- Advertisement -

गौतम गंभीरचा मोठा दावा, 100 शतके आणि रोहितचा 200 धावांचा विक्रमही मोडणार, पण धोनीचा हा मोठा विक्रम कधीच मोडणार नाही.

0 1

 

आपल्या देशाचा राष्ट्रीय खेळ जरी क्रिकेट नसला तरी सर्वाधिक लोकांना क्रिकेट खेळाचे वेड आहे. लहान मुलापासून ते वयोवृद्ध लोकांपर्यंत लोक आवडीने क्रिकेट पाहतात. जसे काय आपल्या देशात क्रिकेट ची क्रेझ च निर्माण झाली आहे.

 

तर मित्रांनो आज आम्ही या लेखात तुम्हाला गौतम गंभीर यांनी केलेल्या एका खुलास्याबद्दल सांगणार आहोत. क्रिकेट मध्ये अनेक असे दिग्गज खेळाडू आहेत एकमेकांचे रेकॉर्ड मोडीत आपल्या नावी रेकॉर्ड करत आहेत परंतु गौतम गंभीर यांनी एक दावा केला आहे की 100 शतके आणि रोहितचा शर्मा चा 200 धावांचा विक्रमही मोडणार, पण धोनीचा हा मोठा विक्रम कधीच मोडणार नाही. तर मित्रांनो जाणून घेऊया नक्की कोणता विक्रम धोनी ने केला होता.

 

2022 च्या टी-20 विश्वचषक क्रिकेट सामन्यात भारतीय संघाची सुरुवात अत्यंत शानदार झाली. पण टीम इंडियाचा शेवटचा प्रवासही तितकाच वेदनादायी होता. भारतीय संघाने सलामीच्या लढतीत पाकिस्तानचा पराभव केला. परंतु सेमी फायनल मध्ये टीम इंडिया इंग्लंडकडून 10 विकेट्सने पराभूत होऊन बाहेर पडली. यानंतर टीम इंडियाच्या इतर चारही खेळाडूंवर टीका होत आहे. आता भारतीय संघाच्या पराभवानंतर गौतम गंभीरनेही मोठे वक्तव्य केले आहे.

 

त्यावेळी गौतम गंभीर म्हणाले की 100 शतक आणि 200 धावांचे रेकॉर्ड कोणीही मोडू शकेल परंतु खर तर धोनी चे रेकॉर्ड कोणीच मोडू शकणार नाही.

 

गौतम गंभीर म्हणाले की महेंद्रसिंग धोनीचा 3 आयसीसी ट्रॉफीचा विक्रम कोणी मोडू शकेल असे मला वाटत नाही. या पराक्रमाची पुनरावृत्ती कोणताही कर्णधार पुन्हा करू शकणार नाही. T20 विश्वचषक, ICC चॅम्पियन्स ट्रॉफी आणि 2011 क्रिकेट विश्वचषक जिंकले.

 

तसेच असे सुद्धा विधान केले की धोनी त्याच्या करिष्माई कर्णधारासाठी ओळखला जातो. आपल्या हुशार आणि शांत मनाने त्याने टीम इंडियाला अनेक सामन्यांमध्ये विजय मिळवून दिला आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने तीन आयसीसी विजेतेपदेही जिंकली होती. धोनी सारखा दुसरा कोणताच खेळाडू होणे नाही असे सुद्धा म्हंटले.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.