आयपीएल 2024 मधील 15व्या सामन्यात लखनऊ आणि आरसीबी यांच्यात सामना झाला. या सामन्यात लखनऊने आरसीबीचा दारुण पराभव केला. या पराभवामुळे आरसीबीला विजयाचे खाते देखील उघडता आले नाही. आरसीबीच्या संघातील प्रमुख अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेल याच्या नावावर एका लाजिरवाण्या विक्रमाची नोंद झाली आहे. लखनविरुद्धच्या सामन्यात तो शून्यावर बाद झाला आहे. आयपीएल मध्ये तो आतापर्यंत 16 वेळा शून्यावर बाद झाला आहे. मयंक यादव ने निकोलस पुरन याच्याकडून त्याला शून्यावर झेलबाद केले.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धडाकेबाज कामगिरी करणार आहे खेळाडूला आयपीएल मध्ये म्हणावी तशी कामगिरी करता आली नाही. ग्लेन मॅक्सवेल कडून प्रत्येक हंगामामध्ये चांगली अपेक्षा असते मात्र तो एक-दोन सामने खेळतो इतर सामन्यात फेल ठरतो हा अनुभव आहे.
इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलमध्ये जगभरातील खेळाडूंनी अविश्वसनीय विक्रम केले आहेत. फलंदाज आणि गोलंदाजांनी वेगवेगळे विक्रम केलेले पाहायला मिळतात. काही लाजिरवाणे विक्रम देखील दिग्गज खेळाडूच्या नावावर आहेत. शून्यावर बाद होण्याचा हा लाजिरवाणा विक्रम भारतीय खेळाडूंच्या देखील नावे आहेत.
आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा शून्य धावसंख्येवर बाद होणाऱ्या खेळाडूंच्या यादीमध्ये पहिल्या स्थानावर दिनेश कार्तिकचे नाव येते. तो एक-दोन वेळा नव्हे तर 17 वेळा शून्यावर बाद झाला आहे. यष्टीरक्षक फलंदाज कार्तिक जगातला सर्वोत्तम फिनिशर मानला जातो. यंदाच्या वर्षात तो रॉयल चॅलेंजर्स बंगळूर संघाचे प्रतिनिधित्व करतोय. हे त्याचे कदाचित शेवटचे आयपीएलचे वर्ष असू शकते.
आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणाऱ्या खेळाडूंच्या यादीमध्ये रोहित शर्माचे देखील नाव आहे. हे वाचून कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण हे खरे आहे. सर्वाधिक वेळा गोल्डन डक झालेल्या खेळाडूंच्या यादीत रोहित शर्मा दिनेश कार्तिक नंतर दुसऱ्या स्थानावर आहे. रोहित तब्बल 17 वेळा शून्य धावसंख्येवर बाद झाला आहे. हा नकोसा वाटणारा विक्रम स्वतःच्या नावावर करणाऱ्या रोहित शर्मा ने मुंबई इंडियन्सला पाच वेळा आयपीएलचे जेतेपद मिळवून दिले आहे. यंदाच्या वर्षात तो केवळ खेळाडू म्हणून संघात असणार आहे. संघाच्या नेतृत्वाचे धुरा हार्दिक पांड्या कडे सोपवण्यात आली आहे.
वेस्टइंडीजचा मिस्टरी फिरकीपटू सुनील नरेन हा आयपीएलमध्ये 15 वेळा गोल्डन डक झाला आहे. आयपीएल मध्ये केकेआर संघाचे तो प्रतिनिधित्व करतोय. वेस्टइंडीज संघाकडून खेळताना तो आठव्या अथवा नवव्या स्थानावर फलंदाजीला येत होता. मात्र केकेआरच्या संघाकडून खेळताना तो अनेकदा सलामीला खेळताना पाहायला मिळाला.
केकेआर संघाचा सदस्य मंदिप सिंग हा देखील या यादीत चौथ्या स्थानावर आहे. इंडियन प्रीमियर लीग मध्ये तो तब्बल 15 वेळा भोपळाही न फोडता शून्य धावसंख्येवर बाद झाला. आयपीएलमध्ये सुरुवातीच्या काळात तो किंग्स इलेव्हन पंजाब संघाचे प्रतिनिधित्व करत होता. आयपीएल गाजवणाऱ्या या खेळाडूला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फारशी संधी मिळाली नाही.
आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.