जागतिक दर्जाचे फलंदाज आणि गोलंदाजांचा भरणा असलेल्या पाच वेळच्या विश्वविजेता ऑस्ट्रेलिया संघाला 2023च्या विश्वचषकात पहिला विजय मिळवण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागत आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा लाजिरवाणा पराभव झाला होता. फलंदाजी आणि गोलंदाजीत जबरदस्त कामगिरी करून ऑस्ट्रेलियाच्या विजयाची मक्तेदारी मोडीत काढली. तब्बल 31 वर्षानंतर ऑस्ट्रेलिया संघाने विश्वचषकातील पहिले दोन सामने गमाविले आहे.
गुरुवारी ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दुसरा सामना खेळला गेला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाच्या कांगारूंना 134 धावांनी पराभवाची धूळ चारली. ऑस्ट्रेलियाचा हा सलग दुसरा पराभव तर दक्षिण आफ्रिकेचा सलग दुसरा विजय ठरला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेल याने एक लाजिरवाणी कृत्य केले. त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वायरल होत आहे.
19 व्या षटकात ऑस्ट्रेलियाची अवस्था 6 बाद 80 अशी झाली असताना ग्लेन मॅक्सवेल ने बाल्कनीत बसून सिगारेट पिण्याचे लाजिरवाणी कृत्य केले. ऑस्ट्रेलिया संघ विजयासाठी धडपडत असताना त्याच्या चेहऱ्यावर कसलेच दडपण त्याच्यावर दिसून येत नव्हते. कसली भीती अथवा तमा न बाळगता तो हे कृत्य करत होता. विशेष म्हणजे त्याच्याच बाजूला निवड समितीचे मुख्य अध्यक्ष जॉर्ज बेली त्याचे हे कृत्य पाहून हसत होते.
या दोन दिग्गज खेळाडूंचे हे अशोभनीय कृत्य पाहून सारेच क्रिकेटपटा प्रेमी आवाक झाले आहेत. सामन्यात ग्लेन मॅक्सवेलच्या फलंदाजी बाबतीत बोलायचे झाले तर तो या सामन्यात धावांसाठी संघर्ष करताना दिसून आला. अवघ्या 17 चेंडूत 3 धावा करत तो माघारी परतला. गोलंदाजीत मात्र तो यशस्वी ठरला. त्याने 10 षटकात 34 धावा देत 2 महत्त्वपूर्ण गडी बाद केले.
विश्वचषकात इतर संघाचे खेळाडू हे खोऱ्याने धावा काढत असताना ऑस्ट्रेलियाचे फलंदाज धावा करण्यासाठी संघर्ष करत आहेत. गोलंदाज मात्र त्यांची जबाबदारी कटाक्षाने पाळत असताना क्षेत्ररक्षकांची साथ त्यांना भेटत नसल्याने ऑस्ट्रेलियाला लाजिरवाणी पणे पराभवाचे तोंड पाहावे लागत आहे. ऑस्ट्रेलिया संघ जर पहिल्या फेरीतून पुढे जाऊ शकला नाही तर पॅट कमिन्सचे कर्णधार पद धोक्यात येऊ शकते.
ग्लेन मॅक्सवेल चे लाजिरवाणे कृत्य कॅमेरात कैद, पहा व्हायरल व्हिडीओ
#AUSvsSA #southafrica #Australia
Smoking 🚬 in #Maxwell pic.twitter.com/Do1O746P9a— Alkazaar (@gameebuster11) October 12, 2023
ऑस्ट्रेलियाचा संघ जर या विश्वचषकात विजयाची लय पकडू शकला नाही तर त्यांचा पुढचा मार्ग खडतर ठरणार आहे. ऑस्ट्रेलियाचा आता पुढचा सामना शनिवारी 14 ऑक्टोंबर रोजी श्रीलंकेविरुद्ध लखनऊच्या याच मैदानावर होणार आहे.
हेही वाचा:
पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यापूर्वी शुभमन गिल विषयी मिळाली मोठी अपडेट; वाचा काय आहे बातमी..