2023 आशिया चषक स्पर्धेपूर्वी क्रिकेट प्रेमींना एक चकित करणारी गोष्ट समोर आली. एका 26 वर्षाच्या खेळाडूने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली होती. त्यानंतर अवघ्या 7 महिन्यातच या खेळाडूने पुन्हा मन बदलले आणि आपला राजीनामा माघारी घेतला. आणि विशेष म्हणजे त्याला पुन्हा एकदा राष्ट्रीय कसोटी संघात स्थान देखील देण्यात आले. हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून श्रीलंकेचा अष्टपैलू खेळाडू वानिंदू हसरांगा हा होय. त्याने आपला राजीनामा माघारी घेतला आहे
मागील वर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये वानिंदु हसरंगाने कसोटी क्रिकेट मधून निवृत्ती घोषित केली होती. वानिंदु हसरंगा याची 22 मार्चपासून सुरू होणाऱ्या बांगलादेशविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेमध्ये श्रीलंका क्रिकेट संघामध्ये निवड करण्यात आली आहे. वन डे क्रिकेटमध्ये लक्ष केंद्रित करण्यासाठी त्याने कसोटी क्रिकेटला रामराम ठोकला होता.
वानिंदु हसरंगाने श्रीलंका संघाकडून चार कसोटी सामन्यात खेळले आहेत. 2020 मध्ये त्याने कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याचा शेवटचा कसोटी सामना 2021 मध्ये खेळला होता. चार कसोटी त्याच्या नावावर 196 धावांची नोंद आहे. तसेच त्याने गोलंदाजीत चार बळी देखील घेतले. त्याच्या नावावर एकमेव अर्धशतकाची नोंद आहे. श्रीलंकेकडून त्याने 54 वनडे आणि 65 t20 सामने खेळले आहेत.
बांगलादेश मालिकेसाठी श्रीलंकेचा कसोटी संघ –
धनंजय डी सिल्वा (कर्णधार), कुसल मेंडिस (उपकर्णधार), दिमुथ करुणारत्ने, दिनेश चंडिमल, सदिरा समरविक्रमा, कामिंदू मेंडिस, विश्व फर्नांडो, लाहिरू कुमारा, लाहिरू उदारा, वानिंदू हसरंगा, प्रभात जयसूर्या, रमेश मेनिस, निशान राजेश, निशान मदुष्का, अँजेलो मॅथ्यूज, मेनिस, नीशराज, नायक, चमिका गुणसेकरा.