सुर्यकुमार यादवच्या फलंदाजीचा चाहता झाला ऑस्ट्रोलियाचा दिग्गज खेळाडू, म्हणाला “त्याला संघात घेण्यासाठी बाकीच्या सर्वाना बाहेर काढावे लागेल”
भारतीय संघाचा स्टार खेळाडू सुर्यकुमार यादव सध्या आपल्या कारकीर्दीच्या सुवर्ण क्षणातून जात आहे. तो परतेक सामन्यात टीम इंडियासाठी उमदा प्रदर्शन करत असून लोक सुद्धा त्याच्या फलंदाजी शैलीमुळे त्याचे चाहते होत चालले आहेत. भारतीय संघाच्या अनेक आजी माजी खेळाडूंनी आजपर्यंत सूर्याची अनेक वेळा स्तुती केली आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या ती-२० सामन्यात नाबाद १११ धावा केल्यावर क्रिकेट जगतात फक्त सूर्यकुमारच्याच नावाची चर्चा होती. आणि ही चर्चा थेट ऑस्ट्रोलियापर्यंत जाऊन पोहोचली. सूर्याच्या या खेळीने प्रभावित होत ऑस्ट्रोलियाचा दिग्गज अष्टपैलू खेळाडू ग्लेन मेक्सवेलसुद्धा त्याची स्तुती करण्यापासून स्वतःला रोकु शकला नाही.
View this post on Instagram
सूर्याबद्दल बोलतांना मेक्सवेल म्हणाला की, “सूर्यासारखी फलंदाजी करणे हे इंटरनेशनल क्रिकेट खेळणाऱ्या प्रत्येक फलंदाजांचे स्वप्न असते. पण त्याच्यासारखी फलंदाजी करण्याचे कौशल्य आणि शैली दुसरी कोणाकडे सध्यातरी नाहीये. तो ज्या प्रकरे उत्कृष्ट फलंदाजी करतोय, ते पाहून खरच डोळ्याचे पारणे फिटतात..
मेक्सवेल पुढे म्हणाला की, जर सूर्याला एखाद्या संघाला बीबीएल मध्ये आपल्या संघात घ्यायचे असेल तर त्यांना आधी आपल्या संघातील इतर खेळाडूंना संघातून बाहेर करावे लागेल, तर कुठे त्याची किंमत संघाकडू जमा होऊ शकेल. सुर्यकुमार यादव अनमोल खेळाडू आहे आणि बीबीएलसारख्या स्पर्धेत त्याला कोणीही आपल्या संघात घेऊ शकत नाही,असेही मेक्सवेल म्हणाला.
हार्दिक पंड्याने सुद्धा केले सूर्याचे कौतुक

भारतीय संघाचा कर्णधार हार्दिक पंड्या याने सुद्धा सूर्याच्या न्यूझीलंड दौऱ्यातील खेळीवर आनंद व्यक्त केला आहे. पंड्या म्हणाला सूर्याला खेळतांना पाहून खरोखर आपण एक प्रेक्षक असल्याची भावना निर्माण होते. तो ज्याप्रकारे सुंदर फटके मारतो ते पाहून मन आनंदित होते.
सुर्यकुमार यादव कडे पाहून वाटते की, त्याला भारतीय संघात येण्यास खूपच उशीर झाला. जर सूर्य १० वर्ष आधी संघात आला असता तर आज तो यापेक्षा जास्त नाव कमवू शकला असता आणि भारतीय संघाचा लौकिक सुद्धा त्याने वाढवला असता, असं पंड्या म्हणाला.
हेही वाचा:
पाकिस्तानच्या विजयानंतर भारतीय संघात होणार 3 मोठे बदल, असा असेल इंग्लंडविरुद्ध भारतीय संघ…