ग्लेन मॅक्सवेल AUS vs AFG: क्रिकेटमध्ये कधी काय होईल हे सांगता येत नाही. मंगळवारी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान (AUS vs AFG:) यांच्यातील सामन्यात ग्लेन मॅक्सवेलने असे वादळ निर्माण केले की चाहते थक्क झाले. अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियाचे 7 विकेट्स पॅव्हेलियनमध्ये धाडले असताना मॅक्सवेलने शानदार फलंदाजी केली. अफगाणिस्तान पुन्हा एकदा अपसेट खेचून आणेल असे वाटत होते, पण मॅक्सवेलने येथे खेळाला ट्विस्ट दिला.
मॅक्सवेलने कठीण काळात चौकार आणि षटकार लगावत शानदार शतक झळकावले. त्याने 72 चेंडूत 10 चौकार आणि 3 षटकार मारत शतक झळकावले. यादरम्यान मॅक्सवेलने 29व्या षटकात नूर अहमदच्या सलग दोन चेंडूंवर 2 षटकार ठोकले. विशेष म्हणजे मॅक्सवेलने हे षटकार कोणतीही जोखीम पत्करले नाहीत. त्याने क्रीजवर उभे असताना आपली शक्ती वापरली आणि योग्य चेंडू येताच सीमारेषा ओलांडली.
Last Three shots by Glenn Maxwell to create History.
Greatest innings in CWC #GlennMaxwell #AUSvsAFG pic.twitter.com/aG1SnfxJyq
— Karan kumar (@Karankumar7274) November 7, 2023
AUS vs AFG: ग्लेन मॅक्सवेलने अफगाणिस्तानच्या गोलंदाजांची धुलाई करत ठोकले शानदार दुहेरी शतक ..
हे पाहून अफगाणिस्तानचे गोलंदाज चक्रावले. यानंतर मॅक्सवेलने मुजीबूर रहमानच्या षटकात एका चेंडूवर चौकार आणि एका चेंडूवर षटकार ठोकला. यानंतरही त्याची स्फोटक फलंदाजी सुरूच होती. त्याने 36व्या षटकात मोहम्मद नबीचीही धुलाई करत चांगल्याच धावा काढल्या..
कर्णधार पॅट कमिन्सने मॅक्सवेलसह दुसऱ्या टोकाकडून आघाडी कायम ठेवली. तो मॅक्सवेलला जास्तीत जास्त वेळ देत होता.. मॅक्सीने त्यांचा विश्वास जिंकला आणि शानदार फलंदाजी करत आपल्या संघाला संकटातून सोडवले. अखेर मॅक्सवेलने द्विशतक झळकावत आपल्या संघाला शानदार विजय मिळवून दिला. त्याने 128 चेंडूत 21 चौकार आणि 10 षटकारांसह नाबाद 201 धावा केल्यानंतर तो मैदानातून परतला. या विजयासह ऑस्ट्रेलिया उपांत्य फेरीसाठी पात्र ठरला आहे.
तत्पूर्वी, डेव्हिड वॉर्नर १८ धावा करून, ट्रॅव्हिस हेड शून्य, मिचेल मार्श २४, मार्नस लॅबुशेन १४, जोश इंग्लिस डक, मार्कस स्टॉइनिस ६ आणि मिचेल स्टार्क अवघ्या ३ धावा करून बाद झाले. यानंतर मॅक्सवेलने ज्या पद्धतीने फलंदाजी केली त्यामुळे क्रिकेटप्रेमींच्या नसानसात खळबळ उडाली.
पहा व्हिडीओ..
Today Glenn Maxwell has played a splendid 201 not out inning against Afghanistan.#ICCCricketWorldCup23 #GlennMaxwell #Cricket #CricketWorldCup pic.twitter.com/YWjdC8sxIq
— Engr. Abrar Ullah 🇵🇰 (@abrarullah33) November 7, 2023