमचे ईतर लेख आणि ट्रेंडीग बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

 

IPL 2024: मुंबई इंडियन्सने अचानक केला संघात बदल, या दिग्गज खेळाडूला बाहेर काढून या इंग्लंड च्या खेळाडूला दिली संधी.

IPL 2024: यॉर्कर स्पेशालिस्ट ‘जसप्रीत बुमराह’ आयपीएलसाठी पूर्णपणे फिट; यंदाच्या आयपीएल मध्ये या तीन विक्रमावर असेल नजर…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *