AUS vs SL: भारतीय भूमीवर ग्लेन मॅक्सवेलचा धमाका: पोलार्ड- डिव्हिलियर्सचा विक्रम उध्वस्त

0

 

AUS vs SL: आयसीसी विश्वचषक 2023 (Odi worldcup 2023) च्या श्रीलंके विरुद्ध  (AUS vs SL)झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेल यांनी धडाकेबाज खेळी केली. पहिल्या दोन सामन्यात फेल गेलेला ग्लेन मॅक्सवेल मात्र तिसऱ्या सामन्यात छोटेखानी खेळी करत ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला. त्याने अवघ्या 21 चेंडूत 31 धावांची आतिशबाजी केली. यात त्याने चार चौकार आणि दोन खणखणीत षटकार ठोकत संघाच्या विजयात हातभार लावला.

ऑस्ट्रेलियाने हा सामना पाच गडी राखून जिंकला. यंदाच्या विश्वचषकातला ऑस्ट्रेलियाचा हा पहिला विजय ठरला आहे. मॅक्सवेलने या छोटेखानी खेळीसह एक नवा विक्रम आपल्या नावावर करत वेस्टइंडीजचा माजी फलंदाज कायरन पोलार्ड आणि एबी डिव्हिलियर्स यांना पाठीमागे टाकले.

AUSvsSL live

ग्लेन मॅक्सवेल ठरला भारतीय भूमीवर सर्वाधिक षटकार ठोकणारा विदेशी  खेळाडू

क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात भारत देशात सर्वाधिक षटकार ठोकणारा तो पहिला विदेशी खेळाडू ठरला आहे. मॅक्सवेल मैदानात उतरताच श्रीलंकेच्या गोलंदाजांचा खरपूसपणे समाचार घेतला. पहिल्या चेंडूपासून त्याने चौकार षटकाराची आतिशबाजी करण्यास सुरुवात केली.147 च्या स्ट्राइक रेटने खेळणारा कांगारूचा हा खेळाडूने 28 धावा केवळ चौकाराने षटकारातून केल्या.

भारतीय भूमीवर सर्वाधिक षटकार मारणाऱ्या विदेशी खेळाडूंच्या यादीत ग्लेन मॅक्सवेल पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. याआधी हा विक्रम वेस्टइंडीज चा स्फोटक फलंदाज कायरन पोलार्ड याच्या नावावर होता. पोलार्डच्या नावावर 49 तर एबी डिव्हिलियर्स याच्या नावावर 48 षटकारांची नोंद आहे. या दोघांनाही पाठीमागे टाकत त्याने भारतीय भूमीवर 51 षटकार ठोकण्याचा विक्रम केला आहे.

श्रीलंकेने दिलेले 210 धावांचे आव्हान पार करण्यासाठी मैदानात उतरलेल्या कांगारूची सुरुवात ही अत्यंत खराब झाली. डेव्हिड वॉर्नर 11 धावांवर मधुशंकाच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानंतर मैदानात आलेला स्टीव्ह स्मिथ हा भोपळा देखील फोडू शकला नाही. तो शून्य धावसंख्या वर बाद होत आला तसा परत गेला.

AUS vs SL: भारतीय भूमीवर ग्लेन मॅक्सवेलचा धमाका: पोलार्ड- डिव्हिलियर्सचा विक्रम उध्वस्त

त्यानंतर आलेला मिचेल मार्श आणि मारर्न्स लाभूशेन यांनी अर्धशतकी भागीदारी केली मार्शने 52 तर लाबुशेन 40 धावांचे योगदान दिले. मार्शबाद होताच जोश इंग्लिश याने धमाकेदार खेळीचे प्रदर्शन केले. त्याने 59 चेंडूत 58 धावांची खेळी केली. लाबुशेन सोबत त्याने चौथ्या विकेटसाठी 77 धावांची भागीदारी रचली. जोश इंग्लिश याने त्याच्या या खेळीत पाच चौकार आणि एक षटकार ठोकले. मार्क स्टोइनिस हा 20 धावांवर नाबाद राहिला.

भारत आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळताना ऑस्ट्रेलियाचा दारुण पराभव झाला होता. या पराभवानंतर ऑस्ट्रेलियावर टीकेची झोड उठली होती. तसेच पॅट कमिन्सचे कर्णधार पद देखील धोक्यात आले होते. या पराभवामुळे ऑस्ट्रेलियावर 31 वर्षानंतर विश्वचषकातील पहिल्या सामन्यात पराभूत होण्याची नामुष्की ओढवली होती.


Leave A Reply

Your email address will not be published.